' ओमिक्रोन ठरणार मानवजातीसाठी वरदान? वाचा, तज्ज्ञांचा सिद्धांत – InMarathi

ओमिक्रोन ठरणार मानवजातीसाठी वरदान? वाचा, तज्ज्ञांचा सिद्धांत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेली २ वर्षे कोरोनामुळे आपण घरात अडकून पडलो होतो. कुठे बाहेर जायची सोय नव्हती, की कोणाला भेटता येत नव्हतं. सण- समारंभ, लग्नसराई या सगळ्या गोष्टी कोरोनाच्या उदासीतच गेल्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हा वेळ कधी जाईल आणि कोरोनापूर्व काळ कधी येईल असं सगळ्यांना झालं होतं. लसीकरणाचे वाढते आकडे पाहून सगळ्यांच्या मनात आशेचा किरण होता. लवकरच सगळं पूर्ववत सुरु होईल अशी आशा होती आणि तसं झालंही.

मागील एक- दोन महिन्यात कोरोनाची बंधनं थोडी शिथिल झाली. लोक घराबाहेर पडू लागली. कोरोनाच्या आधीचा काळ पुन्हा येणार असं सगळ्यांना वाटू लागलं.

तोंडावर असलेला मास्क हळूहळू खाली येऊ लागला तोच बातम्या येऊ लागल्या, की दक्षिण आफ्रिकेत पुन्हा एक नवीन व्हायरस निर्माण झाला आहे. ओमिक्रोन असे या व्हायरसचे नाव आहे.

 

corona virus inmarathi

 

हा नवा भयानक विषाणू आल्याने सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरलेले आहे, आपल्या देशात सुद्धा काही शहरांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेले काहीजण संशयास्पद आढळून आल्याने सगळ्यांचे धाबे दणाणले आहेत.

कोरोनासारखा या व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून सरकारने खबरदारी बाळगली आहे, शिथिल केलेली बंधने आता पुन्हा कडक करण्यात आली आहेत, पण या नव्या व्हायरसच्या येण्यामागे अनेक तज्ज्ञ अनेक सिद्धांत मांडत आहेत.

यातलाच एक सिद्धांत मनाला सुखावणारा आहे. ओमिक्रोन हा व्हायरस आपल्याला कोरोनापासून कायमची सुटका मिळवून देऊ शकतो. काय आहे हा सिद्धांत? वाचा

ओमिक्रोन या व्हायरसचे येणे लोकांसाठी वरदान ठरेल असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अर्थात याक्षणी कोणतेही मत मांडणे हे खूप लवकर ठरेल, परंतु त्यांच्या अभ्यासावर त्यांनी काही निरीक्षणे नोंदवली आहेत.

या महामारीच्या सुरुवातीला, काही शास्त्रज्ञांनी असे मत मांडले होते, की व्हायरसचे रूप नंतर बदलत जाईल, तो सौम्य होईल. त्याचा प्रसार थांबला नाही, तरीही त्याची दाहकता कमी होईल. अतिशय कमी लोकं यामुळे मृत्यू पावतील. याचे उत्तम उदाहरण म्हणजे H1N1 व्हायरस. सामान्य सर्दी- तापाचे मूळ हा सिद्धांत स्पष्ट करतो.

आपल्याला डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत माहित आहेच. त्यांने मांडलेल्या उत्क्रांतीचा सिद्धांतामुळे जीवशास्त्राला वेगळी दिशा मिळाली. त्याने मांडलेल्या “Survival of the fittest” ह्या तत्वाच्या माध्यमातून प्रजातींमध्ये वेळोवेळी घडून आलेले बदल व्यवस्थितपणे मांडले आहेत.

