' ‘टायटॅनिक समुद्रात बुडालं’, याव्यतिरिक्त तुम्हाला माहित नसलेल्या २० गोष्टी जाणून घ्या… – InMarathi

‘टायटॅनिक समुद्रात बुडालं’, याव्यतिरिक्त तुम्हाला माहित नसलेल्या २० गोष्टी जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

टायटॅनिक जहाज म्हणजे आजही जगासाठी कुतुहलाचा विषय आहे.

टायटॅनिक जहाजाबद्दल अनेक अभ्यासक आजही कित्येक वर्षानंतर अभ्यास करत आहे, ते कसे बुडाले यावर ते अजूनही एकमत होत नाहीये!

असो, आज आम्ही देखील तुम्हाला टायटॅनिक जहाजाबद्दल अश्याच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या आजही कित्येकांसाठी अज्ञातच आहेत.

 

titanic-marathipizza02

 

१. टायटॅनिक त्याच्या काळातील सर्वात महागडे आणि भव्य जहाज होते. हे जहाज इंग्लंडच्या साउथंप्टन पासून न्यूयॉर्क पर्यंत प्रवासाला निघाला होता.

टायटॅनिक खूप मजबूत होते आणि त्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने खूप उपाय केले होते,असे असून सुद्धा ते आपल्या पहिल्याच यात्रेत एका बर्फाच्या तुकड्याला टक्कर लागून बुडाले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

२. हा अपघात १४ एप्रिल १९१२ च्या रात्री ११:४० वाजता झाली होता आणि २:२० वाजता पूर्ण जजहाजाला जलसमाधी मिळाली.

३. समुद्री इतिहासातील सर्वात दु:खद घटना टायटानिकच्या या अपघातात १५१७ लोक मारले गेले होते.

४. बर्फाचा तुकड्याला ज्या क्षणी टायटॅनिक धडकले , त्या आधी फक्त ३० सेकंद पूर्वी तो बर्फाचा तुकडा दिसला असता तर जहाजाची दिशा बदलली जाऊ शकली असती आणि हा भीषण अपघात टाळता आला असता.

५. टायटॅनिक जहाजात धूर बाहेर जाण्यासाठी ४ स्मोकस्टेक्स लागले होते. हे टायटानिकच्या फोटोंचा अविभाज्य भाग राहिले आहेत.

परंतु त्यातील एक केवळ डेकोरेटीव पीस होता, तो काम करत नसे. त्याला फक्त सजावटीसाठी लावण्यात आले होते.

 

titanic-marathipizza01

 

६. त्या भयानक रात्री अटलांटिक महासागरात कॅलिफोर्नीयम नावाचे अजून एक जहाज होते, ते टायटॅनिक पासून जास्त दूर पण नव्हते, परंतु त्याला सूचना मिळायला वेळ लागला, त्यामुळे त्याला तिथे पोहचायला उशीर झाला आणि ते टायटॅनिक मधील जास्त प्रवाशांना वाचवू शकले नाही.

७. टायटॅनिकचा अपघात होण्याच्या एक दिवस आधी लाइफबोट ड्रिलचा सराव होणार होता, पण शेवटच्या क्षणाला हा सराव रद्द करण्यात आला.

जर ही ड्रिल झाली असती, तर अपघाताच्या वेळी लाइफबोट्सचे व्यवस्थापन चांगल्याप्रकारे करण्यात आले असते.

८. टायटॅनिक चित्रपटात दाखवलेल्या सर्वात भावूक भागामध्ये जहाजाची जेव्हा बर्फाच्या तुकड्याला टक्कर लागल्यानंतरही म्युझिक बँडचे सदस्य गातच असतात. खऱ्या अपघातावेळी ही असेच झाले होते.

९. अपघातानंतर खूप प्रवासी लाइफबोटच्या सहाय्याने आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले, पण अजूनही लोकांचे जीव वाचले असते कारण लाइफबोट मध्ये त्याच्या क्षमतेपेक्षा कमी माणसे बसली होती.

१०. हे तर खूप मनोरंजक सत्य आहे की, खऱ्या टायटॅनिकला बनवण्यासाठी जेवढा खर्च झाला होता त्यापेक्षा जास्त खर्च कॅमरूनचा ‘टायटॅनिक’ चित्रपट बनवण्यात झाला.

titanic movie inmarathi

 

११. टायटॅनिकला संपवणारा बर्फाचा तुकडा अपघात होण्यापूर्वी २९०० वर्षापासून त्या ठिकाणी  होता.

१२. जगाच्या इतिहासातील बर्फाच्या तुकड्याला धक्का लागून जलसमाधी मिळालेले टायटॅनिक हे एकमात्र मोठे जहाज आहे.

१३. टायटॅनिक मध्ये अशी १३ जोडपी होती जी आपला हनीमून साजरा करण्यासाठी आली होती.

१४. टायटॅनिक जहाजाला रोज ८०० टन कोळशाचे इंधन लागत होते.

१५. टायटॅनिक मध्ये लावलेल्या शिट्टीचा आवाज ११ मैलांपर्यंत जायचा.

 

titanic-marathipizza04

१६. टायटॅनिक जहाजाचे कॅप्टन स्मिथ ह्या यात्रेनंतर निवृत्ती घेण्याच्या तयारीत होते, परंतु दुर्दैवाने हा प्रवास त्यांच्या जीवनातील शेवटचा प्रवास ठरला.

१७. टायटॅनिक जहाजात ९०० टन वजनाच्या बॅगा आणि बाकी माल ठेवला होता.

१८. टायटॅनिक जहाजावर दैनंदिन १४००० गॅलन पाणी वापरले जात असे.

१९. जहाजातील १६ लाइफबोट वापरण्यासाठी जवळपास ८० मिनिट लागले.

पहिल्या लाइफबोटमध्ये फक्त २८ लोक बसले होते कारण बाकी लोकांना वाटलेच नाही की टायटॅनिक बुडेल.

२०. टायटॅनिक जेव्हा बुडाले तेव्हा ते आपल्या प्रवासाच्या चौथ्या दिवसात होते आणि जमिनीपासून जवळपास ६०० किलोमीटर लांब होते. टायटॅनिकला त्या बर्फाच्या तुकड्याचा धक्का लागण्याअपूर्वी सहा वेळा सावधानीचा इशारा देण्यात आला होता.

 

titanic real inmarathi

 

असं हे जहाज आजही समुद्राच्या तळाशी अनेक कटू आठवणी साठवून विसावले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?