' उत्तर कोरिआमध्ये ही सिरीज बघणाऱ्याला थेट परलोकात पाठवायचा निर्णय घेतला गेलाय! – InMarathi

उत्तर कोरिआमध्ये ही सिरीज बघणाऱ्याला थेट परलोकात पाठवायचा निर्णय घेतला गेलाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्याचा काळ आहे तो वेबसिरीजचा, कोरोनामुळे गेले दीड वर्ष थिएटर्स बंद होती. त्यामुळे लोकांच्या हक्काचे मनोरंजनाचे साधन बनले ते म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म, आज अगदी नेटफ्लिक्स पासून ते आपल्या अस्सल झी५ पर्यंत अनेकजण हे ओटीटी प्लॅटफॉर्म वापरतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सिम कार्ड कंपन्यांना देखील ओटीटी प्लॅटफॉर्म हे भविष्य आहे हे कळल्यावर त्यांनीदेखील लगेच आपल्याला प्लॅन्समध्ये फ्री सब्स्क्रिप्शनचे पर्याय ठेवून  ग्राहकांना आकर्षित करत आहेत. मनी हाईस्ट सारखी वेबसिरीज आज जगभरात लोकप्रिय आहे, त्या वेबसिरिजच्या सीजनची लोक आतुरतेने वाट बघत असतात.

 

netflix inamrathi

 

भारतात देखील फॅमिली मॅन, स्पेशल ऑप्ससारख्या गुप्तहेरांवरील वेबसिरीज लोकांच्या चांगल्याच पसंतीस पडत आहेत. काही वेबसिरीजचा जसा बोलबाला होतो तशा काही वेबसिरीज वादग्रस्त ठरतात. मध्यंतरी सैफअली खानच्या एका वेबसीरिजला हिंदुत्ववादी संघटनांनी मोठ्या  प्रमाणावर विरोध केला होता.

 

web series inmarathi

 

आपल्याकडे लोकशाही असल्याने एक सनदशीर मार्गाने विरोध केला जातो मात्र उत्तर कोरियामध्ये वेबसिरीज पाहणाऱ्याला थेट मृत्यूची शिक्षा सुनावली आहे, काय आहे नेमकं प्रकरणं चला तर मग जाणून घेऊयात.

 

squid game inmarathi

 

एका वृत्तानुसार नेटफ्लिक्सवर हिट ठरलेल्या स्क्विड गेम या वेबसिरजची एक प्रत उत्तर कोरियात पुन्हा आणल्याबद्दल एका माणसाला फाशी देण्यात येणार आहे. छुप्या मार्गाने आणलेल्या या वेब सिरीजमुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे. ज्या माणसाने याची प्रत आणली आहे तो एक विद्यार्थी आहे असे बोलले जात आहे.

या मुलाने चीनमधून युएसबी फ्लॅश ड्राईव्हच्या माध्यमातून ही प्रत आणली आहे, आपल्या सर्वांनाच माहिती असेल की कोरियामध्ये असलेले विचित्र कायदे त्यात ही पाश्चात्य सिनेमे, मालिकांवर पूर्णपणे बंदी आहे. आणि या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याला फाशीची शिक्षा सुनावली जाते, असे असतानाही त्या विद्यार्थ्याने अशा पद्धतीचे धाडस दाखवले आहे त्याला आता फाशी कधी होईल हे काही दिवसात आपल्याला कळेलच. 

 

usb-drive-safely-eject-marathipizza01

 

निदर्शनात कशी आली?

घटना उघडकीस आणण्यामागे एका अज्ञात स्रोतकाचा हात असल्याचे बोलले जात आहे. १०९ संगमू या संस्थेला त्याने टीप दिली, या संस्थेचे मुख्य काम म्हणजे अशा प्रकारच्या घटनांवर बारीक लक्ष ठेवणे आणि ही संस्था उत्तर कोरियाच्या सरकारच्या अंतर्गत चालवली जाते.

 

korea inmarathi
the hankeyoreah

शाळेवर कारवाई :

ज्या शाळेतील विद्यार्थ्यांनी ही वेबसिरीज पहिली आहे त्या शाळेतील कर्मचाऱ्यांना देखील बरखास्त केले गेले आहे, तसेच त्यांना आता शिक्षा म्हणून खाणीत काम करण्यासाठी पाठवले जाणार आहे.

 

mine inmarathi

 

उत्तर कोरिया आणि तिकडे रोज घडणाऱ्या घटना यामुळे एकूणच तिकडच्या लोकांचे जनजीवन किती निराशावादी आणि एक प्रकारच्या भीतीखाली असेल याची जाणीव आपल्याला इथे बसून येणार नाही. केसाच्या रचनेपासून ते मनोरंजनापर्यंत सगळ्या गोष्टी हे सरकार ठरवतं अशा देशात रोजच जीवन जगणं हे देखील एक प्रकारची समस्या होऊन बसले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?