' कतरीना-विकीच्या लग्नासाठी राजस्थान सज्ज; ७०० वर्षं जुन्या किल्ल्यात पार पडणार सोहळा

कतरीना-विकीच्या लग्नासाठी राजस्थान सज्ज; ७०० वर्षं जुन्या किल्ल्यात पार पडणार सोहळा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या सोशल मीडियावर एकाच जोडप्याची चर्चा आहे ती म्हणजे विकी कौशल आणि कतरीना कैफ! लवकरच आपले लाडके स्टार्स लग्नबेडीत अडकणार अशा बातम्या गेले काही आठवडे सतत कानावर पडत आहेत.

खुद्द विकी किंवा कतरीना यांनी याबद्दल काहीच वाच्यता केली नसली तरी सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून याविषयी सगळे अपडेट लोकांना मिळत आहेत.

 

vicky katrina inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपला लग्नसोहळा हा अत्यंत खासगी विधी असल्याने कतरीना आणि विकी यावर मौन बाळगून असले तरी त्यांचं लग्न कुठे होणार आहे, कसं होणार आहे, कोण कोण पाहुणे असणार आहेत इथपासून अगदी पाहुण्यांसाठी आखलेली नियमावली इथपर्यंत सगळी माहिती सध्या सगळ्या मीडिया प्लॅटफॉर्मवर बघायला मिळेल.

याबाबत नुकतंच राजस्थान प्रशासनाने स्पष्टीकरण दिल्याने या चर्चेला पुन्हा नवीन वळण मिळालं आहे. काही मीडिया रेपोर्टनुसार गेल्या शुक्रवारी सवाई माधोपुरचे जिल्हाधिकारी राजेंद्र किशन यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली.

या बैठकीत वेडिंग प्लॅनर, हॉटेल मालक, पोलिस अधिकारी अशा लोकांना बोलावण्यात आलं असून या लग्नाच्या दरम्यान राजस्थानमधल्या सुव्यवस्थेवरसुद्धा चर्चा करण्यात आली.

 

rajasthan inmarathi

शिवाय या लग्नसोहळ्यादरम्यान ट्राफिक आणि ट्रान्सपोर्टेशनमध्ये कोणताही अडथळा येणार नाही, त्यासंदर्भात पावलं उचलली गेली आहेत अशी ग्वाहीसुद्धा अध्यक्षांनी दिली आहे!

कलेक्टरच्या म्हणण्यानुसार हा विवाह सोहळा ७ ते १० डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे, आणि या सोहळ्यासाठी तब्बल १२० पाहुण्यांची सोय करण्यासाठी राजस्थान प्रशासन तत्पर आहे!

शिवाय राजेंद्र किशन यांनी स्पष्ट केले की “या सोहळ्यादरम्यान कोविड नियमांचं काटेकोरपणे पालन केले जाईल, येणाऱ्या पाहुण्यांचे २ डोस पूर्ण झाले पाहिजेत आणि ज्यांचे २ डोस झाले नसतील त्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असणार आहे!”

 

covid protcol inmarathi

 

हे सगळे नियम पाहुण्यांना आधीच सांगण्यात आले असून त्यापद्धतीनेच हा विवाह सोहळा पार पडेल असं आश्वासन राजस्थान प्रशासनाने दिले आहे.

खरंतर लग्नाची औपचारिक घोषणा झालेली नसली तरी ४ डिसेंबरपासूनच पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे, आणि याच पार्श्वभूमीवर राजस्थान सरकार सतर्क राहून या सोहळ्याचं आयोजन करणार आहे!

बरवाडा किल्ल्यात बऱ्याच पाहुण्यांचं बुकिंग करून ठेवण्यात आलं आहे. तर काही स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार विकी आणि कतरीना हे ६ डिसेंबर रोजी माधोपुरमध्ये येतील.

राजस्थानच्या उदयपूरमध्ये याआधी बरेच असे शाही विवाह सोहळे झाले आहेत पण सवाई माधोपुरमधला हा पहिला एवढा मोठा विवाह सोहळा आहे!

सवाई माधोपुरच्या ७०० वर्षं जुना इतिहास असलेल्या बरवाडा किल्ल्याचे रूपांतर नुकतंच एका शाही हॉटेलमध्ये करण्यात आलं आहे. याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात या हॉटेलचं उद्घाटन झालं आणि प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा ही तेव्हा या उद्घाटनासाठी उपस्थित होती.

 

barwada fort inmarathi

 

पोलिस अधीक्षक राजेश सिंह यांनीसुद्धा मीडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितल की अजूनतरी त्यांना कोणत्याही खास पाहुण्यांची, VVIP लोकांची लिस्ट दिली गेलेली नाही.

शिवाय लग्नात आमंत्रित पाहुण्यांनासुद्धा या लग्नाचा बोलबाला कुठे करू नये अशी विनंती करण्यात आली आहे. एकंदरच विकी कतरीना यांचं हे लग्न या अशा बऱ्याच उलट सुलट कारणांमुळे चर्चेत आलंय, पण अजूनही हे दोन्ही कलाकार यावर काहीच स्पष्टीकरण देत नाहीयेत!

एकीकडे मीडियाच्या माध्यमातून लग्नाची एवढी सगळी माहिती बाहेर जात असूनसुद्धा या सगळ्याबाबतीत गुप्तता पाळण्यात विकी आणि कतरीनाचा नेमका काय उद्देश आहे हे त्या दोघांनाच ठाऊक!

 

vicky katrina inmarathi 2

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?