' “प्रियांका, हा अवॉर्ड तुझ्यासाठी नव्हताच…” आशुतोषचा नाराजीचा सूर! – InMarathi

“प्रियांका, हा अवॉर्ड तुझ्यासाठी नव्हताच…” आशुतोषचा नाराजीचा सूर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूडमध्ये येणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. इथे येण्यासाठी आणि त्याहीपेक्षा महत्वाचे इथे टिकून राहण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. इथे करिअर घरवण्यासाठी,एखादा रोल मिळवण्यासाठी खूप लोकं वेगवेगळ्या ठिकाणी ऑडिशन्स देत असतात, सतत प्रयत्न करत असतात.

फिल्म जगतात येण्यासाठी प्रचंड मेहनत आणि अनेक अडचणींचा सामना करून इथे यश मिळवणारे कित्येक अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या बॉलिवूडमध्ये आहेत.

 

bollywood stars imarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अशा लोकांचे कौतुक करण्यासाठी,त्याच्या कामाचे,मेहनतीचे पारितोषिक देण्यासाठी दरवर्षी फिल्मफेअर अवॉर्ड सोहळाचे मोठ्या दिमाखात आयोजन केले जाते. ही परंपरा कित्येक वर्षांपासून अद्यावत सुरूच आहे आणि राहील.

प्रियांका चोप्रा हे भरघोस यश मिळवलेल्या अभिनेत्रीपैकी एक आहे. प्रियांका चोप्राने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगने केली होती पण आज तिचे यश फक्त बॉलिवूड पुरतेच मर्यादित नसून हॉलिवूड पर्यंत पोहचले आहे.आज तिचे लाखो करोडो फॅन्स तिच्या फिल्मची आतुरतेने वाट पहात असतात.

अर्थात या मागे तिची प्रचंड मेहनत तर आहेच पण हा टप्पा पार करण्यासाठी तिला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले आहे. प्रत्येक ठिकाणी यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष तर करावाच लागतो, आपल्या मेहनतीच्या बळावर यश मिळवले तरी मागे खेचणारे लोक असतातच असतात अगदी सगळीकडे.

तसेच प्रियांका चोप्राला मागे खेचणारे खूप लोक होते. याची प्रचिती २००९ मध्ये झालेल्या फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यात सगळ्यांनाच आली. २००९ मध्ये प्रियांका चोप्राला फॅशन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला होता.

 

priyanka chopra inmarathi 2

 

हा अवॉर्ड घेताना ती म्हणाली होती या पुरस्कारासाठी मला नामांकन मिळाले यासाठी मला खूप आनंद होत आहे पण माझ्यापेक्षा सुंदर ऐश्वर्या राय आणि हुशार काजोलसारख्या अभिनेत्री असताना मला या पुरस्कारासाठी पसंती मिळाली ही खूप आनंदाची गोष्ट आहे.

याच सोहळ्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनाही बेस्ट दिग्दर्शक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता, चित्रपट होता जोधा अकबर. २००८ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट घवघवीत यश मिळवून गेला होता.

या चित्रपटात ऐश्वर्या रायने जोधाबाई ची भूमिका साकारली होती तर हृतिक रोशननी मुघल बादशाह जलाल उद्दिन मोहम्मद अकबरची भूमिका साकारली होती.

 

aishwarya rai jodha akbar inmarathi

लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले होते. आशुतोष गोवारीकर हे ऐतिहासिक चित्रपट देण्यासाठी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. आजवर त्यांनी पानिपत, लगान, जोधा अकबर, मोहेंजो दारो असे खूप सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

पुरस्कार स्वीकारण्यासाठी जेव्हा ते स्टेज वर आले तेंव्हा मात्र ते प्रियांका चोप्रावर नाराज झाले. ते म्हणाले “प्रियांका, I love you पण मला कळत नाही की तुझ्यासमोर ऐश्वर्यासारखी अभिनेत्री नामांकन यादीत असताना तुला हा पुरस्कार कसा मिळाला. हे यासाठी असेल की तू खूप मेहनती आहेस आणि ऐश्वर्या राय नॅच्युरल आहे.”

आशुतोष गोवारीकर तसेच जया बच्चन यांचेही हेच म्हणणे होते. प्रियांका चोप्रा यावर काहीच बोलली नाही पण ती दुखावली मात्र होती. तिने हे तिच्या कुटुंबातील व्यक्तींना आणि तिच्या जवळच्या काही लोकांनाही बोलून दाखवले होते.

खरंतर प्रियांका चोप्राला मिळालेला पुरस्कार ही तिच्या कामाला प्रेक्षकांनी दिलेली पावती होती. त्याबद्दल तिचे कौतुक करायचे सोडून इतक्या दिग्गज मंडळीसमोर पुरस्कार सोहळ्यात तिचा असा केलेला अपमान किंवा व्यक्त केलेली नाराजी हे खरंच आशुतोष गोवारीकर यांना शोभा देणारं नाही.

 

ashutosh and priyanka inmarathi

 

त्यांनी कमावलेले नाव आणि जोधा अकबर चित्रपटाने मिळवलेले यश यामुळे हा पुरस्कार ऐश्वर्यालाच मिळेल असे त्याला वाटले असेल, पण तसे झाले नाही त्यामुळे ते असे बोलले असतील कदाचित.

आशुतोष गोवारीकर आणि प्रियंका चोप्रामध्ये यामुळे काही रुसवे फुगवे होते पण नंतर त्यांनी ते मिटवले पण होते .याचाच एक उत्तम उदाहरण म्हणजे २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या व्हॉट्स यूअर राशी या चित्रपटासाठी दोघांनी एकत्र काम केले होते.

शिवाय प्रियांकाची निर्मिती असलेल्या वेंटीलेटर या मराठी सिनेमातसुद्धा आशुतोष गोवारीकरने महत्वाची भूमिका साकारली होती!

 

priyanka chopra ventilator inmarathi

 

प्रियांका चोप्राने दाखवलेल्या समंजसपणामुळे आणि मोठेपणामुळे हे शक्य झाले. यासाठी प्रियांका चोप्राचे जितके कौतुक केलं जाईल तितके कमीच आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?