' डिजिटल इंडियाचा नारा देणाऱ्या मोदींचंसुद्धा एकेकाळी बँक अकाउंट नव्हतं!

डिजिटल इंडियाचा नारा देणाऱ्या मोदींचंसुद्धा एकेकाळी बँक अकाउंट नव्हतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजकाल सगळीकडे ऑनलाईन आर्थिक व्यवहार चालतात. रोख व्यवहारांचे दिवस मागे पडलेत. अगदी भाज्या, फळे, किराणामाल यांची किरकोळ खरेदी केली तरी लोक पटकन फोन पे, गुगल पे, पेटीएम किंवा भीम ऍपवरून त्याचे डिजिटल पेमेंट करून मोकळे होतात.

आजकाल कॅश बाळगण्यापेक्षा हे असे पटापट ऑनलाईन व्यवहार करणे नवी पिढी तर पसंत करतेच, शिवाय जुन्याजाणत्यांनी सुद्धा जसे स्मार्ट फोन आणि इतर तंत्रज्ञान स्वीकारले तसेच हे ऑनलाईन आर्थिक व्यवहार सुद्धा अगदी पटकन स्वीकारले.

काळ्या पैश्यावर घाला घालण्यासाठी नोटबंदी झाली आणि त्यानंतर तर बहुतेक लोक रोख व्यवहार सोडून डिजिटल व्यवहार करू लागले. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा नव्या भारतात आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा आग्रह धरतात.

 

narendra modi 2 inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्यांनी तर डिजिटल इंडियाचा नाराच दिला आहे. पण गमतीची गोष्ट अशी की एक काळ असा होता की मोदींचे स्वतःचे बँक अकाउंट नव्हते.

सुरुवातीच्या काळात जेव्हा ते साधे कार्यकर्ते म्हणून काम करत होते तेव्हा त्यांचे बँक अकाउंटदेखील नव्हते. हा किस्सा खुद्द त्यांनी स्वतःच काही काळापूर्वी सांगितला.

२०१८ साली सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे अधिकृत उद्घाटन केले. त्याप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित एक आठवण सांगितली. त्यांनी सांगितले की आमदार होईपर्यंत त्यांचे कोणतेही बँक खाते नव्हते.

याचे कारण असे की त्याच्याकडे बँक खात्यात जमा करण्याइतके पैसे कधीच नव्हते. त्यांच्या लहानपणीची आठवण सांगताना ते म्हणाले की, “मी शाळेत शिकत असताना देना बँकेने एक योजना आणली. या योजनेंतर्गत देना बँकेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना पिगी बँक देण्यात आली आणि विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्यात आले.”

इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या योजनेअंतर्गत पीएम मोदींनादेखील एक पिगी बँक देऊन त्यांचे खाते उघडण्यात आले. पण त्या खात्यात जमा करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे तर नव्हते.

 

narendra modi 3 inmarathi

शिक्षण झाल्यानंतर काही दिवसांनी मोदी ते गाव सोडून गेले, पण त्यांचे ते बँक खाते सुरूच होते. बँक अधिकारी दरवर्षी त्यांचे खाते फॉरवर्ड करायचे. बरीच वर्षे या खात्यातून काहीच आर्थिक व्यवहार न झाल्यामुळे हे खाते बंद करण्यासाठी बँक अधिकारी त्यांचा शोध घेत होते.

मोदींनी सांगितले की, तब्बल ३२ वर्षांनंतर बँक अधिकाऱ्यांनी त्यांचा पत्ता शोधून काढला आणि खाते बंद करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. इतक्या वर्षांनंतर बँक अधिकारी त्यांच्याकडे पोहोचले आणि अखेर ते खाते बंद करण्याच्या फॉर्मवर त्यांची सही घेतली.

गंमत म्हणजे आमदार होईपर्यंत त्यांचे कोणतेही बँक खाते नव्हते. गुजरात विधानसभेचे आमदार झाल्यावर त्यांनी पगार घेण्यासाठी पहिल्यांदाच बँकेत स्वतःचे खाते उघडले.

 

modi dena bank inmarathi

 

हल्ली तर लहान लहान मुलांचीदेखील बँकेत खाती उघडण्यात येतात आणि शालेय मुलांना आवर्जून लहानपणापासून बँकेचे व्यवहार शिकवले जातात जेणे करून पुढे जाऊन त्यांना अडचणी येऊ नयेत.

डिजिटल बँकिंग आणि डिजिटल करन्सी हेच आता भविष्य आहे आणि शालेय जीवनापासूनच मुलांना या सगळ्या गोष्टींची ओळख करून देणे ही काळाची गरज आहे, पण आज डिजिटल इंडियाचा नारा देणाऱ्या मोदींचे कित्येक वर्षं बँक अकाऊंटसुद्धा नव्हते ही चकित करणारी गोष्ट आहे की नाही!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?