' राणीला रोजच्या खाण्याचा कंटाळा आला आणि मग… ; पिझ्झाची चविष्ट कहाणी! – InMarathi

राणीला रोजच्या खाण्याचा कंटाळा आला आणि मग… ; पिझ्झाची चविष्ट कहाणी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज सकाळपासूनच नेटकऱ्यांत चर्चा आहे ती गुगलच्या आजच्या interactice doodle ची! गुगल नेहमीच दिनविशेषचं निमित्त साधत रोजचे डुडल बनवत असतं. या पार्श्वभूमीवर पिझा गेमचं हे डुडल गुगलनं का ठेवलं असावं? याबाबत उत्सुकता चाळवली गेली.

आज सकाळपासूनच गुगलवरच्या पिझ्झा डुडलनं जगभरात खळबळ माजवली आहे. गुगलच्या होमपेजवर गेल्यावर डुडल दिसतं आणि त्यावर क्लिक केलं असता एका गेम मधे आपण प्रवेश करतो. यात पिझाच्या टॉपिंगनुसार त्याचे अचूक भाग करायचे आहेत.

 

doodle inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अबालवृध्द हा खेळ सकाळपासून मोठ्या मजेत खेळत आहेत. एका बाजूला हा मजेशीर खेळ खेळतानाच आज गुगल हा खेळ का बरं खेळवतंय? याची उत्सुकताही नेटकर्‍यात आहे. तर, आज गुगल जगभरात अबालवृध्दात लोकप्रिय असणार्‍या पिझ्झा या खाद्यप्रकाराला मानवंदना देत आहे.

पारंपारिक अशा या इटालियन पदार्थाला आजच्याच दिवशी का बरं इतकं महत्व आलं आहे? याचं उत्तर आहे, २००७ साली आजच्याच दिवशी नेपोलिटन pizzaiuolo ही पाककला युनेस्कोच्या खाद्यसंस्कृती सूचित समाविष्ट करण्यात आली होती. त्या दिवसाचं स्मरण म्हणून आज गुगल ११ प्रकारचे पिझ्झे लोकांकडून कापून घेत आहे.

 

doodle game inmarathi

 

यानिमित्तानं जाणून घेऊ पिझ्झा विषयीचे काही रंजक किस्से…

१. जगभरातल्या लहानमोठ्या रेस्तरॉमध्ये पिझ्झा हा इटालियन पदार्थ बनविला जातो. अधिकृत संख्या असं सांगते की दरवर्षी जगभरात दरवर्षी ५ अरब पिझ्झांची विक्री होते.

२. इटालियन पिझ्झा बर्गरवाल्या अमेरिकन जनतेत इतका लोकप्रिय आहे की, ९४ टक्के अमेरिकन जनता महिन्यातून किमान एकदा तरी पिझ्झा खातेच.

३. जगभरातली पिझ्झाची उलाढाल आहे, तब्बल १३४ अरब डॉलर्स म्हणजेच ९३०० अरब रूपये इतकी!

 

pizza inmarathi
istock.com

 

४. भारतात आज जागोजागी दिसणारा पिझ्झा सुरवातीला ‘पिझ्झा हट’ या ब्रॅण्डमुळेच आम जनतेला माहीत झाला. १८ जून १९९६ साली पिझ्झा हटनं बेंगलोरमधे त्यांचं पहिलं आऊटलेट चालू केलं होतं.

डॉमिनोजची सुरुवात

१९६० च्या दशकात टॉम आणि जेम्स बंधूंनी मिशिगन येथे डॉमिनिक्स नावानं चालणारी छोटी पिझ्झा चेन खरेदी केली. यांनी प्रथमच पिझ्झाची होम डिलिव्हरी चालू केली आणि याला प्रचंड प्रतिसाद लाभला.

 

dominos 5 inmarathi

 

झपाट्यानं लोकप्रिय झालेल्या डॉमिनिक्सचं नाव १९६५ साली बदलून डॉमिनोज करण्यात आलं. त्या वेळेस डॉमिनोजचकडे तीन दुकानं होती आजच्या घडीला डॉमिनोजच्या जगभरात पहिल्या क्रमांकावरची पिझ्झा चेन आहे आणि यांचे किमान १६ हजार स्टोअर्स आहेत.

चवीइतकाच खमंग इतिहास

५. पिझ्झाचा इतिहास थोडाथोडका नाही तर २१०० वर्षं जुना आहे. इ,स. पूर्व १०० वर्षं युनानमधे याचा जन्म झाला. युनानमधे एक फ्लॅट ब्रेड बनवला जात असे ज्याला, प्लेकउंटोज असं म्हणलं जायचं. यावर विविध प्रकारची टॉपिंग केली जात असत.

