' साडेसहा तासांपेक्षा जास्त झोपेची सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते...

साडेसहा तासांपेक्षा जास्त झोपेची सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या मेंदूला तसेच एकंदरीत शरीराला व्यायाम, मनन, चिंतन, योग, पूरक आणि पोषक आहार या सगळ्यांची जशी गरज असते तशीच उत्तम आणि निरोगी आरोग्यासाठी पूरक झोप म्हणजेच आरामही गरजेचा असतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

आताच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाची सतत धावपळ सुरूच असते, अशा वेळी आपण पूरक आरामाकडे दुर्लक्ष करत राहतो अगदी नकळत.

कामाचा अतिरिक्त ताण, वेळेची कमतरता आणि वाढता कामाचा व्याप या सगळ्यांमुळे मेंदू आणि शरीर थकून जाते. त्यामुळे कधी एकदा घरी जाऊन झोपतो असं होतं. आपल्याला जशी भूक लागते, तशीच झोपही अतिशय महत्त्वाची असते.

 

sleeping inmarathi

 

झोपल्याने मेंदू आणि शरीर दोन्ही फ्रेश, टवटवीत होतात. बऱ्याच जणांना दुपारीही झोपण्याची सवय असते. कधी कधी कामामुळे मेंदू थकला असेल आणि अगदी तासभर जरी छान झोप मिळाली तरी मस्त वाटते. कामाचा उत्साह येतो आणि जास्त उमेदीने काम होते.

रात्रीची झोप ही आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते. यामुळे मेंदूचे कार्य सुधारते, शरीराची रिकव्हरी करण्यास झोप मदत करते, शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते.

खरंतर प्रत्येक व्यक्तीनुसार त्याच्या झोपेची वेळ ठरते, पण काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सर्वांना ७-९ तासांची झोप पुरेशी असते. त्यापेक्षाही जास्त झोप लागत असेल किंवा हवी असेल तर ते मात्र त्रासाचे ठरू शकते.अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

आपल्या मराठी भाषेत एक जुनी म्हण आहे ‘अती तेथे माती’. हे सूत्र झोपेच्या बाबतीत सुद्धा लागू पडते. त्यामुळेच अतिरिक्त झोप आजारांना निमंत्रण देते. कदाचित यावर विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे.

अतिरिक्त झोप ही आकलनशक्तीवर परिणाम करणारी तसेच स्मृतीभ्रंशाला कारणीभूत ठरू शकते.

 

sleep inmarathi

 

कोणतेही आजार होऊ न देण्यासाठी किती झोप आवश्यक आहे हे शोधण्यासाठी एक प्रयोग करण्यात आला. त्यासाठी १०० वयस्कर म्हणजे ७०च्या आसपास असणाऱ्या लोकांना झोपताना उशीखाली झोपेचे मोजमाप करणारे मशीन ठेवण्यास सांगितले. या मशीनला मेंदूतील कृती, उपक्रम, व्यक्ती किती वेळ झोपली, त्या व्यक्तीची आरामाची गरज हे सगळं पाहण्याची परवानगी असते.

हा प्रयोग केल्यानंतर या सर्व लोकांना तपासण्यात आले तर ८८ लोकांना स्मृतीभ्रंशाची लक्षणे नव्हती, तर १२ लोकांना कमी आकलन शक्ती असलेला आजार आहे हे निदर्शनास आले.

संशोधनात सहभागी झालेल्या लोकांची तपासणी केली तेव्हा त्यांच्यात प्रेकॉईनिकल अल्झायमर म्हणजेच मेंदूतील पेशी कमी करणारा, विचारशक्ती कमी करणारा, निर्णय घेण्यास असमर्थ असणारा तसेच बोलण्यात अडथळे निर्माण करणारा आजार दिसून आला.

नंतर या सगळ्यांना झोपेच्या योग्य सवय लावण्यात आल्या आणि त्याचे चांगले परिणाम दिसून आले. अभ्यासानुसार, साडेचार तासांपेक्षा कमी झोप किंवा साडेसहा तासांपेक्षा जास्त झोप ही आकलनशक्ती कमी करण्यास कारणीभूत ठरते असे दिसून आले आहे.

यातील रंजक गोष्ट अशी, की झोपेच्या वेळेचा शरीरावर होणारा परिणाम हा सर्वच वयोगटतील व्यक्तींवर सारखाच दिसून येतो आणि हा सर्वात मोठा धोक्याचा भाग आहे.

 

sleeping girl InMarathi

 

तर एका अहवालानुसार कमी झोप, झोपेत येणारा व्यत्यय किंवा ज्यांना नीट झोप लागत नाही किंवा वेळी अवेळी झोपणाऱ्या लोकांना कमी आकलन शक्ती असण्याचा धोका जास्त असतो.

संशोधननुसार, अती कमी झोप तसेच अतिरिक्त जास्त झोप घेतल्यामुळे शरीरात बीटा अनीलॉइड आणि टाऊ सारखे घातक प्रोटीन मेंदूत तयार होतात जे स्मृतीभ्रंश करण्यास कारणीभूत ठरतात. काही वेळा झोपेचे असणारे कमी जास्त प्रमाण हे आनुवंशिक सुद्धा असू शकते, पण आपल्या मेडिकलमध्ये यासाठी उपचार आहेत ही खूप सुदैवाची बाब आहे. त्यासाठी आपण योग्य व्यायाम तसेच पुरेसा पोषक आहार घेऊ शकतो.

अभ्यासानुसार, जास्त झोपेचे शरीरावर होणारे परिणाम म्हणजे- 

मधुमेह
ताण
डोकेदुखी

 

diabetes inmarathi

 

पण अतिरिक्त झोप ही आजारच निर्माण करते असे नाही. कदाचित एखाद्या आजारपणामुळे जास्त झोप गरजेची असेल, पण ७-९ तासांपेक्षा जास्त झोप लागत असेल किंवा झोप होऊनही आळस असल्यासारखे वाटत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

कधी कधी झोपेत अडथळे निर्माण होतात किंवा झोपमोड होते, नीट झोप पूर्ण होत नाही. जसं की,

घोरण्याची सवय असेल तर

पायात थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर

झोपेत दात खाण्याची सवय असेल तर

झोपेत बडबडण्याची किंवा चालण्याची सवय असेल तर

अशा वेळी सकाळी उठून फिरायला जाणे किंवा सायकल चालवणे असे उपाय आपण करू शकतो.

 

walking 2 inmarathi

 

वयोमानाप्रमाणे जास्त झोप लागणे हे अगदीच स्वाभाविक आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, झोपेचे योग्य प्रमाण असे –

नवजात शिशु (०-३ महिने ) – १४-१७ तास

अर्भक ( ४-११ महिने ) -१२-१५ तास

लहान मुलं ( १-२ वर्षे ) ११-१४ तास

बालवाडी (३-५ वर्षे ) – १०-१३ तास

शाळेतील मुले (६-१३ वर्षे ) -९-११ तास

किशोर वयीन मुले ( १४-१७ वर्षे ) – ८-१० तास

मोठी माणसे (१८-६४ वर्षे ) – ७-९ तास

वयस्कर मंडळी (६५ अधिक ) – ७-८ तास

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?