' Resume मधील या ९ चुका टाळा, मग भरघोस पगाराच्या नोकरीची दारं खुली होतील...

Resume मधील या ९ चुका टाळा, मग भरघोस पगाराच्या नोकरीची दारं खुली होतील…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चांगली नोकरी मिळवण्यासाठी माणूस किती धडपड करतो! आता लॉकडाऊननंतर तर चांगल्या पगाराची नोकरी मिळावी म्हणून माणसं करता येतील तेवढे सगळे प्रत्यत्न करत आहेत.

‘रिझ्युम’ ही नोकरीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब. नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही मुलाखतीला जाल तेव्हा मुलाखत घेणाऱ्यांचं मत जितकं तुमच्या व्यक्तिमत्त्वाकडे बघून चांगलं होणं महत्त्वाचं आहे तितकंच ते तुमचा ‘रिझ्युम’ बघूनही चांगलं व्हायला हवं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पण असं असलं तरी आपला रिझ्युम नक्की कसा असायला हवा हे आपल्याला माहीत असतंच असं नाही आणि आपण आपल्या अंदाजाने आपला हा रिझ्युम तयार करतो. मुद्दे भरकटून हा रिझ्युम भलामोठा होऊन वाचणाऱ्यासाठी कंटाळवाणाही ठरू शकतो.

जर आपण आपल्या सीव्हीकडे म्हणावं तितकं लक्ष देत नसू तर तसं करणं टाळूया. आपल्या रिझ्युममध्ये हमखास होणाऱ्या या चुका नजरेतून सुटायला नकोत.

१. रिझ्युमवर तुमचा फोटो लावण्याचा फार विचार करू नका. ते काही तितकं महत्त्वाचं नाही. जर तुमच्या कामाचा अनुभव ७ वर्षांपेक्षा कमी असेल तर एका पानापेक्षा जास्त तुमचा रिझ्युम वाढवू नका.

मला मायक्रोसॉफ्ट वर्ड येतं, एक्सेल येतं या गोष्टी तुम्ही कुठे नोकरी करणार आहात ते बघून लिहायचं की नाही ते ठरवा. तुमच्या करिअरचं उद्दिष्ट थोडक्यात लिहा. त्यावर उगीच फार ओळी खर्च करू नका.

 

girl giving interview inmarathi

 

२. हल्ली नोकरीसाठी इतके उमेदवार अर्ज करत असतात की कंपनीज ते शॉर्टलिस्ट करायला सॉफ्टवेअरचा वापर करतात. त्यामुळे तुम्ही नेमका कशासाठी अर्ज करताय ते नेमकं आणि थोडक्या शब्दांत लिहा. ‘कॉन्टेक्स्ट-ऍक्शन-रिझल्ट’ हे ‘सीएआर’ फ्रेमवर्क वापरा. लिहिताना ठोस क्रियापदं वापरा जेणेकरून वाचणाऱ्यांचं त्याकडे पटकन लक्ष वेधलं जाईल.

३. रिझ्युमच्या शेवटी तुमच्या छंदांविषयी थोडक्यात लिहायला काहीच हरकत नाही. त्यामुळे मुलाखत घेताना मुलाखत घेणाऱ्याबरोबरच्या तुमच्या संभाषणात मोकळेपणा यायला मदत होईल.

 

interview 1 inmarathi

 

४. तुम्ही रिझ्युम देता तेव्हा एका प्रकारे तुम्ही स्वतःलाच नोकरी देणाऱ्याच्या पुढ्यात ठेवत असता. सगळं न लिहिता तुम्ही कशाकशात सगळ्यात जास्त प्राविण्य मिळवलं आहे ते नेमकेपणाने रिझ्युममध्ये लिहा. तुमचा रिझ्युम वाचणं वाचणाऱ्यासाठी कंटाळवाणं करू नका. तुमची तिथली भूमिका समजून घेऊन त्याप्रमाणे तुमच्या बलस्थानांविषयी लिहा.

 

resume inmarathi

 

५. तुमचा धर्म किंवा तुमचा विवाह झाला आहे की नाही हे रिझ्युममध्ये लिहिण्याची काही आवश्यकता नाही.

६. सगळीकडे सरसकट एकच रिझ्युम पाठवू नका. ज्या नोकरीच्या ठिकाणी ज्या कौशल्यांची नेमकी गरज असेल, जो अनुभव लिहिणं गरजेचं असेल तो त्या त्या ठिकाणांसाठी आणि त्या त्या नोकऱ्यांसाठी वेगवेगळा लिहा.

वाक्यांचं सामान्यीकरण करणं टाळा. जी व्यक्ती तुम्हाला नोकरी देणार आहे तिच्या जागी स्वतःला ठेवून विचार करा. आपण या कंपनीच्या कसे उपयोगी पडू शकू याचा विचार लिहिताना करा.

७. तुमच्या रिझ्युमच्या पहिल्या अर्ध्या पानातून जर नोकरीवर घेणाऱ्याला तुम्ही नेमकं काय करता किंवा तुम्ही नेमके कशात उत्तम आहात याची कल्पना येत नसेल तर तुमचा सीव्ही बाद होण्याची शक्यता वाढेल.

 

interview 2 inmarathi

 

८. १२वी पास इतकंच जर तुमचं शिक्षण झालं नसेल तर तुमच्या रिझ्युममध्ये तुम्हाला उगीच तुमचे १०वीचे मार्क टाकण्याची आवश्यकता नाही. तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्या १०वीच्या मार्कांना तितकी किंमत राहत नाही.

९. फोटो लावणार असाल तर तुमचा फोटो शक्यतो स्पष्ट आणि फॉर्मल असू दे.

आता सगळं काही डिजिटल झालेलं असताना तुम्ही प्रत्यक्ष मुलाखतीला भेटायला जाण्यापूर्वी तुमचा रिझ्युम नोकरीच्या ठिकाणांवर पोहोचण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे रिझ्युममधून पडणारी तुमची पहिली छाप सांभाळणं तुमच्या हातात नक्की आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?