' समुद्रात जीव द्यायला निघालेल्या कपिल शर्माचा तारणहार झाला होता 'शाहरुख'...

समुद्रात जीव द्यायला निघालेल्या कपिल शर्माचा तारणहार झाला होता ‘शाहरुख’…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

असं म्हणतात, की मुंबई ही मायानगरी आहे, प्रत्येकजण या मायानगरीत स्वतःची स्वप्नं घेऊन येतो आणि ही मायानगरीदेखील सगळ्यांना आपलंसं करून घेते. काहींची स्वप्नं इथे पूर्ण होतात, तर काहींची स्वप्नं अपूर्ण राहतात.

बॉलीवूडमध्ये प्रत्येकालाच यशस्वी व्हायचं असते. तो झगमगाट सगळ्यांना मोहून टाकणारा असतो, पण त्या झगमगाटा मागे एक भीषण वास्तव आहे. कोणत्याही क्षेत्रात करियर करायचं असेल, तर अडचणींचा सामना करावाच लागतो आणि तीच स्पर्धा, त्याच अडचणी बॉलीवूडमध्येही आहेतच.

प्रसिद्धीच्या वलयाची झिंग या क्षेत्रात इतकी आहे, की ती प्रसिद्ध मिळवण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. प्रत्येकालाच इथे यशाचं शिखर गाठायचं असतं आणि ही स्पर्धा कधीकधी इतकी जीवघेणी ठरते, की मानसिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बॉलीवूडचे अनेक कलाकार डिप्रेशनमध्ये जातात, स्पर्धेत टिकून राहण्याचा दबाव इतका वाढतो, की नको ते पाऊल उचलणं त्यांना सोप्पं वाटतं. आत्महत्येचे विचार मनात येतात.

तुमच्यापैकी बहुतेक लोकांना कपिल शर्माचा ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो’ आवडत असेलच. तुम्हाला वाटत असेल, की हा कपिल शर्मा आधी कोणीच नव्हता आणि या एका शो ने तो लगेच मोठा स्टार झाला, पण मंडळी असं मुळीच नाहीये, त्याला हे यश लगेच मिळालेलं नाही.

 

kapil sharma inmarathi

 

कधीकाळी लोकांना हसवणारा हाच कपिल शर्मा डिप्रेशनमध्ये होता आणि त्याच्या मनात आत्महत्येचे विचारही आले होते. यादरम्यान शाहरुखने त्याला खूप आधार दिला आणि त्याला नैराश्यातून बाहेर काढलं.

प्रत्येकाच्याच आयुष्यात एक वाईट वेळ असते. एक कठीण काळ असतो. कपिल शर्माच्या आयुष्यातही एक काळ असा होता जेव्हा अडचणींचा दबाव इतका वाढला, की त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले.

एका मुलाखतीत कपिल शर्मानेच ही गोष्ट सांगितली होती, की त्याच्या काही वाईट सवयींमुळे त्याच्या मनात आत्महत्येचे विचार यायचे. मद्यपान आणि त्यामुळे येणारं नैराश्य या वर्तुळात तो अडकला होता, आणि शाहरुखने त्याला यातून बाहेर काढलं.

 

srk and kapil sharma inmarathi

 

मद्यपानाची वाईट सवय त्याला लागली होती, करियरमध्ये देखील उतार होता. ‘आपण टीव्हीवर कोणताही कार्यक्रम करू शकणार नाही’ असं त्याला वाटत होतं. तो आत्मविश्वासच गमावून बसला होता.

‘फिरंगी’ या चित्रपटादरम्यान शाहरुखने त्याला खूप मदत केली. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ होण्यास शाहरुख त्याला सल्ले देत असे, पण कपिलच्या मनात एवढी भीती होती, की तो आपल्या पाळीव कुत्र्यासोबत दिवसदिवस स्वतःला खोलीत बंद करून घेत असे. स्टेजवर परफॉर्म करण्याचीही त्याला भीती वाटत होती.

त्याची ही अवस्था पाहून त्याच्या मित्राने त्याला स्वतःच्या ‘सी – फेसिंग’ फ्लॅटची चावी दिली. समुद्राजवळ राहून त्याचं मन प्रसन्न होईल, सकाळी फ्रेश वाटेल म्हणून त्याने कपिलला तिथे जाऊन राहण्याचा सल्ला दिला.

 

kapil sharma inmarathi

 

तिथे राहत असताना याच समुद्रात जीव द्यावा असे विचार कपिलच्या मनात येत होते. या सगळ्या नकारात्मक विचारांमधून शाहरुखने त्याला बाहेर काढलं. लोकांमध्ये होणारी निगेटिव्ह पब्लिसिटी त्याच्या नैराश्याचं कारण होती.

कपिल शर्माला आज सध्याच्या काळातील भारतीय हास्य जगतातील सर्वात मोठा कलाकार म्हणून ओळखले जाते. कपिल शर्माने आलेल्या अडी-अडचणींचा धैर्याने सामना केला आणि आज त्याने यशाचे खूप उंच शिखर गाठले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?