' लहान मुलं माती खातायत? काही सोप्पे उपाय करून त्वरित ही सवय बदला – InMarathi

लहान मुलं माती खातायत? काही सोप्पे उपाय करून त्वरित ही सवय बदला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पालकत्व ही खूप मोठी आणि महत्वाची जबाबदारी आहे. मुलांचा जन्म झाल्यापासून ही जबाबदारी सुरू होते ती अगदी शेवटपर्यंत. मुले मोठी करणे, सांभाळणे खरंच खूप अवघड काम आहे.

प्रत्येक मूल वेगळं असतं आणि विशिष्ट गुणधर्म घेऊन जन्माला आलेलं असतं. सगळ्याच लहान मुलांना प्रत्येक नवीन वाटणारी गोष्ट हात लावून पाहण्याची, अनुभवायची, वास घेण्याची सवय असते. इतकेच नाही तर ही मुले दिसेल ती वस्तू तोंडत घालून पाहतात. मग त्याचे परिणाम चांगले की वाईट, चव कशी या सगळ्या गोष्टी समजण्यासारखे त्यांचे वयच नसते.

अशीच एक गोष्ट जी मुले सर्रास तोंडत घालतात ती म्हणजे माती. सगळ्याच मुलांना मातीत खेळायला आवडते त्यामुळे बागेत, मोकळ्या वातावरणात किंवा अगदी घरच्या गार्डनमध्ये कुठेही खेळताना मुले सहज माती खातात.

 

child eating soil inmarathi

 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलांच्या शरीरात आयर्न, झिंक आणि कॅल्शिअमचे प्रमाण कमी असल्यामुळे मुले माती खातात. तुम्हाला ऐकून कदाचित खरे वाटणार नाही, पण माती खाण्याचे काही उपयोग आहेत. आपणही विचार केला तर आपल्याला ते पटेल.

– मातीमध्ये काही जंतू हे पचनास मदत करतात. त्यामुळे मुलांची पचनक्रिया सुधारते.

– मुलांच्या शरीरास मागणी असलेले काही मिनरल मातीत असतात, त्यामुळे माती खाल्ल्याने त्या मिनरलची मागणी पूर्ण होते.

– माती खाण्याने मुलांची तब्येत बिघडली, तर चांगल्या सवयींचे महत्व मुलांच्या लक्षात येते आणि हे पुढील आयुष्यासाठी फायदेशीरच ठरते.

 

children killa inmarathi

 

– मुलांना अगदी लहानपणापासून योग्य सवयींचे पालन करण्याची सवय असेल तर त्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती वाढते. आजारांना लढण्याची ताकद आतून मिळते.

माती खाण्याची सवय अगदी साधारण आहे. सगळ्याच प्रकारच्या मातीमध्ये असे उपयुक्त घटक नसतात. यामुळे माती खाण्याने शरीराला काही घातक परिणाम होऊ शकतात. जसे की,

– पोटांच्या तक्रारी.
– अन्नातून विषबाधा.
– उलट्या,जुलाब
– आतड्यांना सूज.

त्यामुळे या सवयी पासून परावृत्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी हे काही खास आणि सोपे उपाय.

१. केळी : मुलांनी माती खाऊ नये यासाठी मुलांना केळी कुस्करून मधात खाऊ घाला, त्यामुळे माती खाण्याची सवय नाहीशी होते.

 

banana inmarathi

 

२. हिरव्या पालेभाज्या : आयर्न,कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे मुले माती खातात, त्यामुळे या पालेभाज्या त्यांची कमतरता भरून काढतात. तसेच बीट, डाळी ही खायला द्या.

३. ओवा : पोटाचे विकार असतील तर लहान मुलांना ओवा खायला देतात किंवा ओवा गरम करून शेकतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात ओवा टाकून ते पाणी द्या. त्यामुळे माती खाण्याची सवय बंद होते.

४. लवंग : लवंग अतिशय गुणकारी आहे. लवंग बारीक करून पाण्यात उकळून ते पाणी थंड करून थोडे थोडे पाजत राहावे.

 

clove 3 inmarathi

 

असे छोटे छोटे घरगुती उपाय केल्याने मुलांची माती खाण्याची सवय बंद होते.

शिवाय आपण घरात काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. जसं की,

– आपले घर नेहमी स्वच्छ असावे. धूळ आणि माती नसावी.

– मुले खेळतात ते गार्डन स्वच्छ असावे.

– मुलांना जंतू म्हणजे काय, ते पोटात गेले तर काय होते या गोष्टींची माहिती द्या, तसेच स्वच्छतेचे महत्त्व पटवून / समजून सांगा.

– मुलांच्या शरीरात पोषण तत्वे कमी असतात त्यामुळे मुले माती खातात, या गोष्टी डॉक्टर कडून तपासून घ्या, काही कमतरता असेल तर उपचार करा.

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?