' बाथरूम मध्ये गॅस गिझर वापरताय? सावधान अपघात टाळण्यासाठी या टिप्स वापरा! – InMarathi

बाथरूम मध्ये गॅस गिझर वापरताय? सावधान अपघात टाळण्यासाठी या टिप्स वापरा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

खूप थकून घरी गेल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करण्याचं सुख काहीतरी वेगळंच. पूर्वी पाणी तापवण्यासाठी मोठे बंब वापरले जायचे. त्यानंतर गॅसवर पाणी तापवलं जायचं, पण त्याला बराच वेळ जायचा म्हणून आता आपण घरात गिझर वापरतो. अनेकांकडे गॅस गिझर वापरला जातो तर काहीजण इलेक्ट्रॉनिक गिझर वापरतात.

गॅसवर पाणी तापवण्यापेक्षा गिझर वापरणं सोप्पं असलं तरीसुद्धा हा गिझर वापरताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

हिवाळ्यामध्ये प्रत्येकजण गरम पाण्यानेच आंघोळ करतो. पाणी गरम होण्यासाठी भरपूर वेळ देखील लागू शकतो, परंतु ही समस्या गॅस गिझर सोबत येत नाही असे सामान्य जनमानसामध्ये मत आहे. त्यासोबतच, गॅस गिझर खर्चाच्या दृष्टीने देखील फायदेशीर आहे.

 

gas geyser 1 inmarathi

 

असं सगळं असताना गॅस गिझर सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण करणारी एक घटना काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये घडली. दहावीत शिकणारी मुलगी गॅस गिझरच्या अपघाताला बळी पडली आहे.

बाथरूम मधील गॅस गिझर मधून विषारी वायू बाहेर पडल्यामुळे गुदमरून त्या मुलीचा मृत्यू झाला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

आपल्यापैकी अनेक जण गॅस गिझर चा वापर नक्कीच करत असतील. गॅस गिझर वापरताना अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कुठल्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊया या लेखामध्ये….

गॅस गिझर मध्ये “एलपीजी” लीक्वीफाईड पेट्रोलियम गॅस वापरला जातो. सर्वसामान्यपणे पाणी गरम करण्यासाठी गॅस गिझर सर्वात स्वस्त पर्याय म्हणून बघितला जातो. अनेक सर्वसामान्य घरांमध्ये याचा सर्रास वापर होताना आपण बघू शकतो.

पण काही दिवसांपूर्वी घडलेल्या मुंबईतील घटनेमुळे गॅस गिझर च्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

gas geyser 3 inmarathi

 

गॅस गिझर मधून कधीतरी काही कारणास्तव कार्बन डाय-ऑक्साइड नावाचा विषारी वायू सोडला जातो. या प्रक्रियेला गॅस गिझर सिंड्रोम असे म्हणतात.

हा वायू गॅस गिझर मधील वायू लीक झाल्यामुळे निर्माण होतो आणि या अपघाताला जास्तकरून २० ते ४० या वयोगटातील तरुणच बळी पडलेले आहेत.

एका संशोधनानुसार, भारतासोबतच आशियातील इतरही काही देशांमध्ये गॅस गिझर सिंड्रोमचे प्रकार अलीकडच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याचे लक्षात आले आहे. या सिंड्रोममुळे अर्धांगवायुचा देखील धोका उद्भवू शकतो.

गॅस गिझरबद्दल माहिती देताना एस. एल. रहेजा या प्रसिद्ध इस्पितळातील डॉक्टर संजीत संसीरण असे म्हणतात की,

गॅस गिझर घरगुती स्तरावरती मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. इतर पर्यायांपेक्षा गॅस गिझर स्वस्त पडत असल्यामुळे याची मागणीदेखील चांगलीच वाढलेली आहे. अपघाताप्रसंगी जर चुकून कोणी या वायूंच्या संपर्कात आलं तर त्याच्या जीविताला धोका देखील होऊ शकतो.

 

गॅस गिझर सिंड्रोमची लक्षणे काय आहेत आणि त्याच्यावर उपचार काय आहेत?

