' बरेचजणं बोलतांना 'टचवूड' हा शब्द का वापरतात? यामागचं रंजक कारण!

बरेचजणं बोलतांना ‘टचवूड’ हा शब्द का वापरतात? यामागचं रंजक कारण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या रोजच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक चांगल्या घटना घडत असल्या, की आपण आनंदी तर असतो पण मनात कुठेतरी सुप्त भीती सुद्धा असते, की या आनंदात मिठाचा खडा पडून सगळ्यावर विरजण तर पडणार नाही ना? आपल्या आनंदाला कोणाची दृष्ट तर लागणार नाही ना? ही भीती मनात असतेच. कारण या जगात मत्सर करणाऱ्यांची अजिबात कमी नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

दुसऱ्याचे भले झाले, समोरचा आनंदात असला, की असल्या मत्सरी, विघ्नसंतोषी लोकांच्या पोटात लगेच दुखायला लागते. “भला उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे” असा विचार करून दुसऱ्याच्या आनंदाबद्दल, उत्कर्षाबद्दल मत्सर बाळगणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला असतात.

कुणाचा विश्वास असो वा नसो पण घरातील ज्येष्ठ स्त्रिया नक्कीच चांगल्या प्रसंगानंतर उत्सवमूर्तीची मीठमोहरीने, मिरच्यांनी अगदी केरसुणीने देखील दृष्ट काढतात. नवीन लग्न झालेल्या जोडप्याची आणि गोजिरवाण्या लहान बाळाची तर दृष्ट आवर्जून काढली जाते.

 

salt inmarathi

 

दृष्ट लागणे यावर मतांतरे असली, तरीही चांगल्या वाईट व्हाइब्स असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी असते हे तर आपल्याला मान्य करावेच लागेल.

आता तुम्ही म्हणाल, की दृष्ट बिष्ट असल्या अंधश्रद्धा फक्त आपल्याकडे असतात, बाकी देशांत कुठे असले काही असते? तर असे नाही. चांगल्या वाईट व्हाइब्स असतात आणि आपण जर काही चांगली इच्छा व्यक्त केली असेल तर तिच्यात कुणी खोडा घालू नये म्हणून इंग्लिश मध्ये देखील ‘टच वुड’ असे म्हणतात, पण आपण “टच वूड” नक्की का म्हणतो याचा विचार कधी केला आहे का?

यामागे अनेक ऐतिहासिक समजुती आहेत. त्यापैकी आपल्या निसर्गपूजक पूर्वजांचा एक समज असा आहे, की झाडे म्हणजे पऱ्या, आत्मे आणि इतर पौराणिक जीवांचे वास्तव्याचे स्थान आहे. म्हणूनच, लाकडावर दोनदा ठोठावण्याची परंपरा होती, पहिल्यांदा झाडाला स्पर्श करून झाडाला आपल्या मनातील इच्छा सांगायची आणि दुसऱ्यांदा स्पर्श करून झाडाला धन्यवाद म्हणायचे.

 

touchwood inmarathi

आपण जसे वड , पिंपळ, औदुंबर अश्या अनेक झाडांना पवित्र मानून त्यांची पूजा करतो त्याचप्रमाणे जगातील इतर भागातील लोक सुद्धा झाडांची पूजा करत असत आणि त्यांना देवांचे घर मानत असत. त्यांची श्रद्धा होती, की अशा प्रकारे लाकडाला स्पर्श केल्याने नशीब उजळते आणि मनातील इच्छा पूर्ण होतात.

हा समज जगात सगळीकडे इतका सर्रास कसा पसरला आहे याचा कोणताही भक्कम पुरावा नसला तरी,अनेक पौराणिक कथा आणि दंतकथांप्रमाणे लाकडाला स्पर्श केला म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात होली क्रॉसच्या लाकडाला स्पर्श करत आहात, ज्यामुळे तुमचे नशीब उजळू शकते आणि तुम्हाला देवाचे संरक्षण मिळू शकते.

एक समज असाही होता, की झाडावर दोनदा ठोठावल्याने झाडामध्ये राहणाऱ्या दुष्ट आत्म्यांचे लक्ष विचलित होते आणि त्यांना तुमच्या इच्छा ऐकायला जात नाही आणि मग ते तुमच्या इच्छा पूर्ण होण्यात अडथळा आणू शकत नाहीत.

गमतीचा भाग असा, की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, कुठल्याही धर्माच्या लोकांना भेटा, जवळजवळ सगळ्याच ठिकाणी टचवुड सारखाच एखादा वाक्प्रचार लोक कायम बोलण्यात वापरतात.

 

touchwood inmarathi1

 

जसे की ब्राझील मधील लोक “Bater Na Madeira” असे म्हणतात ज्याचा टच वुड सारखाच अर्थ होतो, तर इंडोनेशिया मधील लोक दृष्ट लागू नये म्हणून “Amit-Amit” असे म्हणतात तसेच इराण मध्ये “Bezanam Be Tachte” आणि ग्रीस मध्ये χτύπα ξύλο chtýpa xýlo (नॉक ऑन वुड) असे म्हणतात.

आपण भारतीय लोक सुद्धा नकारघंटा वाजवणाऱ्या व्यक्तीला “शुभ बोल रे नाऱ्या” म्हणतो कारण आपलीही श्रद्धा आहे, की वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते म्हणूनच कायम शुभ तेच बोलावे!

थोडक्यात सांगायचे तर जगात कुठेही गेलो तरीही मानवी भावना आणि स्वभाव सारखेच आहेत. ईर्ष्या, मत्सर, द्वेष ह्यांसारख्या कोणत्याही नकारात्मक भावनांपासून स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण करणे आणि चांगल्या भविष्यासाठी आपल्या आशा आणि आकांक्षांचे रक्षण करणे हा सर्वसामान्य मानवी स्वभाव आहे.

म्हणूनच एकविसाव्या शतकात जग इतके पुढे गेलेले असूनही लोक अजूनही कुठली चांगली इच्छा व्यक्त केली की ‘टच वुड’ म्हणतात ह्यात आश्चर्य वाटून घेण्यासारखे काहीही नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?