' टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळेस विमानात लाईट्स कमी केले जातात, कारण माहितीये? – InMarathi

टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळेस विमानात लाईट्स कमी केले जातात, कारण माहितीये?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोरोनामुळे गेली १-२ वर्ष आपण घरातच आहोत, कुठे फिरायला जाणं नाही की कोणाला भेटणं नाही. पण आता ही बंधनं थोडी शिथिल होत आहेत. गेल्या एक- दोन महिन्यात तुम्ही सोशल मीडियावर अनेक लोकांच्या पोस्ट्स बघितल्या असतील. बरेचजणं सुट्टी काढून कुठे ना कुठे फिरायला गेले आहेत.

पूर्वी कुठे फिरायला जायचं म्हटलं की रेल्वे, बस यांचाच जास्त विचार केला जायचा, पण हल्ली ऑफिसमध्ये कमी दिवसांची सुट्टी मिळते, म्हणून रेल्वेपेक्षा फ्लाईटला जास्त पसंती दिली जाते.

 

flight inmarathi1

 

वेळ वाचवण्यासाठी हल्ली बरेचजण विमानाने प्रवास करतात. विमानाने प्रवास करायचं म्हणजे अनेक नियमही आलेच. काही महिन्यांपूर्वी कोव्हीड टेस्टचा रिपोर्टही यासाठी लागत होता. आता भारतात प्रवास करायचा असेल तर दोन्ही लशी झाल्याचं सर्टिफिकेट बंधनकारक आहे.

कोव्हीडच्या पूर्वीही विमानाने जायचं म्हणजे अनेक गोष्टींचं भान ठेवावं लागतं. कमी सामान, सामानाचं वजन अशा अनेक गोष्टी काळजीपूर्वक पाहाव्या लागतात. शिवाय विमान जेव्हा टेक ऑफ करतं आणि लँड करतं तेव्हाही सीट बेल्ट, फोन बंद करणं अशा गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.

विमानात प्रवेश केल्या केल्या त्यांच्या स्टाफकडून आपल्याला काही सूचना दिल्या जातात. सीट बेल्ट कसा लावायचा याचं प्रात्यक्षिकही ते दाखवतात. तुम्ही कधी एक गोष्ट पहिलीये का? विमान टेक ऑफ करताना आणि लंड होताना आतले लाईट्स कमी होतात. असं का? चला बघूया.

 

flight inmarathi

 

प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं. विमानतले लाईट्स कमी होण्यामागेही एक कारण आहे. यामागचं कारण म्हणजे आपले ‘डोळे’.

आपल्या डोळ्यांना उजेडातून अंधारात आणि अंधारातून उजेडात आल्यानंतर अॅडजस्ट व्हायला १० ते ३० मिनिटं लागतात. त्यामुळेच डोळ्यांना फार त्रास होऊ नये यासाठी लाईट्स कमी केले जातात, त्यामुळे बाहेर पडल्यावर डोळ्यांना फार त्रास होत नाही. कमी उजेडात डोळे नीट अॅडजस्ट होतात.

लाईट्स कमी करण्यामागे अजून एक कारण आहे. बरेचसे विमान अपघात हे टेक ऑफ किंवा लँडिंगच्या वेळीच होतात. अशा वेळी कमी लाइटमध्ये ‘exit दरवाजे’ आणि आपत्कालीन सूचना दिसाव्यात.

 

flight inmarathi1

 

exit दरवाज्यांवर अंधारात चमकणारे लाईट्स असतात, ते ठळकपणे दिसावेत यासाठी विमानतळे लाईट्स टेक ऑफच्या वेळी कमी केले जातात.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?