' ९०० भारतीय कर्मचाऱ्यांना फक्त एका zoom कॉलवर निलंबित करणाऱ्या CEO चा व्हिडिओ व्हायरल… – InMarathi

९०० भारतीय कर्मचाऱ्यांना फक्त एका zoom कॉलवर निलंबित करणाऱ्या CEO चा व्हिडिओ व्हायरल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सोशलमीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता यायचं नाही. लॉकडाऊनमध्ये सोशलमीडियामुळे लोकांचा घरबसल्या चांगलाच टाईमपास झाला. सेलिब्रिटींच्या गॉसिप्सनी, व्हायरल व्हिडीओजनी लोकांचं चांगलंच मनोरंजन झालं.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, पण हा व्हिडीओ एका झुम कॉलचा आहे. आता तुम्ही म्हणाल, की झुम कॉलवर काय इंटरेस्टिंग असणार? पण असं नाहीये, या व्हिडिओचा विषय वाचलात तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

तुम्ही आतापर्यंत नोकरीसाठी घेतलेल्या मुलाखतींचे अनेक व्हिडीओज पाहिले असतील, पण हा व्हिडीओ नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या मीटिंगचा आहे. आणि थोड्याथोडक्या नव्हे, तब्बल ९०० कर्मचाऱ्यांना या कंपनीच्या बॉसने केवळ एका झुम कॉलवर निलंबित केलं.

 

vishal garg inmarathi1

 

१ डिसेंबरला Better.com या वेबसाईटच्या सीईओने एक झुम मीटिंग घेतली आणि या मीटिंगमध्ये तब्बल ९०० कर्मचाऱ्यांना त्यांने निलंबित केलं. भारतातील आणि अमेरिकेतील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. त्याने घेतलेल्या या झुम मीटिंगचा व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये सीईओने आपला निर्णय ऐकवला आहे.

खरंतर डिसेंबर महिना हा सगळ्यांसाठीच घडामोडींनी भरलेला असतो. नवीन वर्षाची सुरुवात होणार असते. ख्रिसमसच्या सुट्टीची सगळेजणं वाट बघत असतात. आपल्याकडे ख्रिसमसला जोडून सुट्टी येते, त्यामुळे गुलाबी थंडीत फिरायला जाण्याचे प्लॅन्स होतात. अशा पार्श्वभूमीवर सीईओने घेतलेला हा निर्णय सगळ्यांसाठीच खूप धक्कादायक होता.

या कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेने ही झुम मीटिंग रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केली आहे.

 

 

‘ही बातमी तुम्हाला कधीच ऐकावीशी वाटणार नाही, पण तुम्ही जर हा कॉल ऐकत असाल, तर तुम्ही त्या ग्रुपचा भाग आहात, ज्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येत आहे. आजपासून तुम्हाला या कंपनीसोबत काम करता येणार नाही’ असे सीईओ विशाल गर्ग या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत.

गर्ग म्हणाले, ‘माझ्याकडे कोणतीच खास बातमी नाही. सध्या मार्केट बदलत आहे, आणि मार्केटसोबत बदलणे ही आपलीही गरज आहे. जर आपण बदललो नाही, तर आपण आपल्या कंपनीची उद्दिष्ट्ये कधीच पूर्ण करू शकणार नाही. तुम्हाला हा निर्णय अजिबात आवडणार नाही, पण शेवटी मला तो घ्यावा लागला आहे आणि मी घेतलेला निर्णय मी स्वतः तुम्हाला सांगावा असं मला वाटत होतं. हा निर्णय घेणं माझ्यासाठी सुद्धा खूप कठीण होतं.’

‘माझ्या करियरमध्ये मी दुसऱ्यांदा हा निर्णय घेतोय आणि तो घेण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. मागच्यावेळेस हा निर्णय घेतल्यानंतर मी स्वतः रडलो होतो. अनेकविध कारणांसाठी हा निर्णय मला घ्यावा लागतोय.’ असंही ते म्हणाले.

ज्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे, त्यांना एका महिन्याचा पूर्ण लाभ आणि दोन महिन्याचा कव्हर अप मिळेल. यासाठीचा प्रिमियम कंपनीच बघेल. असंही त्यांनी सांगितलं आहे. या व्हिडिओवर अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?