' ऑनलाईन पेमेंट करण्याआधी हे बदललेले नियम नीट वाचा, नाहीतर...

ऑनलाईन पेमेंट करण्याआधी हे बदललेले नियम नीट वाचा, नाहीतर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या आजूबाजूच्या गोष्टी इतक्या झपाट्याने बदलत चालल्या आहेत की २-३ वर्षांपूर्वी फार नवी असलेली एखादी गोष्ट आज आपल्याला अजिबात नवी राहिलेली नसते. तंत्रज्ञानाने कधी आपल्या हातात हात घेतला आणि आपण रोजच तो पकडून चालायला लागलो ते आपलं आपल्याही लक्षात आलं नाही.

रोजच्या धावपळीत तितका विचार करायला आपलयाकडे वेळही नाही. आज कुणीही टेक्नोसॅव्ही व्हायचं बाकी राहिलेलं नाही हे मात्र खरं! अगदी आजीआजोबांची पिढीही याला अपवाद नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

वयस्कर मंडळीही हल्ली व्हॅट्सऍप, युट्यूब वापरून स्वतःचं मनोरंजन करून घेत असतात, पण मनोरंजनापुरतंच हे मर्यादित राहिलेलं नाही.आपल्या दैनंदिन कामांमधली अनेक महत्त्वाची कामं करण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाशिवाय गत्यंतर उरलेलं नाही आणि सगळ्या वयोगटातलया माणसांनी हे निर्विवाद मान्य केलंय. त्यामुळे उद्या अगदी आपल्या आजीने असे ऑनलाईन व्यवहार केले तरी आश्चर्य वाटायला नको.

ऑनलाईन पेमेंट ही आता काळाची गरज झाली आहे. आपलं कार्ड आपल्या सोबत असेल तर फार पैसे जवळ न ठेवता ऑनलाईन पेमेंट करणं सहज शक्य आहे. आपल्यातले बहुतेक जण आता ऑनलाईन पेमेंटला चांगलेच सरसावले असतील. डीमार्टला जाऊन खरेदी करण्यापासून ते मोठमोठे व्यवहार करण्यापर्यंत सगळं आपण ऑनलाईन पेमेंटद्वारे करत असतो.

 

online payment inmarathi

 

ऑनलाईन पेमेंट ही गोष्ट आपल्या इतकी अंगवळणी पडत चाललीय की ती आपल्या रोजच्या आयुष्यातून बाद करण्याचा विचारही आपल्या मनाला शिवणार नाही. पण आपल्याला अपडेटेड रहावं लागतं. आपण जर अपडेटेड राहीलो नाही तर नुकसान आपलंच होणार असतं.

‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गुगलद्वारे नियमांमध्ये बदल होत आहेत ज्याचा थेट परिणाम ऑनलाईन पेमेंटच्या सुविधेचा वापर करणाऱ्यांवर होणार आहे. हा नवीन नियम गुगल ऍड्स, युट्युब, गुगल प्ले स्टोअर अशा सर्व गुगल सेवा आणि इतर पेमेंट सुविधांना लागू होईल.

१ जानेवारी २०२२ पासून हे बदल करण्यात येणार आहेत. ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या कुणीही या बदलांकडे काणाडोळा न करता जागरूक रहावे.

online payment card inmarathi

 

१. यापूर्वी गुगलद्वारे तुमच्या कार्डचे तपशील जतन केले जायचे. प्रत्येकवेळी नव्याने तुम्हाला ते तपशील टाकावे न लागता तुमचं काम होऊन जायचं. पण आता तसं होणार नाही. १ जानेवारी २०२२ पासून गुगल तुमचा कार्ड क्रमांक आणि एक्स्पायरी डेट जतन करणार नाही.

पूर्वी आपल्याला ऑनलाईन पेमेंट करताना फक्त आपला ‘सीव्हीव्ही’ नंबरच टाकायला लागायचा पण यापुढे मॅन्यूअल ऑनलाईन पेमेंट करताना आपल्याला इतरही तपशील टाकावे लागतील. कार्ड क्रमांकाबरोबरच कार्डची एक्स्पायरी डेट प्रत्येक वेळी लक्षात ठेवावी लागेल.

 

visa card inmarathi

 

२. पूर्वी आपण पेमेंट करताना जेव्हा फक्त ‘सीव्हीव्ही’ नंबर टाकायचो तेव्हा संवेदनशील माहिती गुगलबरोबर जतन व्हायची. डेटा सुरक्षेच्या दृष्टीने ते धोक्याचं होतं. त्यामुळे ही संवेदनशील माहिती सुरक्षित रहायला हवी म्हणून ती जतन न करण्याच्या सूचना आरबीआयला देण्यात आल्या आहेत.

३. तुम्ही जर ‘व्हिसा’ किंवा ‘मास्टर कार्ड’ वापरत असाल तर नवीन फॉरमॅटमध्ये तुमच्या कार्डचे तपशील जतन करण्यासाठी तुम्हाला ते तपशीलऑथोराईज्ड म्हणजेच अधिकृत करावे लागतील.

४. तुम्ही ‘रूपे’, ‘अमेरिकन एक्स्प्रेस’,’डिस्कव्हर’ आणि ‘डिनर्स’ ही कार्डे वापरत असाल तर ३१ डिसेंबर २०२१ नंतर गुगलद्वारे या कार्डांचे तपशील जतन केले जाणार नाहीत. नवा फॉरमॅट या कार्डांना स्वीकारत नाही. त्यामुळे १ जानेवारी २०२२ पासून तुम्हाला मॅन्यूअल पेमेंट करताना कार्डचे तपशील टाकावे लागतील.

वेळोवेळी होणाऱ्या या नवनव्या बदलांबरोबर स्वतःला जुळवून घेत त्याप्रमाणे जगायला आपण शिकलेलोच आहोत. ऑनलाईन पेमेंटच्या नियमांमधले हे बदलही आपण नजरेआड होऊ देऊन चालणार नाहीत.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?