' अंदमान-निकोबार बद्दलच्या या गोष्टी प्रत्येक भारतीयाला ठाऊक असायलाच हव्यात!

अंदमान-निकोबार बद्दलच्या या गोष्टी प्रत्येक भारतीयाला ठाऊक असायलाच हव्यात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अंदमान निकोबार बेटे ही भारताचाच एक भाग आहेत. येथे प्रत्येक वर्षी लाखो प्रवासी सुट्टी घालवायला येतात. परंतु या बेटांबद्दल अशी अनेक सत्ये आहेत, ज्यांच्या विषयी तुम्ही कधी एकले नसेल. आज आम्ही तुम्हाला अंदमान निकोबारबद्दल अशीच काही सत्ये सांगणार आहोत.

 

andaman-nicobar-facts-marathipizza02

 

१. या बेटांच्या निर्मितीबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. असे मानले जाते की अंदमान शब्द हनुमानाचे एक रूप आहे. जो संस्कृतशी साधर्म्य दाखवणाऱ्या मलय भाषेमधून आला आहे. मलय भाषेत रामायणातील हनुमानाच्या पात्राला हंडुमान म्हटले जाते आणि निकोबारचा अर्थ आहे नेक्ड (नग्न) लोकांचे बेट.

 

 

२. येथे राहणारी जमात बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये मिसळत नाही. येथील निवासी मुख्यतः ‘जार्वा’ जमातीचे आहेत. त्यांची लोकसंख्या ५०० पेक्षाही कमी आहे.

३. संपूर्ण जगात आजही हे बेट खूप चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे आजही या बेटावर कितीतरी अशा जागा आहेत जिथे मनुष्य पोहचू शकलेला नाही.

येथील ५७२ बेटांपैकी केवळ  ३६ बेटे अशी आहेत जिथे माणूस जाऊ शकतो आणि राहू शकतो. निकोबारवर जाण्यासाठी फक्त रिसर्च आणि सर्वेसाठी निवडलेल्या लोकांनाच जाण्याची परवानगी आहे. सर्वच पर्यटकांना येथे जाण्याची अनुमती दिली जात नाही.

४. येथे सर्वात जास्त समुद्र कासव सापडतात. जगातील सर्वात मोठे कासव येथेच सापडला आहे. या कासवाचे नाव Dermocheleys Coriacea आहे. ही समुद्री कासवे आकाराने खूप मोठी असतात आणि प्रत्येक वर्षी अंदमानात पोहोचतात. जगातील सर्वात छोटे कासव ओलिव राइडली सुद्धा अंदमानात आपले घर बनवते.

 

andaman-nicobar-facts-marathipizza01

५. आपल्या रुपयांच्या नोटीवर जो जंगलाचा भाग दिसतो, तो अंदमान बेटाचाच आहे.

 

andaman-nicobar-facts-marathipizza03

 

६. अंदमानमध्ये व्यवसायासाठी मच्छीमारी करण्यास सक्त मनाई आहे. हे जगातील त्या निवडलेल्या प्रदेशांपेकी एक आहे जिथे समुद्री प्राण्यांना त्याचे जीवन स्वच्छंदीरित्या जगायला मिळते.

७.   शंभर वर्षांपूर्वी सूर्याची पहिली किरणे अंदमानच्या बेटांवर पडली होती. म्हणजे त्या दिवशी सूर्य या भागातून उगवला होता. असे सौभाग्य ‘कैचल’ बेटाला ही मिळाले होते.

 

sunrise marathipizza

 

८. अंदमानमध्ये फुलपाखरे खूप दिसतात. अंदमान फुलपाखरांसाठी ‘हॅप्पी आइलंड’ आहे. जवळपासच्या उष्णकटिबंध बेटांवरून इथे हजारो फुलपाखरे येथे येतात.

९. अंदमानमध्ये कोकोनट क्रॅब खूप जास्त दिसतात. हे जमिनीवर मिळणारे सर्वात मोठे खेकडे आहेत. त्यांची लांबी १ मीटर पर्यंत असते. ह्यांचा नारळ हा आवडता आहार असतो. हे आपल्या तोंडाने नारळासारख्या मजबूत कवच असणाऱ्या फळालाही तोडू शकतात.

