' जीवघेण्या आजारासोबतचा लढा, सुश्मिता सेनने मोकळं केलं आपलं मन… – InMarathi

जीवघेण्या आजारासोबतचा लढा, सुश्मिता सेनने मोकळं केलं आपलं मन…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कलाकाराचे आयुष्य म्हटले की आपल्याला दिसतो तो अखंड झगमगाट, त्यांचं आरस्पानी सौंदर्य, त्यांच्याभोवतालचं चिक्कार प्रसिद्धीचं वलय. हे असेच असते यात काहीच खोटे नाही. पण असे असले तरी कलाकारसुद्धा आधी एक माणूस असतो आणि सामान्य माणसासारखेच, किंबहुना काही वेळा सामान्य माणसा पेक्षाही जास्त चढउताराचे आयुष्य त्याच्या वाट्याला येते.

त्यालाही सामान्य माणसाप्रमाणेच कधी सुखद अनुभव घेत तर कधी ठेचकाळत मजल दरमजल करावी लागते. यात त्याच्या जिद्दीचा, इच्छाशक्तीचा प्रचंड कस लागणार असतो.

प्रत्येकाची तितकी शारीरिक आणि मानसिक तयारी असतेच असे नाही. पण सुश्मिता सेन मात्र तिला झालेल्या आजाराला पुरून उरली आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर तिने त्यावर यशस्वी मात केली.

 

sushmita sen inmarathi 2

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

२०१४ साली सुश्मिता सेनला ‘एडीसन’ नावाचा आजार झाला होता. जेव्हा शरीरातील ऍड्रिनल ग्लॅण्ड्स कॉर्टिसॉल,अल्डोस्टेरॉन किंवा आपल्या शरीराला नियंत्रणात ठेवणाऱ्या इतर स्टिरॉइडल हार्मोन्सची पुरेशी निर्मिती करू शकत नाहीत तेव्हा ‘एडिसन’ हा आजार होतो.

यात रोगप्रतिकारक प्रणाली आपल्या किडनीच्या वर असलेल्या ऍड्रिनल ग्लॅण्ड्सवर अनावधानाने हल्ला करते. कधीकधी जेव्हा मेंदूतील आणि ऍड्रिनल ग्लॅण्ड्समधील सिग्नल पिट्युटरी ग्लॅण्ड्समध्ये ताळमेळ नसतो आणि त्यामुळे सेकेंडरी न्यूरो डिफिशिअन्सी होते तेव्हाही हा आजार होऊ शकतो.

औषधं चालू असलेले, ज्यांच्या मेंदूला फार त्रासदायक इजा झालेली आहे, ज्यांना ट्युमर आहे किंवा अनुवांशिक प्रकारे कुठल्याही रुग्णाला हा आजार होऊ शकतो.

या आजाराचे जर दीर्घकाळ निदान झाले नाही आणि जर तो वेळीच बरा करता आला नाही तर त्यामुळे रिफ्लेक्ट रिऍक्शन्स होऊन हा आजार खूप जीवघेण्या स्वरूपात मोठा होऊ शकतो.

सुश्मिताला झाला होता तशाच ऑटोइम्युन प्रॉब्लेममुळे बऱ्याचदा हा आजार होतो. ही समस्या तणाव नियंत्रणात ठेवणाऱ्या आणि इतर मानसिक कार्य करणाऱ्या घटकांना त्रास देते.

 

auto immune system inmarathi

 

एडिसन हा आजार झालेल्या माणसात चिडचिड, उन्माद, भ्रम, गोंधळ, भीती, अस्वस्थता, शुद्ध हरपणे, झोपेचं बिघडलेलं गणित, नैराश्य, जास्त ताप, पोटाच्या भोवती, पाठीच्या खालच्या बाजूला आणि पायांना होणाऱ्या दीर्घकालीन वेदना यापैकी एक किंवा अनेक लक्षणे आढळून येतात.

या आजाराला योग्य वेळी उपचार मिळणे गरजेचे असते. ऍड्रिनल ग्लॅण्ड्स जे हॉर्मोन्स तयार करत नाहीयेत ते अशा वेळी या उपचारातून शरीराला पुरवले जातात.

या आजाराविषयी बोलताना सुश्मिता एकदा असं म्हणाली होती की जितकी वर्षें ती या आजाराशी लढली ती वर्षे अत्यंत क्लेशदायक होती. तिच्या युट्युब चॅनलवर तिने लिहिले होते की जेव्हा २०१४ च्या सप्टेंबर मध्ये तिला एडिसन हा आजार झाला तेव्हा आपल्यात आता प्रतिकार करण्याची क्षमताच उरलेली नाही असे तिला वाटत होते.

sushmita sen 2 inmarathi

 

“माझे शरीर प्रचंड थकून गेलेले होते. प्रचंड निराश वाटत होते आणि संतापाच्या भावना मनात येत होत्या. या चार वर्षात मी कशाकशातून गेलेय याची कल्पनाच देऊ शकत नाहीत. स्टिरॉइड सब्स्टीट्युट कॉर्टिसॉल घेण्याचे चांगलेच दुष्परिणाम झाले आणि ते मला भोगावे लागले. दीर्घकालीन आजारासोबत जगणे यासारखे थकवणारे दुसरे काहीच नाही.”, अशी भावना तिने व्यक्त केली आहे.

नूंचाकु या पारंपारिक एशियन मार्शल आर्ट फॉर्मच्या मदतीने आणि ध्यान करण्याने या आजारामुळे होणाऱ्या वेदनांशी लढून त्याच वेदनांचे आर्ट फॉर्ममध्ये रूपांतर करण्यात तिला मदत झाली असे ती म्हणते. “मी वेळेत बरी झाले. माझ्या ऍड्रिनल ग्लॅण्ड्स सुधारून व्यवस्थित काम करू लागल्या.”असे ती म्हणाली.

ती जेंव्हा तिच्या या आजाराबद्दल उघडपणे बोलली त्यानंतर तिने तिचे वर्कआउट सेशन्स लोकांसमोर आणले आणि आजही तिने तसे करणे चालू ठेवले आहे.

 

sushmita sen workut inmarathi

 

आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर सुश्मिताने या आजाराला नामोहरम केले. सुश्मिताच्या आयुष्यातले हे अवघड वळण कितीही कल्पनेपलीकडचे संकट आपल्यावर येऊन कोसळले तरीही त्यातून मार्ग काढता येतो हा आशेचा किरण दाखवते.

मला हा मार्ग नक्की काढता येईल आणि मी त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन हा दृढनिश्चय मात्र आपल्यात असायाला हवा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?