' १२, १६ आणि कधी तब्बल १३६ वर्षांनंतर येणारी ही फुलं; भारतातल्या निसर्गाची किमया – InMarathi

१२, १६ आणि कधी तब्बल १३६ वर्षांनंतर येणारी ही फुलं; भारतातल्या निसर्गाची किमया

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

निसर्ग किमयागार आहे. त्याने जीवसृष्टीतल्या प्रत्येकाला आपली आपली म्हणून काही वैशिष्ट्ये दिली आहेत. अत्यंत विविधता असूनही निसर्ग ते सगळं उत्तम नियंत्रणात ठेवतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

माणूस मात्र त्याच्या या विविधतेकडे पाहून विस्मयचकित होतो. निसर्गाच्या कुशीत अशी अनेक रहस्यं आहेत ज्यांचा नेहमीच माणूस शोध घेत आलाय. अशीच रहस्यं काही फुलांच्या बाबतीतही आहेत. भारतात अशी काही दुर्मिळ फुलं आहेत जी अनेक वर्षांनी उमलतात.

१. टोपली कारवी :

 

topali karavi inmarathi

 

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आढळणाऱ्या ‘कारवी’ या वनस्पतीची प्रजाती असलेले ही फुले. ‘कारवी’ ही पर्यावरणदृष्ट्या फार महत्त्वाची वनस्पती मानली जाते. ही वनस्पती दाटीवाटीने उगवते त्यामुळे उतारावरील जमिनीची धूप होत नाही.

कारवीच्या अनेक प्रजाती आहेत त्यातली ‘टोपली कारवी’ ही एक प्रजाती. कारवीचे झाड जमिनीलगत झुडुपाप्रमाणे घुमटाच्या आकारात वाढते. पालथ्या घातलेल्या टोपलीसारखा त्याचा आकार दिसतो म्हणून त्याला ‘टोपली कारवी’ असे म्हटले जाते.

पश्चिम घाटमाथ्यालगत सर्वत्र डोंगरउतारावर आणि पठारावर टोपली कारवी आढळते. उघड्या उतारावरील माळरानावर टोपली कारवी उगवते त्यामुळे तिला ‘माळ कारवी’ असेही म्हणतात.

काही शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून असे समोर आले आहे, की टोपली कारवी दर सात वर्षांनी बहरते. ७ वर्षें फक्त पावसाळ्यातच या वनस्पतीला पालवी फुटते आणि मग लगेचच झडून जाते. ती खाण्यासाठी बकऱ्यांची झुंबड उडते त्यामुळे याला ‘बकरा कारवी’ असेही म्हणतात. आठव्या वर्षात मात्र टोपली कारवीला प्रचंड प्रमाणात निळ्या-जांभळ्या रंगाच्या फुलांचा बहर येतो.

२. सुपुष्पा :

supushpa inmarathi

 

सुपुष्पा ही वनस्पती म्हणजे कारवीचीच एक प्रजाती. महाबळेशवरमधल्या डोंगरांच्या शिखरांच्या काही भागांत सुपुष्पा ही वनस्पती आढळते. तिला ‘पिचकोडी’ असेदेखील म्हटले जाते. दर १६ वर्षांनी ही वनस्पती बहरते.

जांभळ्या रंगाची ही सुपुष्पा वनस्पती नुकतीच महाबळेश्वरमध्ये बहरली आहे. १६ वर्षांनी ही वनस्पती बहरते आणि त्यानंतर लगेचच मरून जाते.

ही वनस्पती मेल्यानंतर त्याच्या बियांपासून पुन्हा नव्याने तिची निर्मिती होते. यासाठी सुपुष्पाच्या फुलांचे परागीभवन होणे आवश्यक असते. मधमाशी, फुलपाखरे आणि अन्य कीटकांमार्फत हे परागीभवन होते. यंदा हे परागीभवन व्यवस्थित व्हावे यासाठी महाबळेश्वर मधील कॅसल आणि सावित्री हे दोन पॉईंट्स १० दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

३. नीलाकुरींजी :

 

neelakurinji inmarathi

 

केरळमधील ‘इडुक्की’ जिल्ह्यात नीलाकुरींजीच्या फुलांना बहर येतो. ही फुलं बहरण्यासाठी १२ वर्षांचा कालावधी जावा लागतो. नीलकुरींजी हे नाव तिथल्याच आदिवासी लोकांनी या फुलांना दिले आहे.

दर १२ वर्षांनी ही फुले फुलल्यानंतर लगेचच सुकतात आणि मग पुन्हा ही फुले फुलण्यासाठी १२ वर्षें वाट बघावी लागते. ऑगस्ट ते ऑक्टोबर या एवढ्याच कालावधीत या फुलांना बहर येतो.

नीलाकुंजीरीची ही फुले फक्त भारतातच फुलतात. केरळखेरीज तामिळनाडूमध्येही ही फुले आढळतात. ही फुले बघायला पर्यटक खूप गर्दी करतात.

४. ‘हंस’ फुले :

 

hansa flower inmarathi

 

खरंतर या फुलांचे खरे नाव ‘ग्लोबा अंडरसोनी’ असे आहे. सिक्कीम आणि दार्जिलिंगमधील पर्वतरांगांमध्ये ही फुले आढळतात. या वनस्पतीला ‘डान्सिंग लेडीज’ किंवा ‘स्वॉन फ्लॉवर्स’ असे म्हणतात. त्यांचा आकार हंसासारखा दिसतो म्हणून त्यांना ‘हंस’ फुले म्हणतात.

१८७५ मध्ये ब्रिटिश बॉटनिस्ट सर जॉर्ज किंग यांना ही ‘हंस’ फुले पहिल्यांदा आढळली होती. अतिशय घनदाट जंगल आणि खडकांवर ही वनस्पती आढळते. ही फुले अतिशय धोकादायक म्हणून समजली जातात. २०२० साली तब्बल १३६ वर्षांनी ही फुले सिक्कीममध्ये आढळली होती.

हे बहर जेव्हा जेव्हा येतील तेव्हा रंगांची उधळण झालेली ही ठिकाणं पहायला पर्यटकांनी नक्की यावे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?