' Covaxin ची लस म्हणजे ओमिक्रोन वर ब्रुसलीसारखा हल्ला – ICMR स्टडी… – InMarathi

Covaxin ची लस म्हणजे ओमिक्रोन वर ब्रुसलीसारखा हल्ला – ICMR स्टडी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

साऊथ आफ्रिकेत नव्याने दाखल झालेल्या ओमिक्रॉन या कोरोनोच्या नव्या व्हेरियंटची दहशत जगभर पसरली आहे. प्रत्येक देशाने नियमांचा विळखा आवळलाय, प्रवासावर निर्बंध लादलेत आणि जास्तीत जास्त वेगाने लसीकरण होईल याची दक्षता घेतली जात आहे.

अर्थात कोरोनाच्या या फोफावणाऱ्या राक्षसावर विजय मिळवण्यासाठी कोणती लस सर्वात प्रभावी आहे? मुळ कोरोनाच्या विषाणुपेक्षा या व्हेरियंटला उपचारांमुळे आळा घालता येईल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. मुळात ही समस्याच नव्याने निर्माण झाल्याने जगभरातील शास्त्रज्ञ, तज्ञ या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत.

 

omicron 1 inmarathi

 

भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी प्रामुख्याने दिल्या गेल्या आहेत. मात्र आयसीएमआरने नुकतेच जाहीर केलेल्या निरिक्षणांमुळे कोव्हॅक्सिन घेतलेल्यांना दिलासा मिळाला आहे.

 

कोव्हॅक्सिन घेतलेल्यांना धोका कमी 

आयसीएमआर अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने याबाबत आपली निरिक्षणं नोंदवली आहेत. साऊथ आफ्रिकेतून जगभरात फोफावणारा ओमिक्रॉन व्हेरियंटचा सध्या अभ्यास सुरु असला तरी एकंदरित या व्हेरियंटची लक्षणं लक्षात घेतली तर कोव्हॅक्सिनची लस अधिक प्रभावी ठरू शकेल असा अंदाज बांधण्यात आला आहे.

कोव्हॅक्सिन ही लस भारत बायोटेकतर्फे तयार करण्यात आली आहे. इतर लसींच्या तुलनेत ही लस कोरोनावर ५०-५४ टक्के परिणामकारक असल्याचे यापुर्वी सिद्ध झाले आहे. परिणामी अनेक महिन्यांपर्यंत या लसीला परदेशातील अनेक देशांनी परवानगी दिली नव्हती. त्यामुळेच कोव्हॅक्सिन घेतलेल्या भारतीयांना सहाजिकच त्याबाबतची भिती वाटत होती.

दोन महिन्यांपुर्वी बहुतांश सर्व देशांनी या लसीला अधिकृत परवानगी दिली आहे. मात्र यापाठोपाठ आता आयसीएमआरने आणखी एक शुभवार्ता दिली आहे.

आयसीएमआरच्या तज्ञांच्या मते, ”कोव्हॅक्सिन लस बनवताना कोरोनाच्या व्हेरियंट्सचा विचार केला होता. त्यामुळेच कोरोनाच्या पहिल्या विषाणुसह इतर डेल्टा, बिटा, गॅमा यांसारख्या गंभीर व्हेरियंट्सवरही कोव्हॅक्सिन प्रभावी ठरल्याचे यापुर्वीच समोर आले होते.

कोव्हॅक्सिन घेतलेल्या भारतीयांमध्ये अॅन्टिबॉडिज तयार होण्याचे प्रमाण जास्त असल्याने वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉनपासून संरक्षण कवच देण्यात ही लस अधिक प्रभावी ठरू शकेल असे तज्ञांनी म्हटले आहे. अर्थात डेल्टा व्हेरियंट्सबाबतही हा निकष योग्य ठरल्याने ओमिक्रॉनसारख्या नव्याने येणाऱ्या व्हेरियंट्सबाबतही याच अभ्यास लागू पडतो असेही त्यांनी म्हटले आहे.

 

covaxin inmarathi

 

त्याचप्रमाणे भारताची लोकसंख्या आणि यापुढेही भविष्यात येऊ पाहणारे नवे व्हेरियंट्स यांचा विचार करत ही लस बनवण्यात आली असल्याने याचा फायदा या नव्या म्युटेशनवरही होऊ शकतो.

अर्थात असे असले तरी याबाबत अद्याप ठोस अहवाल सादर झालेल्या नसल्याने अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अद्याप ओमिक्रॉनच्या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी मिळालेले नाहीत. तसे नमुने मिळाले तर कोव्हॅक्सिनची लस या व्हेरियंटवर किती टक्के प्रभावी ठरू शकेल? याचा निश्चित अंदाज बांधता येईल असेही आयसीएमआरच्या तज्ञांनी म्हटले आहे.

ओमिक्रॉनच्या या नव्या व्हेरियंटमध्ये स्पाईक प्रोटिनमध्ये सातत्याने म्युटेशन आढळले आहे. या म्युटेशनचे प्रमाण अधिक असल्याने कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. मात्र बहुतांश लसींमुळे निर्माण होणाऱ्या अॅन्टिबॉडिज या स्पाईक प्रोटीनवर मात करणाऱ्या असल्याने कोरोनाच्या या नव्या व्हेरियंट्सवर सर्वच लसी प्रभावी ठरतील असा आशावादही व्यक्त केला जात आहे.

कोरोनाची दुसरी लस घेण्यास उशीर झाला तर? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरं

जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला टोचली गेलेली लस या भारतीयाने निर्माण केली आहे

भारत बायोटेकचे मौन

कोव्हॅक्सिन लस ही प्रभावी ठरू शकेल असा अंदाज आयसीएमआरने व्यक्त केला असला तरी कोव्हॅक्सिन लसची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.

कोव्हिशिल्डबाबत खुलासा नाही

कोव्हिशिल्ड घेतलेल्यांना अद्याप दिलासा मिळाला नसून ही लस नव्या व्हेरियंट्सवर किती टक्के प्रभावी ठरू शकेल? याबाबत अद्याप कोणताही दावा करण्यात आलेला नाही.

 

covid vaccine inmarathi

 

याशिवाय या दोन्ही लसींचे बुस्टर डोस दिले जाणार आहेत का? असल्यास ते सामान्यांसाठी कधी उपलब्ध होतील? याबाबतही अद्याप तज्ञांनी माहिती दिली नसल्याने संभ्रम कायम आहे.

सध्या जगभरात सर्वच लसींची परिणामकारकता, नवनव्या व्हेरियंट्सवर मात करण्याची ताकद याबाबत संशोधन सुरु असल्याने येत्या काळात याबाबतचा ठोस निष्कर्ष समोर येतील.

परिणाम काहीही असो असले असले तरी लस घेतली म्हणजे आपण पुर्णतः सुरक्षित झालो असे नाही. यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक सर्वच नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?