या सिद्धांताप्रमाणे व्हायरसही काम करतो. दक्षिण आफ्रिकेतही डेल्टा व्हायरसला ओमिक्रोनने बदलले आहे. ‘आता कोणतीच गोष्ट ठोस सांगता येणार नाही, पण आता असे काही क्लू मिळत आहेत, ज्याद्वारे असे म्हणता येईल, की हा व्हायरस कमी प्रसार करणार ठरेल.’ असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. ‘याक्षणी याचे स्वरूप घाबरवून टाकणारे असले, तरीही ते मनुष्याला फार हानी करणारे नाही’ असेही त्यांचे म्हणणे आहे.

ओमायक्रॉनमुळे डेल्टाचा धोका कमी होईल का?

 

omicron inmarathi

 

सिद्धांत असा आहे, की कमी दाहक व्हायरस प्रबळ झाला, तर जास्त लोकांना व्हायरसची लागण होईल, पण ते गंभीर आजारी पडणार नाहीत. व्हायरस हा प्रॉब्लेम असणारच आहे, एखाद्या व्यक्तीला व्हायरसची लागण झाली आणि त्यातून तो बरा झाला तर त्याच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होईल. आता दिलेल्या कोणत्याही लसीपेक्षा या रोगप्रतिकारशक्तीचा फायदा जास्त असेल.

भविष्यासाठी हाच व्हायरस एक वरदान ठरेल. कारण ओमायक्रोन सर्वात वेगाने प्रसार पावणारा व्हायरस असलयामुळे डेल्टाला मागे टाकेल, परंतु तो डेल्टापेक्षा कमी धोकादायक असल्यामुळे मानवजातीसोबत दीर्घकाळ राहूनही आपल्याला त्याच्यासोबत adopt करणं सोपं जाईल, याचं उदाहरण म्हणजे जसा फ्लूचा व्हायरस दरवर्षी येतो, आपल्याला लक्षणं जाणवतात, ताप, सर्दी, खोकला होतो, पण त्याची आपण दहशत बाळगत नाही , त्याच्यासाठी लोकडाऊन लावला जात नाही, सर्व जगाची व्यवस्था ठप्प होत नाही, थोडक्यात आपण सर्व जण ओमायक्रोनला पृथ्वीवरील आपला सहनिवासी म्हणून सामवून घेऊ.

या सगळ्यामुळे पहिल्या लाटेपेक्षा हॉस्पिटल आणि सरकारवर कमी प्रेशर येईल. ‘रुग्णांची कमी संख्या हे यशाचे मोजमाप नसावे. पूर्वीसारखी अर्थव्यवस्था सुरु व्हावी, लोकांनी हॉस्पिटलपासून लांब राहावे, त्यांचे उद्योगधंदे योग्यरीत्या सुरु व्हावे, तरच आपण यशस्वी झालो असे म्हणता येईल’ असे तज्ज्ञ म्हणतात.

आता ओमायक्रॉन व्हायरस अगदीच नवीन असल्याने आपल्याला तो धोक्याचा ठरेल की नाही हे सांगणे धाडसाचे ठरेल. डेल्टा व्हायरस चिंतेचा विषय ठरू शकतो हे सांगण्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशनने अनेक महिने घेतले, पण ओमायक्रॉनला मात्र लगेचच चिंतेचा विषय ठरवले गेले. या धर्तीवर अनेक देशांनी पुन्हा ट्रॅव्हल बॅन लावले आहेत.

 

omicron inmarathi1

 

दक्षिण अमेरिकेतील डॉक्टरांनी सांगितले, की इतर व्हायरसेसच्या तुलनेत याची लक्षणं सौम्य आहेत. हे सगळे सिद्धांत निरीक्षणांवर आधारित आहेत

त्यामुळे इतक्या लवकर याविषयी कोणतेही ठोस वक्तव्य केले जाऊ शकत नाही. आपण सर्व जण आवश्यक ती काळजी घेत भविष्याचा वेध घेऊ या आणि आशा करूया की हा सिद्धांत काळाच्या कसोटीवर एक वैज्ञानिक सत्य म्हणून प्रस्थापित होईल आणि मानवजातीला या संकटातून यशस्वीरीत्या बाहेर पडता येईल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?