 

pizza 1 inmarathi

 

६. आज पिझ्झा खाणं चैनीची गोष्ट असली तरिही सुरुवातीच्या काळात मात्र पिझ्झा हे गरिबांचं अन्न होतं. ज्यांना भरपूर भाज्या, फ़ळं, मांस परवडयाचं नाही अशी गरिब जनता ब्रेडवर उपलब्ध असेल ते पसरून भाजून खात असे.

७. युरोपमधील एक समृध्द शहर म्हणून नेपल्सची ओळख आहे. या शहरात कामाच्यानिमित्तानं कामगारवर्ग, श्रमिक वर्ग मोठ्या प्रमाणावर येत असे. या वर्गाला पोटभरीचा मात्र खिशाला परवडेल असा हा पदार्थ रस्त्यावरच्या खाद्य विक्रेत्यांकडून विकला जाऊ लागला. पसरट ब्रेडवर सॉस लावून ग्राहकाच्या मागणीनुसार टॉपिंग्ज टाकून तो ब्रेड विकला जात असे. यात प्रामुख्यानं स्वस्त असणारा लसूण, पोर्क, टोमॅटो यांचा समावेश असे.

८. खिशाला थोडं परवडत असेल तर टॉपिंग्जमधे कॅसिओकॅवलो (घोडीच्या दुधापासून बनविलेलं चीज) टोमॅटो, मासे, पोमोडोरो पास्ता आणि काळी मिरी यांचा समावेश केला जात असे.

 

pizza 2 inmarathi

 

९- १८ व्या शतकात इटलीमधील नेपल्स शहरात रॉफ़ेल एस्पिऑसिटोनं या आधुनिक पिझ्झाला जन्म दिल्याच्या नोंदी आहेत. व्यवसायानं बेकर असणार्‍या रॉफेलनं नेपल्सच्या भेटीला आलेल्या राजा अम्बर्टो प्रथम आणि राणी मार्गरिटा यांना खाऊ घातलेल्या पिझ्झ्यानं जगात इतिहास घडविला.

किंग अम्बर्टॊ आणि क्विन मार्गरिटा १८८९ साली नेपल्स भेटिला आले असता त्यांच्यासाठी रोज फ्रेंच पध्दतीचं जेवण रांधण्यात येत असे. एकाच चवीचे पदार्थ खाऊन राजा राणी कंटाळले होते. त्यातून दोघेही अस्सल खवैय्ये. नेपल्सच्या अधिकार्‍यांना त्यांनी आदेश दिले की चवीला एकदम नविन असणारा एखादा खाद्यपदार्थ बनविला जावा. या पेचातून मार्ग काढण्यासाठी रॉफेलला पाचारण करण्यात आलं.

रॉफ़ेलनं राजा-राणीसाठी तीन प्रकारचे पिझ्झा बनविले. एकात डुक्कर, कॅसिओकॅवलो आणि तुळशीच्या पानांचं टॉपिंग होतं. दुसर्‍यात व्हाईटेबल नावाचा मासा आणि तिसर्‍यावर टोमॅटो, मोजेरेला (म्हशीच्या दुधापासून बनविलेलं इटालियन चीज), तुळशीची पानं यांचं टॉपिंग होतं. महाराणी मार्गरिटाला हा तिसरा पिझ्झा खूप आवडला. तिच्या सन्मानार्थ म्हणून या पिझ्झाचं नाव मार्गरिटा पिझ्झा असं ठेवण्यात आलं जो आज जगभरात सर्वात आवडीनं खाल्ला जाणारा पिझ्झा आहे.

 

queen pizza inmarathi

 

एकंदरित पिझ्झा आणि खव्वैये यांचं नातं घट्ट आहे. दिवसागणिक हे नातं अधिक समृद्ध होतंय यात शंका नाही. एकेकाळी गरिबांचं खाणं असलेला पिझ्झा आजमात्र देशासह परदेशात उंची हॉटेल्समध्ये महागड्या किंमतीत विकला जातो.

अनेक फ्लेवर्स, अनेक चवी… प्रत्येकाची आवड जपणारा पिझ्झा हल्ली ३० मिनिटांच्याही आधी घरी हजर होतो, कुटुंबाचं पोट भरतो आणि पार्टीची चव वाढवतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?