“हिंदूंचा सण का साजरा केलास?” या प्रश्नावर पाकिस्तानी मुस्लिमाचं उत्तर वेगळेच रंग दाखवतं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
होळी हा सण म्हणजे आपापसातले गैरसमज किंवा वैर बाजूला ठेवून एकमेकांना रंग लावून पुन्हा मैत्री करायचा दिवस असतो, आपल्याला तरी होळी किंवा रंगपंचमीचं हेच रूप माहीत आहे!
भारतात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. रंगपंचमीला अनेक रंगात तरुणाई (ह्या तरुणाईत, वयाने “वृद्ध” असलेले पण मनाने तरुण असलेलेसुद्धा आले!) रंगून निघते. सगळे भेद विसरून सर्वजण एकत्र येतात.
आणि भारतासारख्या देशात तर सगळ्याच जाती-धर्माचे लोकं त्यांचे सण हे साजरे आनंदाने साजरे करतात! दिवाळी, ईद,दसरा, क्रिसमस, बैसाखी, असे कित्येक सण सगळे भारतीय मिळून अत्यंत दिमाखात साजरे करतात!
पण आपण आज एक वेगळीच गोष्ट जाणून घेणार आहोत जी ऐकून तुमच्यासमोर मसुलमान लोकांचं एक वेगळंच चित्र तयार होईल!
हि घटना आहे ४ वर्षांपूर्वीची, एक पाकिस्तानी मुस्लीम मुलाने त्याच्या “मायनॉरीटी” हिंदू मित्रांसोबत रंग खेळला आणि तश्याच “रंगीबेरंगी” अवस्थेत तो घरी परतला.
बसमधून येताना त्याला आलेला अनुभव त्याने फेसबुकवर टाकला होता. जो नेटीझन्सना प्रचंड भावला होता. तर जाणून घेऊया तो अनुभव नक्की होता तरी काय?
वाहिद खान नाव असलेल्या ह्या तरुणाची पोस्ट अशी आहे:
===
आमची होळी खेळून झाल्यावर मी पब्लिक ट्रान्सपोर्टने घरी परतत होतो. मित्रांनी मला auto ने जाण्याचा सल्ला दिला होता, कारण त्यांना वाटत होतं की माझ्या अवस्थेकडे बघून इतर लोक (तीव्र) प्रतिक्रिया देतील.
पण मला लोकांच्या प्रतिक्रिया बघायच्या होत्या. त्याहून महत्वाचं, मला diversity साजरी करायची होती.
मी अनेकांना सामोरा गेलो. बहुतेक सर्वांना मी हिंदू वाटलो आणि प्रत्येकाने आवर्जून मला सांगितलं की ते “माझ्या समाजातल्या” अनेकांना ओळखतात. बसमधे घडलेलं पुढील संभाषण माझं सर्वात आवडतं आहे.
माझ्या बाजुले बसलेले काका, खूप प्रेमाने: बेटा, एवढ्या लहान वयात नोकरी का करतोस?
मी: सॉरी, मला कळलं नाही आपण काय म्हणालात…
काका: तू रंगारी आहेस ना?
मी: (मोठ्याने हसून) नाही काका, मी होळी खेळून आलोय.
काका: ओह…हिंदू आहेस का?
मी: नाही, मी मुस्लीम कुटुंबातील आहे.
काका: काय?! आणि होळी खेळणाऱ्यांपैकी इतरही मुस्लीम होते का?
मी: हो. आमचे काही हिंदू मित्र होते, त्यांच्यासोबत आम्ही एका चर्चमधे रंग खेळलो.
काका: बेटा, एक मुस्लीम असून…?
आमच्या मागच्या सीटवर एक दुसरे काका होते, ते अचानक म्हणाले:
भाई, जर रंग ह्या मुलांना एकत्र आणत आहेत आणि ही मुलं एकत्र साजरा करत आहेत, तर तुम्हाला त्यात धर्म मधे आणायची काय गरज आहे?
काका: आम्हाला हे सांगतच वाढवलं गेलंय की हिंदू-मुस्लीम सोबत राहू शकत नाहीत.
दुसऱ्या काकांनी (निराशेने) मान हलवली आणि मी म्हणालो: तिथेच तर सगळं चुकलं ना काका! Happy holi!
काका मोठ्याने हसले.
तो खूपच सुंदर दिवस होता. पाकिस्तानमधे इतर धर्म स्वीकारले जात आहेत हे बघून छान वाटतंय.

थोडक्यात…
हळूहळू असेल…कासवापेक्षा धीमा असेल…पण जगात सकारात्मक बदल होत आहे…!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
अप्रतिम
अजून कसा फतवा निघाला नाही या तरूणाच्या विरूद्ध