' शिमला- मनाली सोडा, हिमाचल प्रदेश मधील ही ११ गावं आहेत अधिक नयनरम्य

शिमला- मनाली सोडा, हिमाचल प्रदेश मधील ही ११ गावं आहेत अधिक नयनरम्य

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

फिरायला जाणे हे सगळ्यांचं आवडीचे काम आहे. आपला भारत देश अतिशय सुंदरतेने नटलेला आहे. निसर्गाचा अद्भुत आविष्कार आपल्या देशाला लाभलेला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अशा खजिन्याचा लाभ मिळणे ही अत्यंत सुंदर आणि नशीबाची गोष्ट आहे. प्रत्येकाची आवड वेगळी असते, तसेच मनाच्या कोपऱ्यात स्वप्नातील फिरण्याचे ठिकाण देखील.

एखाद्या ठिकाणी सगळीकडे पर्वत, हिरवागार निसर्ग, शुद्ध हवा, सुंदर मंदिरे, स्वच्छ निळे आकाश आणि शांततेचा अनुभव मिळणार असेल तर दुधात साखर.

हिमालय प्रदेशातील सुंदर टेकड्या सर्वांचे मन मोहून घेतात. त्याहून सुंदर आहेत तेथील शहारे आणि गावे. ही गावे छोटी असली तरीही साक्षात स्वर्गात गेल्याचा अनुभव देतात.

१. बारोत / बराल :

 

barot inmarathi

 

हे गाव हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात, नैसर्गिक सौंदर्याने वेढलेले आहे. या ठिकाणी मासेमारीचे फर्म असल्यामुळे ताजे मासे मिळतात. तुम्हाला जर मासेमारीची आवड असेल तर तुम्ही या ठिकाणच्या प्रेमात नक्की पडल.

तसेच येथे ट्रेकिंग करण्याचा अनुभव खूप सुंदर आहे, बारोट येथे अभयारण्य असल्यामुळे कल्या अस्वलाच्या  प्रजाती पाहायला मिळतात.

२. शोजा :

 

shoja inmarathi

हे गाव जलोरि जवळ कुल्लू आणि शिमला दरम्यान वसलेले आहे. हे पक्षी निरीक्षण आणि निसर्ग फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. हिमाचल प्रदेशातील शांतता आणि विश्रांतीची अनुभूती देणारे हे ठिकाण आहे. येथील धबधबे पाहण्यासारखे आहेत.

३. फिरणी गाव :

फिरणी हे गाव पर्वत फिरण्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे पर्वतांवर भटकण्याची आवड असेल तर हे ठिकाण निश्चित पाहायला हवे. शुद्ध हवा, सुंदर धबधबे,स्वच्छ आकाश आणि मस्त पर्वते ही या ठिकाणची वैशिष्ट्ये आहेत.

४. कल्पा :

kalpa inmarathi

 

हे गाव हिमाचल प्रदेश क्या किंनोर जिल्ह्यात आहे. सफरचंदांचे वाढते प्रमाण हे या गावचे आकर्षण आहे. हिरवीगार जंगले, भव्य बर्फाच्छादित प्रदेश आणि पर्वतांनी वेढलेले हे गाव खूप सुंदर आहे.

५. नलदेहरा :

शिमालापासून एका तासाच्या अंतरावर असलेला हा पर्वतीय भाग आहे. हे गाव शांतता अनुभवण्यासाठी उत्तम आहे. १८ गोल्फ कोर्सेस उपलब्ध असलेले हे ठिकाण आपल्या जोडीदारासोबत किंवा कुटुंबासोबत फिरण्यासाठी छान आहे.

६. कोटी कणासार :

 

koti kanasar inmarathi

 

नवीन लग्न झालेल्या जोडप्याने हनिमूनसाठी येथे नक्की जावे. हिरव्यागार जंगलाभोवती वसलेले हे गाव आहे. सगळ्या प्रकारची जुनी डेरेदार झाडे इथे पाहायला मिळतात. या गावाच्या जवळ असणाऱ्या गुहा पार करण्यासाठी तब्बल २-३ तास लागतात.

७. नर्कांडा :

आठवड्याच्या कामानंतर बदल हवा असेल तर हे ठिकाण बेस्ट पर्याय आहे. शिमला पासून जवळच असलेले हे गाव निसर्गरम्य आणि स्वच्छ निळे आकाश यांची अनुभूती देते.

८. फागु :

 

fagu inmarathi

 

समुद्र पातळी पासून २५०० मीटर उंचीवर असलेले हे गाव स्वच्छ,शुद्ध वातावरण आणि जादू मय हिमालयाच्या रांगा भोवती आहे.येथील आकर्षण म्हणजे येथील सुंदर ढग.शिमला मधील हे अतिशय रम्य ठिकाण ढगांमध्ये चालत असल्याची,ढग अगदी जवळून पहिल्याच अनुभूती देते.

९. कियारी घाट :

हिमाचल प्रदेश मधील हे छोटे पर्वतीय ठिकाण आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आराम मिळण्यासाठी किंवा शांतता प्रिय व्यक्तीसाठी हे निश्चित भेट देण्याा जोगे हे उत्कृष्ठ ठिकाण आहे.

शिमल्याला आल्यावर या ठिकाणी अवश्य भेट द्यायला हवी असे हे ठिकाण आहे. स्वच्छ हवा, कली बारी मंदिर ही ठिकाणं प्रेक्षणीय आहेत.

१०. सरहान :

 

sarhan inmarathi

 

शिमला पासून १६३ किमी अंतरावर असलेले हे गाव येथील मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.या गावात भिमकली मंदिराचा इतिहास पाहायला मिळतो.२३१३ मीटर वर असलेले हे पर्वतीय ठिकाण गेटवे किंनुर म्हणून ओळखले जाते.

११. तिर्थन विले :

हिमाचल प्रदेश मधील हा छोटा स्वर्गच म्हणायला हवा. तीर्थन या नदीमुळे या गावचे नाव तीर्थान असे पडले. जिवंतपणी स्वर्ग अनुभवायचा असेल तर येथे अवश्य भेट द्यायला हवी.

तर अशा या सुंदरतेचे प्रतीक असलेल्या, निसर्गाचे विशेष वरदान लाभलेल्या या शांत ठिकाणांचा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच घ्यायला हवा. हो ना??

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?