' उर्मिलाच्या प्रेमात वेडा झालेल्या रामूने चक्क माधुरीलासुद्धा फिल्ममधून बाहेर काढलं होतं! – InMarathi

उर्मिलाच्या प्रेमात वेडा झालेल्या रामूने चक्क माधुरीलासुद्धा फिल्ममधून बाहेर काढलं होतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज एखादा अभिनेता एखाद्या अभिनेत्रीबरोबर दिसला तर त्यानंतर काही महिन्यांनी तो तिच्याबरोबरच दिसेल की आणखी कुणाबरोबर याची काही शाश्वती नाही. पण बॉलिवूडमध्ये असाही एक दिग्दर्शक होऊन गेला जो सुरूवातीपासूनच एका अभिनेत्रीच्या इतका आकंठ प्रेमात होता की त्या प्रेमाची जादू कधी सरलीच नाही.

त्याने त्याच्या स्वतःच्या पुस्तकातदेखील आपल्याला तिच्याविषयी जे वाटते ते भरभरून लिहीले आहे.

एकेकाळी राम गोपाल वर्मा आणि उर्मिला मातोंडकरच्या अफेअरची चांगलीच चर्चा होती. ‘मासुम’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केलेल्या उर्मिलाला खऱ्या अर्थाने लाइमलाइटमध्ये आणले ते राम गोपाल वर्माने.

 

ramu urmila inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘रंगीला’ च्या शुटींगदरम्यान राम गोपाल वर्मा उर्मिला मातोंडकरच्या प्रेमात पडला. त्याच्या ‘गन्स अँड थाइज : द स्टोरी अॉफ माय लाइफ’ या पुस्तकातील ‘दी वूमन इन माय फिल्मी लाइफ’ या प्रकरणात त्याने उर्मिला मातोंडकरच्या चेहर्‍यापासून तिच्या फिगरपर्यंतचे सगळे काही दैवी असल्याचे लिहिले आहे.

प्रेमाला लॉजिक नसतं असं म्हणतात. राम गोपाल वर्मा उर्मिला मातोंडकरसाठी इतका वेडा झाला होता की त्याने एकेकाळी चक्क त्यावेळची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितलाही उर्मिलासाठी सिनेमातून काढले होते.

 

madhuri dixit inmarathi

 

तो सिनेमा कोणता होता किंवा तो मोठ्या पडद्यावर आला का? हे बाहेर आलं नाही, पण इतकेच नाही तर त्याने त्याच्या मुंबईतील अंधेरीच्या अॉफीसमधील एका खोलीचे नावही ‘उर्मिला मातोंडकर’ असे ठेवले आहे.

रामूने उर्मिलाला जसं पडद्यावर दाखवलं तसं त्यापूर्वी अन्य कोणत्या दिग्दर्शकाने दाखवलं नव्हतं. ‘रंगीला’च्या आधी १९९२ साली आलेल्या ‘अंथम’, ‘द्रोही’ या तेलगु चित्रपटांमध्ये आणि १९९३ साली आलेल्या ‘गायम’ चित्रपटात राम गोपाल वर्माने उर्मिलाला काम दिले होते.

अशी वेळ आली होती जेव्हा राम गोपाल वर्मा त्याच्या सगळ्याच चित्रपटांमध्ये फक्त उर्मिला मातोंडकरलाच भूमिका देत होता.

केवळ रामूच्याच चित्रपटात कामं करणाऱ्या उर्मिलाने बाकी दिग्दर्शकांबरोबर काम करायला नकार दिला होता. रामूचे बॉलिवूडमधल्या बऱ्याच लोकांशी पटायचे नाही त्यामुळे अनेक दिग्दर्शकांनी उर्मिलाला त्यांच्या चित्रपटांमध्ये घेणे बंद केले होते. ज्यामुळे पुढे उर्मिलाच्या फिल्मी करिअरला उतरती कळा लागली.

 

urmila matondkar inmarathi

आपल्यासाठी रामूने माधुरीला काढून टाकले आहे हे उर्मिलाला कळले तेव्हा उर्मिलाने त्याने दिलेली ती संधी नाकारली आणि त्याचे तिच्यासाठी असलेले एकंदर वेड पाहून त्याच्याबरोबर चित्रपटात काम करणेही बंद केले.

उर्मिलाने बडे घर की बेटी, डकैत, चमत्कार, द्रोही, कानून, रंगीला, जुदाई, दौड, सत्या, मस्त, जंगली, तहजीब, एक हसीना थी, स्पीड सारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे.

असे असले तरी जे यश तिला ‘रंगीला’ मुळे मिळाले तसे घवघवीत यश तिने त्यापूर्वी पाहीले नव्हते. उर्मिलाला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी राम गोपाल वर्माने भरपूर मदत केली असं म्हटलं जातं. पण त्याच राम गोपाल वर्मामुळे तिचे करिअर रसातळालाही गेले.

उर्मिला ३ मार्च २०१६ रोजी तिच्याहून ९ वर्षांनी लहान असलेल्या काश्मिरी बिझनेसमन मोहसीन अख्तर मीर बरोबर विवाहबंधनात अडकली. हा विवाहसोहळा खासगी पद्धतीने संपन्न झाला. कपड्यांचा व्यवसाय असलेल्या मोहसीन अख्तर मीरचे स्वप्न मात्र कायमच मॉडेल बनण्याचे होते.

 

urmila husband inmarthi

 

मोहसीनने झोया अख्तरच्या ‘लक बाय चान्स’ या चित्रपटात काम केले आहे. ‘इट्स मॅन्स वर्ल्ड’ या सौरभ सेनगुप्ताच्या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकला होता. शिवाय ‘चक दे इंडिया’, ‘बीए पास’, ‘मुंबई मस्त कलंदर’ या चित्रपटांमध्येही त्याने काम केले आहे.

उर्मिला गेला बराच काळ फिल्मी पडद्यापासून दूर आहे. २०१४ साली तिचा ‘अजुबा’ हा शेवटचा चित्रपट आलेला होता. २०१८ साली आलेल्या ‘ब्लॅकमेल’ या चित्रपटातील ‘बेवफा ब्युटी’ या आयटम नंबरमध्ये ती शेवटची दिसली होती.

राम गोपाल वर्माने अगदी उर्मिलाच्या लग्नाची बातमी समजल्यानंतरही तिचे वैवाहिक आयुष्य कायम ‘रंगीला’सारखे असावे अशा शुभेच्छा दिल्या होत्या.

 

ramu and urmila inmarathi

 

तिच्या लग्नाची बातमी कळल्यावरही तिची मोहिनी रामूवरून उतरली नाही इतकी या ‘रंगीला गर्ल’ ने रामूला भूरळ पाडली होती हेच यातून दिसते.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?