' ट्रक ड्रायव्हर असलेल्या वडिलांचे कष्ट पाहून मुलाने सुरु केला व्यवसाय, आज करोडो कमावत आहे

ट्रक ड्रायव्हर असलेल्या वडिलांचे कष्ट पाहून मुलाने सुरु केला व्यवसाय, आज करोडो कमावत आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज प्रत्येक वडिलांचं स्वप्न असत आपल्या मुलाने मुलीने आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकावे, मुलांच्या जशा पालकांच्या बाबतीत अपेक्षा असतात तशाच पालकांच्या देखील आपल्या पाल्यबद्दल अपेक्षा असतात. आज अनेक वडीलधारी मंडळी खडतर परिस्थितीवर मात करत आपल्या मुलामुलींना शिकवून एक चांगला माणूस बनवतात, त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करतात, आज अशाच एका मुलाची गोष्ट सांगणार आहोत, चला तर मग कोण आहे तो मुलगा जाणून घेऊयात..

ज्या मुलाबद्दल आम्ही सांगणार आहोत त्याचे नाव आहे निलेश घुले त्याचेवडील ट्रक ड्रायव्हर होते त्यामुळे निलेश यांनी लहानपणापासून आपल्या वडिलांना कष्टात पाहिले होते. खूप कष्ट, कामाची अनियमितता आणि त्यामुळे मिळणाऱ्या मोबदल्याची कमतरता हे चित्र बघून लॉजिस्टिक्स क्षेत्रापासून दूरच राहायचा निर्णय निलेशने घेतला. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.

 

nilesh inmarathi

 

अभ्यासात हुशार असणाऱ्या निलेश यांनी शिक्षणाची शिडी भरभर चढली. आय आय एम बँगलोर इथून उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी इन्फोसिस आणि जिओ सारख्या कंपनींसाठी काम केलं. रिलायन्स जिओ साठी सिनियर प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम करत असताना त्यांना लॉजिस्टिक्स आणि तंत्रज्ञान एकत्र करून भारतात कितीतरी मोठा व्यवसाय उभारता येऊ शकतो याची कल्पना आली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

निलेश म्हणतो, “लॉजिस्टिक्स क्षेत्रात असलेले कष्ट आणि दुःख माहीत असल्याने त्याकडे वळण्याचा कधीच विचार केला नव्हता, परंतु देशात आलेल्या डिजिटल लाटेमुळे मला माझ्या मतावर पुन्हा विचार करावा लागला”.

२०१६मध्ये निलेश आणि त्याचा आय आय एम बँगलोरचा वर्ग मित्र सुप्रीतकुमार पेरीसेटला याने मिळून ‘ ट्रकभेजो’ नावाची लॉजिस्टिक्स कंपनी स्थापन केली.

रिटेल ,टेलिकॉम आणि विविध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांशी वार्षिक करार करून त्यांच्या गरजेनुसार कमी, मध्यम ते जास्तीच्या अंतरावर वितरण करण्याचे काम ‘ ट्रकभेजो’ ही स्टार्टअप कंपनी करते.

कंपनी सुरू केल्यापासून एक मिलियन एवढ्या डिलिवरी म्हणजे वितरण केल्याचा दावा कंपनी करते. फ्लिपकार्ट , डीमार्ट, अमेझॉन, नेस्ले, हिंदुस्तान युनिलिव्हर अशा मोठमोठ्या कंपन्या ‘ ट्रकभेजो’च्या ग्राहक आहेत.

 

flipkart-marathipizza01
indiacityblog.com

 

कंपनी कशी काम करते ?

निलेश म्हणतात, मला तंत्रज्ञानावर आधारित लॉजिस्टिक्स कंपनी उभारायची होती. लहानपणापासून हे क्षेत्र जवळून पाहिल्यामुळे मला यातील त्रुटी माहीत होत्या. ग्राहकाला अखंड सेवा हवी असते त्यासाठी सुरवातीपासून शेवटपर्यंत काम कधी आणि कसं होणार आहे याची दृश्यमानता दिल्यास ते सोपं होतं.

