' “बिकिनीतली डॉक्टर” – सोशल मीडियावर बिकिनी घातलेल्या डॉक्टर्सचे फोटो व्हायरल – InMarathi

“बिकिनीतली डॉक्टर” – सोशल मीडियावर बिकिनी घातलेल्या डॉक्टर्सचे फोटो व्हायरल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या झी मराठी चॅनेलवर काही नव्या सिरियल्सचे प्रोमो झळकत आहेत. आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम पुन्हा एकदा नव्या रूपात येणार असं दिसतंय आणि विशेष म्हणजे प्रशांत दामले. संकर्षण कऱ्हाडे यांच्या बरोबरीला निर्मिती सावंत देखील असणार आहेत असे सध्या तरी प्रोमोमध्ये दिसून येतंय.

 

zee marathi inmarathi

 

हे झालं नव्या मालिकांचे, देवमाणूस या सिरीयलचा देखील पुढच्या सीजनचा प्रोमो सध्या झळकतोय त्यामुळे साहजिकच या सिरियलच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. एका क्लिनिकमध्ये काम करणारा साधा कंपाउंडर गावातील लोकांना स्वतः डॉक्टर असल्याचे भासवून महिलांना लुबाडून नंतर त्याचे खून करतो अशा धर्तीवर पहिला सीजन बेतला होता आता पुढच्या सीजनमध्ये नेमकं काय असणार आहे ते कळेलच.

 

 

एकूणच आपल्याकडे डॉक्टरी पेशा हा खरंतर चर्चेचा विषय आहे. मागच्या वर्षी पासून डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून रुग्णाचे प्राण वाचवले आहेत, मात्र तरीदेखील आज अनेक डॉक्टरांवर हल्ले होते आहेत. काही बोगस डॉक्टरांमुळे संपूर्ण डॉक्टरी पेशावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसून येत आहे.

 

indian guy doctor inmarathi
kokilaben hospital

 

डॉक्टर देखील आपल्या समस्यांसाठी अनेकदा मोर्चे निषेध नोंदवत असतात, मात्र मागच्या वर्षी डॉक्टरी पेशात एका वेगळाच  ट्रेंड व्हायरल होता, काय आहे तो ट्रेंड चला तर मग जाणून घेऊयात…

journal of vascular  surgery यांच्या अभ्यासाच्या निकालानुसार,’ सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या पोस्टवरून अनेक रुग्ण आपापले डॉक्टर निवडतात. या निष्कर्षामध्ये प्रामुख्याने पुरुष मंडळी आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की, ज्या महिला डॉक्टरांनी आपले बिकिनी, मद्यपान करणारे फोटो तसेच राजकीय मते सोशल मीडियावर टाकले आहेत अशी मंडळींचा सोशल मीडियावरचा वावर आहे पूर्णतः त्यांच्या पेशाला साजेसा नाही थोडक्यात unprofessional आहे.

 

bikni 2 inmarathi

 

या प्रकारच्या अभ्यासासाठी संशोधकांनी सोशल मीडिया माध्यमाचा वापर करून त्यावरून अशा महिलांच्या सोशल मीडिया अकाउंट तपासले होते. पुरुष मंडळींनी केलेल्या उभा निष्कर्षावर साहजिकच महिलांनी ताशेरे ओढले होते आणि या गोष्टीचा विरोध करण्यासाठी त्यांनी देखील #Medbikni या नावाने सोशल मीडियावर ट्रेंड सुरु केला होता.

 

bikni 1 inmarathi

आज खरं तर जगभरात स्त्री पुरुष समानता हा चर्चेचा विषय बनला आहे, फक्त भारतातच नव्हे तर जगभरात सुद्धा पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा आजदेखील अनेक ठिकाणी आढळून येताना दिसून येतो.

 

bikni inmarathi 1

 

रुग्णांसाठी खरं तर स्त्री पुरुष असे कोणीच नसते त्याला आपल्याला झालेला आजार बरा करणारा डॉक्टर महत्वाचा असतो.

 

bikni inmarathi

 

भारताप्रमाणे इतर देशांमध्येदेखील स्त्रीकडे एक उपभोगाची वस्तू म्हणून बघितले जाते, स्त्रियांना फक्त  कपड्यांवर जज करणारे भारतीयच नव्हे तर पाश्चात्य देशांमधील पुरुष सुद्धा यामध्ये मोडतात. हे या प्रकरणाने समोर आले आहे. स्त्रियांना काय परिधान करावे हा खरं तर त्या स्त्रीचा खरं तर आज स्त्रिया चूल मुलं या संकलपेनला छेद देऊन वेगवेगळ्या क्षेत्रात  नाव कमावत आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?