' रेखाच्या या वागणुकीमुळे व्हायची अमिताभची चिडचिड, हट्टाने बदलायला लावली सवय – InMarathi

रेखाच्या या वागणुकीमुळे व्हायची अमिताभची चिडचिड, हट्टाने बदलायला लावली सवय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अमिताभ – रेखा ही जोडी बॉलिवूड मधील सर्वात लोकप्रिय जोडी आहे आणि नेहमीच असेल. या दोघांचं नाव जरी एकत्र घेतलं तरी बॉलिवूडच्या अस्सल चाहत्यांच्या कानात “देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए” हे गाणं वाजायला लागतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१९७६ मध्ये ‘दो अंजाने’ या सिनेमासाठी एकत्र आलेली ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. रेखा – अमिताभ यांच्या पडद्यावर एकत्र दिसतांना प्रेक्षकांना एक वेगळीच ‘केमिस्ट्री’ बघायला मिळाली, जी त्यांना यापूर्वी कधीच दिसली नव्हती.

 

rekha amitabh inmarathi

 

आज ४५ वर्षांनी सुद्धा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र आल्यावर कॅमेरामन या दोघांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपण्यासाठी प्रयत्न करत असतांना आपण बघत असतो.

या सुंदर जोडीच्या मैत्रीची सुरुवात ही एका मतभेदापासून झाली होती हे कदाचित आपल्याला माहीत नसेल. सिम्मी गरेवाल यांच्या शो मध्ये आणि नंतर आपल्या ‘रेखा : द अनटोल्ड स्टोरी’ या आपल्या आत्मचरित्रात रेखाने स्वतः ही माहिती दिली आहे. काय मतभेद होते? जाणून घेऊयात.

२६ नोव्हेंबर १९७६ रोजी प्रदर्शित झालेला ‘दो अंजाने’ हा सिनेमा दुलाल गुहा या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला होता. प्रेम चोप्रा, उत्पल दत्त, ललिता पवार, प्रदीप कुमार आणि मिथुन चक्रवर्ती या कलाकारांचा सुद्धा स्टारकास्ट मध्ये समावेश होता.

 

rekha amitabh inmarathi1

 

अमिताभ आणि रेखा हे एकमेकांना या सिनेमाच्या शुटिंगच्या दरम्यान सर्वप्रथम भेटले होते. अमिताभ यांची काम करण्याची पद्धत, कामावर असलेली श्रद्धा या गोष्टींची चर्चा सिनेवर्तुळात प्रसिद्ध होत होती. अमिताभ यांचं व्यक्तिमत्त्व इतकं प्रभावशाली होतं, की रेखा या तेव्हा त्यांच्याकडे बघून आपले संवाद विसरून जायच्या.

आपल्या स्पष्ट स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या रेखा यांनी सिम्मी गरेवाल यांच्याशी बोलतांना असं सांगितलं होतं की, “मी माझ्या आयुष्यात अमिताभ यांच्या इतका देखणा पुरुष कधी बघितलाच नाही. सेटवर त्यांची वावरण्याची पद्धत, व्यवसायिक दृष्टिकोन हे मला त्यापूर्वी आणि त्यानंतर कधीच बघायला मिळाला नाही. अमिताभ यांना भेटल्यानंतर माझी विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली. मी हे प्रत्यक्ष त्यांना त्यावेळी सांगू शकले नव्हते. पण, माझ्या डोळ्यांनी हे त्यांना नक्कीच सांगितलं असेल.”

‘दो अंजाने’च्या शुटींगच्या वेळी रेखा यांच्यात आणि अमिताभ यांच्यात सेटवर वेळेवर न येणे आणि संवाद विसरणे या गोष्टीवरून नेहमीच वाद व्हायचे. एका सीनच्या वेळेस तर अमिताभ यांनी रेखा यांना बारीक आवाजात “सुनिये, जरा डायलॉग याद कर लिजीएगा” असं सांगितलं होतं.

 

rekha amitabh inmarathi2

 

सेटवरील प्रत्येक माणसाच्या वेळेची अमिताभ यांना किंमत होती. दिलेल्या वेळेची आधी येऊन त्या दिवशीच्या सीनचा सराव करणे ही त्यांची सवय होती. शुटिंगच्या ठिकाणी वेळेवर न येण्यामुळे सुरुवातीचे कित्येक दिवस अमिताभ आणि रेखा यांच्यात मतभेद होते.

एके दिवशी अमिताभ यांनी रेखाजींना कामाचं, वेळेचं महत्त्व समजावून सांगितलं. दुसऱ्या दिवशी रेखा या शुटींगच्या ठिकाणी बरोबर सकाळी ६ वाजता पोहोचल्या होत्या.

रेखा यांच्या वतीने लेखक यासीर उस्मान यांनी आत्मचरित्रात असं लिहिलं आहे की, “तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचाआहे. मी तो दिवस, ती समज कधीच विसरू शकत नाही. त्या दिवसानंतर मी माझं काम अधिक गांभीर्याने करू लागले. मला अमिताभ यांच्यासारखा मित्र मिळाला याबद्दल मी नेहमीच स्वतःला नशिबवान समजते.”

‘दो अंजाने’ या सिनेमानंतर या दोघांनी कित्येक हिट सिनेमातून काम केलं.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?