' धक धक गर्लच्या चिरतारुण्याचं गुपित; झोपण्यापूर्वी नित्यनेमाने केलेली ‘ही’ एक गोष्ट ! – InMarathi

धक धक गर्लच्या चिरतारुण्याचं गुपित; झोपण्यापूर्वी नित्यनेमाने केलेली ‘ही’ एक गोष्ट !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माधुरी दीक्षितची मोहिनी आजही सगळ्या वयोगटातल्या लोकांवर कायम आहे. आजही ती प्रचंड देखणी दिसते. आधीइतकंच उत्तम नृत्य करते. तिच्यातली उत्तम अभिनयकौशल्यं अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून तिने सिद्ध केली आहेत. तिच्या दिलखेचक अदांवर घायाळ नसेल असं कुणीच आढळणार नाही. त्यात ती मराठी. त्यामुळे मराठी माणसांचं तिच्यावर विशेष प्रेम आहे.

 

madhuri dixit 1 inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सिनेकलाकार त्वचेची कशी काळजी घेतात, स्वतःला सुदृढ कसं ठेवतात हे जाणून घेण्यात आपल्याला रस असतो. पण गोष्ट जेव्हा माधुरी दीक्षितची असते तेव्हा आताच्या अनेक तरुण अभिनेत्रींनासुद्धा न्यूनगंड यावा इतकं तिने स्वतःला फ्लॉलेस आणि मेंटेन्ड ठेवलंय. त्यामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्य मुली आणि स्त्रियांनाही माधुरी दीक्षितच्या छोट्यातल्या छोट्या तपशीलांविषयी कौतुक आणि औत्सुक्य आहे.

 

madhuri dixit 2 inmarathi

 

माधुरी दीक्षित तिच्या युट्युब चॅनेलवरून अनेक व्हिडियोज शेअर करत असते. त्यातल्या एका व्हिडियोतून तिने त्वचेची काळजी कशी घेता येईल याच्या काही टिप्स सांगितल्या आहेत.

१. साखर खाणं टाळा :

पिंपल्स येण्यामागचं एक कारण साखर हे आहे. साखरेतल्या ग्लुकोजच्या जास्त पातळीमुळे पुरळही येऊ शकते.

 

sugar inmarathi

 

२. रोज ८ पेले पाणी प्या :

शरीरातले अपायकारक घटक बाहेर टाकायला पाण्यामुळे मदत होते. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि तजेलदार राहते.

 

drinking water girl inmarathi
lokaantar.com

३. तेलकट खाणं टाळा :

त्वचेत जे तेल साठत त्यामुळे ब्लॅकहेड्स आणि पुरळ येऊ शकतं.

 

vada pav inmarathi

 

४. पुरेशी झोप :

रोज ७-८ तास झोपल्यामुळे त्वचेच्या पेशी पुनरुज्जीवित होतात.

 

sleep inmarathi

 

 

५. अख्खी फळं आणि भाज्या खाणे :

एक पेला जूसमधून जितके मिळतील त्यापेक्षा कितीतरी जास्त फायबर्स आपल्याला एका फळातून मिळतात त्यामुळे ज्यूस पिण्यापेक्षा फळं आणि भाज्या खा.

 

fruits inmarathi

 

६. नियमित व्यायाम करा : नियमित व्यायाम केल्याने त्वचेचा तजेला चांगला रहायला मदत होते.

व्यायामाबद्दल बोलताना माधुरी त्या व्हिडियोत म्हणते, “सुदृढ राहणं महत्त्वाचं आहे पण फक्त जिमला जाणं माझ्यासाठी पुरेसं नाही. मी आठवड्यातून तीनदा कथ्थक करते आणि दोनदा व्यायाम करते.”

 

madhuri dixit workout inmarathi

 

तिच्या सकाळच्या स्किनकेअर रूटीनमध्ये ती चेहऱ्याला क्लिन्झर, अल्कोहोल फ्री टोनर, मॉइश्चराईझर आणि एसपीएफ लावते. रात्री झोपण्यापूर्वी ती चेहऱ्याचा मेकअप काढते. त्यानंतर क्लिन्झर, टोनर, व्हिटॅमिन सी सेरम आणि मॉइश्चराईझर लावते.केवळ रात्री झोपण्यापूर्वीच माधुरी ‘व्हिटॅमिन सी सेरम’ चेहऱ्याला लावते.

माधुरी म्हणते, ” व्हिटॅमिन सी ही माझ्यादृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ते एक अँटीऑक्सिडंट आहे. चेहऱ्यावर येणारे छोटे छोटे डाग ते वापरून जातात. सी व्हिटॅमिनमुळे चेहऱ्याला तजेला येतो.”त्या व्हिडियोत तिने चेहऱ्याला मॉइश्चराईझर कसं खालून वर लावत जावं ते सांगितलं आहे. कुठलंही नवं प्रॉडक्ट चेहऱ्याला लावण्यापूर्वी त्याची ऍलर्जी चेहऱ्याला येऊ नये म्हणून ती आधी ते तिच्या मनगटाला किंवा मानेला लावून बघते आणि मगच ते चेहऱ्याला लावते असंही तिने त्या व्हिडियोत म्हटलंय.

याखेरीज माधुरी त्वचेकरता बेसनाचाही वापर करते. ‘वोग’ला दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली होती, “बेसन, मध आणि लिंबाच्या रसाच्या मिश्रणाचा फेसपॅक त्वचेसाठी उत्तम असतो.”

बेसनामुळे त्वचेची रंध्र मोकळी होऊन नको असलेले घटक त्वचेबाहेर पडतात त्यामुळे बेसनाचा स्क्रबसारखा उपयोग होतो. बेसनात जे जस्त असतं त्यामुळे पुरळ होत नाही, कोमेजलेल्या त्वचेला ते तजेला आणतं आणि डँड्रफही होण्यापासून रोखतं. सगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी बेसन चालू शकतं.

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर बेसन आणि दूध यांच्या मिश्रणाचा फेसपॅक तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही बेसन दह्यात कालवून चेहऱ्याला लावू शकता.

 

besan face pack inmarathi

 

“काकडी दुधात बुडवून चेहऱ्याला लावणे हा माझा आणखीन एक आवडता घरगुती उपाय आहे.”, असंही माधुरी म्हणते. डल स्कीन असणाऱ्यांसाठी हा उत्तम उपाय आहे.

माधुरी दीक्षितने सुचवलेल्या या टिप्सपैकी बऱ्याचश्या टिप्स बऱ्यापैकी सोप्या आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांना परवडण्यासारख्याही आहेत. आपण स्वतःच्या त्वचेची काळजी घ्यायला त्यांचा विचार करायला काहीच हरकत नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?