 

gas geyser 2 inmarathi

 

जर एखादा व्यक्ती गॅस गिझर सिंड्रोमला बळी पडला तर तो बेशुद्ध पडू शकतो त्याला श्‍वास घ्यायला देखील त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत तब्येत आणखी बिघडल्यास तो मनुष्य कोमा मध्ये देखील जाऊ शकतो किंवा co2 पॉइझनिंग मुळे तो कार्डियाक अरेस्ट ला देखील बळी पडू शकतो.

अशा परिस्थितीत पेशंटच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करून घ्याव्यात. जेणेकरून परिस्थिती डॉक्टरांच्या लवकर लक्षात येईल. अशा परिस्थितीत पेशंटवर ऑक्सिजन थेरपी वापरली जाते.

 

cardiac arrest inmarathi

 

जेणेकरून, विषारी वायूंचा झालेला नकारात्मक परिणाम कमी करता येईल. जर वेळीच उपचार नाही केले तर पेशंटच्या जिवाला देखील धोका उद्भवू शकतो किंवा या घटनेचे अनेक चुकीचे परिणाम पेशंटच्या आयुष्यावर ती होऊ शकतात.

 

असे कुठले उपाय आहेत जे केल्याने गॅस गिझर सिन्ड्रोमला आपण बळी पडणार नाही?

 

१. अगदी लहान घरगुती वाटणारी वस्तू जरी आपण योग्य पद्धतीने नाही वापरली आणि वापरताना योग्य काळजी नाही घेतली गेली तर ती गोष्ट आपल्यासाठी किती हानिकारक होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे गॅस गिझर होय.

 

bathroom inmarathi

 

अनेक जण परिस्थितीपासून अनभिज्ञ आहेत, आपल्या बाथरूममध्ये पुरेशी हवा खेळती राहावी. असा प्रयत्न करावा जेणेकरून, गॅस लीक जरी झाला तरी खेळत्या हवेमुळे कोणीही या परिस्थितीला बळी पडणार नाही.

बाथरूममध्ये हवा खेळती राहावी ही अशा परिस्थितीतील पहिली प्राथमिक गरज आहे.

२. आपल्यामध्ये गॅस गिझर सिंड्रोम ची काही लक्षणे दिसत आहेत का याचा विचार करावा.

 

head ache inmarathi

 

उदाहरणार्थ, डोकेदुखी, दुबळेपणा किंवा छातीत दुखणे आणि जर यापैकी काहीही वाटत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

३. सरतेशेवटी महत्त्वाचे एवढेच आहे की, गॅस गिझरचा अनियंत्रित वापर कमी करण्यात यावा आणि जर वापरायचं असेल तर गॅस गिझर बाथरूमच्या बाहेर फीट करण्यात यावं.

जेणेकरून हवा पुरेशी खेळती राहील आणि कोणी गॅस गिझर सिंड्रोमला बळी पडणार नाही.

४. जर कधी तुम्हाला काही अनुचित घडत आहे असे जाणवले तर त्वरित बाथरूम मधील एक्झॉस्ट फॅनचा वापर करावा. जेणेकरून विषारी वायू त्यामार्गे बाहेर निघून जाईल.

 

vent fans inmarathi

 

५. सर्वात महत्त्वाचं, वेळोवेळी गॅस गिझरचं चेकिंग करण्यात यावं. यामुळे गॅस गिझर मध्ये काही बिघाड असल्यास आपल्या लक्षात येईल आणि आपण अपघातापासून लांब राहू  शकू.

 

gas geyser chekcing inmarathi

 

६.  आपल्यापैकी अनेकांना सवय असते की, जर गिझर सकाळी चालू केला तर सर्वांचं स्नान झाल्याशिवाय बंद केलं जात नाही. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे.

गिझर सारखा चालू ठेवल्यामुळे त्यामध्ये बिघाड होण्याच्या शक्यता वाढतात त्यामुळे शक्यतो गिझर च्या वापरामध्ये सुरक्षित वेळेचं अंतर ठेवलं गेलं पाहिजे.

जर आपण आपल्या घरी गॅस गिझर नियमित पणे वापरत असाल तर वर सांगितलेल्या गोष्टींचा नक्की विचार करा आणि उपाययोजनांचा देखील वापर करा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?