 

andaman-nicobar-facts-marathipizza04

 

१०.      येथे सर्वात जास्त बंगाली भाषा बोलली जाते. त्याशिवाय हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम भाषा बोलणारे लोकही इथे आहेत.

११.      अंदमानचा राज्यप्राणी डुगोंग आहे. हा एक समुद्री जीव आहे आणि तो आपल्या जोडीदाराबरोबर खूप लाजाळू राहतो. यांचे ५ ब्रीडिंग सेंटर आहेत. त्यातील एक अंदमानात आहे.

 

dudong inmarathi

 

१२. भारतात एकच सक्रीय ज्वालामुखी आहे, तो अंदमानात आहे. हा ज्वालामुखी आइलँड पोर्ट ब्लेअर पासून १३५ किलोमीटर लांब स्थित आहे. अनेक पर्यटक खास हा ज्वालामुखी पाहण्यासाठी येथे येतात.

 

andaman volcano inmarathi

 

१३. पहिला युरोपीय व्यक्ती ज्याने अंदमानात आपली कॉलनी बनवली तो डॅनिश (डेन्मार्क चा निवासी) होता. हा १७५५ मध्ये अंदमानला पोहोचला होता. इंग्रज पहिल्यांदा १७८९ मध्ये अंदमानला चंथम बेटावर आले होते. इंग्रजांनी इथे आपली कॉलनी आणि नेवल मिलेट्री बेस बनवला.

 

andaman-nicobar-facts-marathipizza05

 

१४. डेनिश वसाहत कायदा १८६८ रोजी संपुष्टात आणला गेला. कारण इंग्रजांनी ती जागा विकत घेतली होती. त्यानंतर संपूर्ण बेटावर इंग्रजांचे राज्य अस्तित्वात आले होते.

१५. सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या ‘आझाद हिंद सेनेला’ जपानच्या मदतीने अजून मजबूत केले. हा दुसऱ्या महायुद्धाचाच काळ होता. बोसांनी अंदमान-निकोबारच्या उत्तर आणि दक्षिणी बेटांना शहीद द्वीप आणि स्वराज द्वीप असे नाव दिले.

 

andaman-nicobar-facts-marathipizza056

हे ही वाचा – भारतातील या ११ ठिकाणी फिरायला जाण्यासाठी लागते सरकारची परवानगी..!

१६. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अंदमान आणि निकोबार भारताचे एकमात्र असे भूमीक्षेत्र होते जे जपानने काबीज केले होते. जपानने भारताच्या उत्तर पूर्वचे काही भागही काबीज केले होते. सहा महिने जपानची या भागांवर सत्ता होती. मात्र अंदमान आणि निकोबार ह्या बेटावर ३ वर्षापर्यंत जपानने राज्य केले होते.

१७. अंदमानच्या दोन बेटांची नावे ईस्ट इंडिया कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांच्या नावावरून ठेवण्यात आली आहेत. ह्या बेटांची नावे हेवलॉक बेट आणि नील बेट अशी आहेत.

१८. इंग्रजी शासनामध्ये अंदमानचे नाव ‘काळ्या पाण्याच्या’ शिक्षेसाठी खूप चर्चित होते. येथील सेल्युलर जेल आजही स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीवीरांची गोष्ट सांगतात. आता या जेलला राष्ट्रीय स्मारक बनवले आहे.

 

andaman-nicobar-facts-marathipizza07

 

१९. भारतापेक्षा अंदमान हे इंडोनेशिया आणि म्यानमार देशांच्या जवळ आहे. अंदमान इंडोनेशिया पासून १५० किलोमीटर लांब आहे. तर भारतापासून मात्र अंदमान ८०० किलोमीटर लांब आहे.

२०. अंदमान बेटावरील ९० टक्के भाग जंगली आहे. हा भाग भारतातील कोणत्याही राज्यापेक्षा जास्त आहे.

 

andaman-nicobar-facts-marathipizza08

तर अश्या या भारताच्या सर्वांगीण सुंदर भागाला एकदा तरी भेट द्यायला हवीच!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?