' "मनमोहन सिंग आणि मोदी यांच्यात 'हा' फरक आहे", ज्योतिरादित्य यांचं वक्तव्य...

“मनमोहन सिंग आणि मोदी यांच्यात ‘हा’ फरक आहे”, ज्योतिरादित्य यांचं वक्तव्य…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या लोकांमध्ये देशातल्या राजकारणाविषयी एकाच विषयावर चर्चा सुरू असते ती म्हणजे २०२४ मध्ये मोदी पुन्हा निवडून येणार का? अर्थात ह्या चर्चेला आत्ता काहीच अर्थ नाही कारण अजून निवडणूक बऱ्याच लांब आहेत, पण तरीही मोदी सरकार विरोधात सगळेच विरोधी पक्ष कसे एकजूट झाले आहेत हे चित्र आपल्याला गेल्या काही काळात दिसलं!

नुकताच ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यामधून आणि एकंदरच तृणमूल कॉंग्रेसच्या पवित्र्यावरून हे स्पष्ट होतंय की येणाऱ्या निवडणुकांमध्ये नक्कीच काहीतरी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

modi oppositions inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

असो हा सगळा भाग झाला राजकरणाचा, पण नुकतंच सिव्हिल एविएशन मिनिस्टर ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या चर्चेला उधाण आलं आहे.

अजेंडा आज तक या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांना मोदी आणि मनमोहन सिंग यांच्यातला फरक विचारला तर त्यांनी “नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व result oriented आणि dynamic आहे!” असं म्हणत स्पष्टीकरण दिलं.

या कार्यक्रमात जेव्हा नरेंद्र मोदी आणि मनमोहन सिंग यांच्या कार्यप्रणालीबद्दल विचारणा झाल्यावर सिंधिया म्हणाले “या दोन्ही व्यक्तींची तुलना कधीच होऊ शकत नाही कारण दोघांच्या व्यक्तिमत्वात आणि कार्यपद्धतीत जमीन आसमानाचा फरक आहे, पण दोन्ही नेत्यांपैकी पंतप्रधान मोदी हे रिजल्टवर लक्षकेंद्रित करण्यात आणि योग्य निर्णय घेण्यात सर्वोत्तम आहेत!”

 

jyotiraditya with modi inmarathi

आपल्या अनुभवाविषयी ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की “गेले काही महीने माझ्यासाठी सुवर्णसंधीच होती, या सरकारच्या कॅबिनेटमध्ये काम केल्याचा फायदाच झाला आहे, शिवाय माझ्यासारख्या कित्येकांसाठी ज्यांची पार्श्वभूमी ही बँकिंग क्षेत्राची आहे त्यांच्यासाठी तर ही खूप उत्तम संधी होती!”

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या दोन्ही सरकारच्या कॅबिनेटमध्ये महत्वाचं मंत्रिपद भूषवलं आहे.

राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणाऱ्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी २०२० मध्ये कॉंग्रेसमधून बाहेर पडत भाजपामध्ये प्रवेश केला आणि यावर्षी जुलै मध्ये त्यांना कॅबिनेटमध्ये जागादेखील मिळाली.

 

jyotiraditya with rahul inmarathi

 

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेस सोडल्याने मध्यप्रदेशमध्ये कोंग्रेसला चांगलाच फटका बसला, त्यांच्यासोबत इतर २५ आमदारांनीसुद्धा राजीनामा देऊन ज्योतिरादित्य सिंधियासोबत भाजपामध्ये प्रवेश घेणं पसंत केलं आणि यामुळेच मध्यप्रदेशमधल्या कॉंग्रेसच्या सरकारला उतरती कळा लागली!

खरंतर इतकी वर्षं कॉंग्रेसशी निष्ठावान असलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अचानकपणे भाजपामध्ये उडी घेणं आणि आज मनमोहन सरकार आणि मोदी सरकार यांच्यातला फरक मांडणं हे जरा विचित्र वाटतं खरं पण हेच सत्य आहे कारण यालाच राजकारण असे म्हणतात, इथे कधीही काहीही होऊ शकतं!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?