आमच्या तंत्रज्ञानानुसार ग्राहक , ट्रकचालक आणि अंतर्गत ऑपरेशन व्यवस्थापक हे महत्त्वाचे दुवे आहेत. तसेच त्यांच्या इन हाऊस टीमने एप्लिकेशन्स विकसित केले आहे. हे एप्लिकेशन्स पहिल्यापासून ते शेवटच्या मैलापर्यंत मालवाहतूक शोधण्यात मदत करतात. त्यामुळे जर एखादा ट्रक जर एका ठिकाणी तीन तासापेक्षा जास्त वेळ अडकला असेल तर अंतर्गत ऑपरेशन व्यवस्थापकाला समस्या शोधून काढता येते.

 

nilesh 2 inmarathi

 

निलेश म्हणतात, “काम यशस्वी होण्यासाठी नियोजन ही गुरुकिल्ली आहे. ‘ ट्रकभेजो ‘ ऑपरेशन्स अखंडतेने पूर्ण करते कारण सर्व काही सुरवातीपासूनच नियोजित असते. मी स्वतः डिस्पॅचर सोबत क्लस्टरिंग करतो आणि वेगवेगळ्या क्लस्टरला वाहने नियुक्त करतो.”

पुढील पायरी म्हणजे डिस्पॅच योजना ग्राहकांबरोबर शेयर करणे. तिसरा पैलू म्हणजे विशिष्ट क्लस्टर साठी कोणते वाहन नियुक्त करणे आवश्यक आहे ते निर्धारित करणे.” तो पुढे म्हणतो की, कंपनीकडे ३००० अधिक सक्रिय ट्रक आणि वार्षिक करार असलेले ३७ ग्राहक आहेत.

 

nilesh 2 inmarathi

 

व्यवसाय प्रणाली

कोविड १९ नंतर सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. बहुतांश छोटे व्यावसायिक मेटाकुतीला आले आहेत. अशात लॉजिस्टिक्स क्षेत्रात डिजिटलायजेशन होऊन ते उभारी घेत आहे. लॉकडाऊनच्या काळात झालेल्या ग्राहकांच्या खरेदी वर्तनातील बदलामुळे पुरवठा साखळीवर लक्षणीय परिणाम झाला आहे. अशातच मेक इन इंडिया, वोकल फॉर लोकल अशा योजना प्रोत्साहन देतात.

ट्रक ड्रायव्हर हे या साखळीतील महत्त्वाचे परंतु नेहमीच दुर्लक्षित घटक आहेत. लॉजिस्टिक्स सारख्या असंघटित क्षेत्रातील त्रुटीमुळे इच्छा असूनही त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करता येत नाही. परिणामी त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो आणि कमी मानधनात समाधानी राहावे लागते.

 

truck inmarathi

“ट्रक भेजो’मुळे त्यांना नियमित काम आणि डिजिटल स्वरूपात पेमेंट मिळते. तसेच त्यांना पायलट किंवा पार्टनर म्हणून हाक मारताना आम्ही पाहतो त्यामुळे हळू हळू बदल होत आहे हे स्वागतार्ह आहे. येत्या काही वर्षात भारताच्या अनेक शहरांमध्ये आम्हाला आमच्या स्टार्ट अपचा विस्तार करायचा आहे. पुढील काळात लघु मध्यम व्यवसाय हे देशाच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावतील आणि आम्हाला त्याचा भाग व्हायला नक्कीच आवडेल असा निष्कर्ष निलेश यांनी काढला.

नेहमीच्याच, आजूबाजूला दिसणाऱ्या क्षेत्रात पाऊल टाकून काहीतरी नवीन करणाऱ्या मराठमोळ्या निलेश घुले यांची कहाणी प्रेरणादायी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?