' रणवीरला लाँच करण्यासाठी वडिलांनी आदित्य चोप्राला दिले २० कोटी… – InMarathi

रणवीरला लाँच करण्यासाठी वडिलांनी आदित्य चोप्राला दिले २० कोटी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कमाल आर खान हा स्वयंघोषित समीक्षक आणि त्याचे निर्बुद्ध रीव्ह्यूज नेटकऱ्यांसाठी काही नवे नाहीत. बऱ्याचदा यामुळे तो अडचणीतसुद्धा आला आहे. पण कितीही उलट सुलट रिव्यू असले तरी नेटकऱ्यांमध्ये त्यांची चर्चा मात्र होते.

कमाल खान नावाचे रसायन नेमके काय आहे याचे गूढ कुणालाच आजन्म उलगडणार नाही. पण कमाल खानसारख्या काही लोकांच्या विक्षिप्तपणामुळे कितीही खालच्या दर्जाचे का होईना मनोरंजन मात्र होते.

 

kkr inmarathi

 

कट्ट्यावर, कँटिंनमध्ये गप्पांना उधाण येतं तेव्हा त्यात चघळायला अशा एखाद्या कमाल आर खानची वायफळ बडबड सहज चालून जाते. नुकतेच कमाल खानने बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंगबद्दल असेच एक खळबळजनक विधान केले आहे.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्याने १९ नव्हेंबरला राणी मुखर्जी, सैफ अली खान, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघच्या ‘बंटी और बबली २’ या चित्रपटाचा रिव्ह्यू इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये हा चित्रपट फारच वाईट असल्याचे त्याने म्हटले आहे. कथेचा चित्रपट व्हावा इतकी क्षमताच कथानकात नव्हती असे तो म्हणाला. चित्रपटातल्या कलाकारांचीही त्याने चांगलीच खेचली आहे.

 

bunty babli 2 inmarathi

 

त्या व्हिडियोत त्याने असेही म्हटले आहे की वायआरएफने आजपर्यंत ज्या ज्या अभिनेत्यांना लाँच केलंय ते सगळे अभिनेते फ्लॉप झालेत.
हे म्हटल्यावर तो पुढे असं म्हणतो की, ” तुम्हाला वाटत असेल की आज खूप मोठा स्टार असलेल्या रणवीर सिंगला सुद्धा यशराज फिल्म्सने लाँच केले आहे. पण तुम्हाला सांगतो की रणवीर सिंगला आदित्य चोप्राने लाँच केलं नसून आदित्य चोप्राच्या माध्यमातून रणवीर सिंग लाँच झालाय.”

‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून रणवीर सिंग ने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते हे आपण कुणीच विसरलेलो नसणार. रणवीरने यात ‘बिट्टू शर्मा’ ची भूमिका फार अप्रतिमपणे निभावली होती. रणवीरला या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा ‘बेस्ट मेल डेब्यू’चा पुरस्कारही मिळाला होता. अनुष्का शर्माने रणवीर सिंगबरोबर या चित्रपटात मुख्य भूमिका केली होती.

 

ranvir singh eating inmarathi

 

कमाल आर खान त्या व्हिडियोत पुढे असं म्हणतो की,” रणवीरच्या वडिलांनी आदित्य चोप्राला २० कोटी दिले होते आणि त्यानंतर यशराज फिल्म्सने रणवीर सिंगला लाँच केले होते.” पण केआरकेने त्यात रणवीर सिंगचा उल्लेख ‘रणवीर सिंग’ असा न करता ‘रणबीर कपूर’ असा केला आहे. केआरकेने यापूर्वीदेखील रणवीर सिंगला ‘टू रुपीज पर्सन’ असे म्हटले होते.

 

adi inmarathi

 

केआरकेच्या वक्तव्यासाठी त्याला यापूर्वी एकदा किंमत मोजावी लागली होती इतकी की ते प्रकरण कोर्टापर्यंत गेले होते. काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या ‘राधे द मोस्ट वॉंटेड भाई’ हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर केआरकेने सलमान खानला बरीच दूषणं दिली होती. हे प्रकरण इतकं वाढलं होतं की सलमानच्या लीगल टीमने केआरकेविरुद्ध कडक कारवाई केली होती आणि त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले.

 

Wanted Salman IM

आपण यापुढे कधी सलमान खानच्या चित्रपटाचा रिव्ह्यू करणार नाही असे कमाल आर खान त्यावर म्हणाला होता. रणवीर सिंगबद्दल केआरकेने केलेल्या वक्तव्यात किती तथ्य आहे माहीत नाही. पण आपल्याच पायांवर धोंडा मारून घेऊन केआरके कॉंट्रोव्हर्सीला आपल्याकडे का खेचून घेतो ते केआरकेच जाणे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?