१८४१ सालापासून पोर्तुगाल देशाने जतन करून ठेवलेय एका व्यक्तीचे शीर, पण का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

इजिप्त मध्ये मनुष्याचे शरीर जतन करून ठेवल्याच्या बातम्या तुम्ही वर्तमान पत्रात आणि न्यूज चॅनल वर पहिल्या असतील. अशीच एक बातमी पोर्तुगाल विद्यापीठातून येत आहे. असे म्हटले जातेय की इथे एका मनुष्याचे शीर १८४१ साला पासून संरक्षित करून ठेवले आहे.

portugese-marathipizza02
atlasobscura.com

हे शीर दिओगो अॅल्वेस नावाच्या एका अट्टल गुन्हेगाराचे आहे असे सांगितले जात आहे.

त्याचा जन्म १८१० मध्ये Galicia मध्ये झाला होता. कामाच्या शोधात अॅल्वेस आपले शहर सोडून लीस्बोनला आला होता. जिथे त्याने छोटी-मोठी कामे केली. त्याचवेळी त्याने छोटे-मोठे गुन्हे करायला  देखील सुरवात केली. तेव्हा त्याला एक गोष्ट लक्षात आली पैसे कमावण्याचा सर्वात सोप्पा मार्ग गुन्हेगारीचा आहे.

इथूनच अॅल्वेस याचा गुन्हेगारीचा प्रवास सुरु झाला. सर्वात पहिल्यांदा त्याने शेतकऱ्यांना लुटले. तो त्यांचाकडील सगळे काही लुटून त्यांना पुलावरून तलावात फेकून देत असे, जवळपास त्याने ७० पेक्षा अधिक लोकांना मारले, पण अचानक ३ वर्षानंतर त्याने असे करणे बंद केले. त्यावेळेस पोलिसांनी या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत असे समजून या घटनांकडे जास्त लक्ष दिले नव्हते.

portugese-marathipizza03
wikipedia.org

त्यानंतर अॅल्वेसने एक समूह बनवला आणि त्यांच्या मदतीने त्याने लोकांच्या घरात दरोडे टाकायला सुरवात केली. एका डॉक्टरच्या घरी घुसून हत्या करून लुटमार केल्याच्या आरोपाखाली त्याला पोलिसांनी पकडले. त्यानंतर कोर्टाने १८४१ मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली.

अॅल्वेस हा काहीलाच असा अपराधी नव्हता ज्याला फासावर लटकवण्यात आले होते, मग असा प्रश्न पडतो की, त्याचे शीर एवढे दिवस जतन का करून ठेवले आहे?

portugese-marathipizza01
atlasobscura.com

ज्यावेळी अॅल्वेसला फासावर लटकवण्यात आले त्यावेळी phrenology (डोक्याच्या कवटीच्या सहाय्याने माणसाचा स्वभाव जाणून घेणे) एक लोकप्रिय विषय म्हणून पुढे आला होता,यामध्ये माणसांच्या स्वभावाबरोबरच त्याचा अंतरील भागावरही अभ्यास करण्यात येई. ह्या प्रयोगाला करण्यासाठी शास्त्रज्ञांनी अॅल्वेस याचे शीर जतन करून ठेवले होते, जे आजही  प्रयोगशाळेत सुरक्षित आहे.

portugese-marathipizza04
atlasobscura.com

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?