' गो कॅम्पिंग - मुंबईजवळची ही कॅम्पिंग डेस्टिनेशन्स देतील तुम्हाला अविस्मरणीय अनुभव

गो कॅम्पिंग – मुंबईजवळची ही कॅम्पिंग डेस्टिनेशन्स देतील तुम्हाला अविस्मरणीय अनुभव

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लॉकडाउन, कोरोना या सगळ्यात फिरण्याची आवड असणाऱ्यांना सक्तीने घरी थांबावे लागले होते, पण ती कसर भरून काढण्यासाठी अनेकजण आता फिरायला जात आहेत, कॅंपिंगसाठी जात आहेत.

आपल्या आजूबाजूला अनेकांना कॅम्पिंगची आवड असते. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडते. छोट्या तंबूत, मोकळ्या आकाशाखाली राहणे जरा अवघड असते हा पण अनुभव खूप मजेशीर आहे.

मुंबई जवळही काही कॅम्पिंग डेस्टिनेशन्स आहेत. वीकेंडला मुंबईतील या ठिकाणी कॅम्पिंग करण्याची एक वेगळीच मजा आहे. मुंबईतली ही कॅम्पिंग डेस्टिनेशन्स कोणती आहेत ते पाहूया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पवना लेक –

 

camping inmarathi1

 

पवना सरोवराच्या किनाऱ्यालगत असणारी ही कॅम्पसाईट हिरव्यागार निसर्गात वसलेली आहे. तसेच हिरव्यागार पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमध्ये ही जागा असून ती धुक्याने वेढलेली आहे.

लोहगड, तिकोना, तुंग आणि विसापूर किल्ला यांसारख्या विविध पर्यटनस्थळांच्या मध्ये पवना तलाव शोभून दिसतो. लोणावळा आणि खंडाळा जवळ असलेल्या या ठिकाणाचा आनंद घ्यायला नक्की जा.

भंडारदरा कॅम्पिंग –

 

camping inmarathi2

 

भंडारदरा लेक कॅम्पिंग अनेक वर्षांपासून लोकांना कॅम्पिंगचा अनुभव देत आहे. इगतपुरीजवळील या अतिशय रमणीय कॅम्पिंगचा प्रत्येकाने अनुभव घेतला पाहिजे. इथे आल्यावर तुम्ही पश्चिम घाटाच्या अमर्याद सौंदर्याने नक्कीच मंत्रमुग्ध व्हाल.

भंडारदरा लेक कॅम्पिंगमध्ये निसर्ग प्रेमींसाठी अत्यंत चांगल्या सुविधा देण्यात येतात. ज्यात कॅम्पिंग आणि गाद्या, ब्लँकेट व राहण्यासाठी टेन्टची सोय करण्यात येते.

अलिबाग बीच कॅम्पिंग –

camping inmarathi6

 

अलिबागमध्ये कॅम्पिंग करताना समुद्र आणि तिथला सूर्यास्त या दृश्यांचा अनुभव प्रत्येकाने नक्कीच घ्यायला हवा. हा अनुभव तुमच्या मनाला नक्कीच शांतात देऊन जाईल.

समुद्रकिनाऱ्याच्या एका निर्जन भागावर, आपल्या प्रिय व्यक्तीसोबत काही काळ घालवण्यासाठी हे परफेक्ट ठिकाण आहे. 

कुंडलिका राफ्टिंग कॅम्प –

camping inmarathi

 

कुंडलिका राफ्टिंग कॅम्प हे हिरवेगार निसर्गाच्या सानिध्यात साहस करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी योग्य ठिकाण आहे. मुंबईपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असलेली ही जागा साहसी लोकांची पसंतीची जागा आहे. येथे येऊन प्रत्येकाने येथील साहसी खेळांचा नक्की अनुभव घ्यावा.

येथे राहण्यासाठी तुम्ही २ किंवा ३ बेस कॅम्प मधून एखादी जागा निवडून तेथील आरामदायी टेन्टमध्ये राहू शकता.

खोपोलीमधील साहसी कॅम्पिंग –

खोपोली जवळच्या सुंदर अशा हिरवळ ठिकाणी तुम्ही कॅम्पिंगचा अनुभव घेऊ शकता. येथे लेकच्या जवळच टेन्ट बांधून बोनफायर करून गप्पा मारण्याचा अनुभव घेता येऊ शकतो.

कर्नाळा-

 

camping inmarathi5

 

मुंबईपासून फक्त ४८ किलोमीटर अंतरावर असणारे हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. तुम्ही गेलात तर कर्नाळा पक्षी अभयारण्य बघायला नक्की जा. येथे तुम्हाला अनेक प्रकारचे पक्षी आढळतील.

याशिवाय तलावात बोट राईडचाही आनंद लुटता येतो. या ठिकाणी भेट देण्यासाठी हिवाळा हा चांगला काळ आहे.

भातसा धरण-

 

camping inmarathi4

 

मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेले हे ठिकाण कॅम्पिंगसाठी सर्वोत्तम मानले जाते. पोहणे, बोट चालवणे आणि अगदी मासेमारीचा आनंद घेण्यासाठी भातसा येथे जात येते.

ज्यांना पाणी आवडत नाही किंवा त्याची भीती वाटते त्यांच्यासाठी येथे वेगवेगळे खेळ आहेत, तसेच येथील निसर्गरम्य वातावरणात तुम्ही मस्त वॉक घेऊ शकता.

मुंबईपासून फार दूर नसल्यामुळे भातसा कॅम्पिंग एक दिवसीय सहलीसाठी चांगली जागा आहे. जर तुम्ही रात्रभर राहण्याचा विचार करत असाल, तर तेथे कॅम्पिंग साइट्स असून तुम्हाला टेन्ट भाड्याने मिळू शकतात.

इगतपुरी कॅम्पिंग –

 

camping inmarathi3

 

पश्चिम घाटावर असणारे इगतपुरी हे निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे आणि आणि हा निसर्ग अनुभवण्याचा मार्ग म्हणजे येथील कॅम्पिंग.

या कॅम्पिंग दरम्यान तुम्हाला तलावातील बोटिंग, निसर्ग, शांततापूर्ण सूर्यास्त आणि शहराच्या गजबजाटापासून दूर अशा एका दिवसाचा अनुभव घेता येईल.

तर या कॅम्पिंग डेस्टिनेशन्सना कधी भेट देताय?

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?