' हनिमूनसाठी सुट्टी नाहीये? 'शॉर्ट-स्वीट' हनिमूनसाठी महाराष्ट्रातले ७ हटके डेस्टिनेशन्स

हनिमूनसाठी सुट्टी नाहीये? ‘शॉर्ट-स्वीट’ हनिमूनसाठी महाराष्ट्रातले ७ हटके डेस्टिनेशन्स

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण इतके अडकलेलो असतो, की आपण आपल्यासाठी ही वेळ काढू शकत नाही. अशावेळी शनिवार-रविवारची सुट्टी किंवा जोडून आलेल्या सुट्टीला कॅश करत तुम्ही एखादं छोटं हनिमून प्लॅन करू शकता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

लग्नसराईसाठी आधीच सुट्टी घेतलेली असते, त्यामुळे हनिमूनसाठी वेगळी सुट्टी मिळणं कठीणच होतं. आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्रातली काही कमाल डेस्टिनेशन्स घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुमचं ‘शॉर्ट अँड स्वीट’ हनिमुन होईल.

१. सूर्यमाळ ( मोखाड,ठाणे ) :

 

suryamal inmarathi

 

ठाणे जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यातील ‘सूर्यमाळ’ हे नवे हनिमून डेस्टिनेशन होऊ पहात आहे. तिथले निसर्गरम्य आणि शांत वातावरण नक्कीच तुम्हाला शहरी गोंगाटापासून दूर ठेवेल.

पावसाळ्यात खाली उतरणारे ढग, हिवाळ्यातली धुक्याची चादर आणि गुलाबी थंडी तुम्हाला सुखावून जाईल. आपला तंबू सोबत घेऊन गेलात तर रात्रीचे चांदण्यांनी भरलेले आभाळ तुमच्या गप्पांमध्ये सामील होईल.  तिथल्या अप्रतिम अशा नाचणीची भाकरी आणि उडदाचे पिठले सोबत रानभाज्या या खास ‘वारली’ मेनूची चव तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील.

तेव्हा छोट्या सुट्टीचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की ‘सूर्यमाळ’ला भेट द्या.

२. काशीद ( अलीबाग, रायगड ) :

 

kashid beach inmarathi

 

पांढरीशुभ्र स्वच्छं वाळू आणि निळ्या समुद्रासाठी प्रसिद्ध असलेला काशिद बीच महाराष्ट्रातील आवडते हनिमून डेस्टिनेशन आहे. ज्या जोडप्यांना शांततेशिवाय काहीही अनुभवायचे नाही त्यांच्यासाठी हा निळा समुद्र चांगला सोबती आहे.

याशिवाय जंजिरा किल्ला आणि फणसाड पक्षी अभयारण्य हे सोबतचे बोनस पॉइंट आहेत. तिथे मिळणारे ताजे सीफूड तुम्हाला तृप्त करेल हे निश्चित!

३. चौल ( अलीबाग, रायगड ) :

 

rameshwar mandir inmarathi

 

चौल हे चाफ्याचे गाव. गावात पाऊल टाकले, की नजरेला सगळीकडे बहरलेली चाफ्याची झाडे दिसतात आणि याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तिथले निसर्गसौंदर्य आणि नारळी- पोफळी च्या झाडांची घट्ट वीण!

इतिहासाचा भक्कम पाठिंबा असलेले गाव आपल्याला २००० वर्षे मागे घेऊन जाते. शहरी धकाधकीपासून निवांत आणि झाडांच्या कुशीत लपलेले चौल तुमचा मधुचंद्र अविस्मरणीय बनवेल यात शंका नाही.

४. इगतपुरी ( नाशिक ) :

 

igatpuri inmarathi

 

हनिमून आणि पर्यटन असा कॉम्बो पॅक देणारे इगतपुरी, एक थंड हवेचे ठिकाण आहे. नाशिक पासून जवळ असल्याने जाण्यायेण्याच्या सोयी सुद्धा उत्तम आहेत.

कॅमल व्हॅली, भातसा नदीचे खोरे, त्रिंगलवाडी किल्ला, घाटनदेवी मंदिर, त्रिंगलवाडी तलाव, वैतरणा धरण अशी अनेक पर्यटनस्थळे इगतपुरीजवळ आहेत. इथले आल्हाददायी वातावरण तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या मनाला रिफ्रेश करेल.

५. रतनवाडी ( अहमदनगर ) :

 

ratanwadi inmarathi

 

दरी खोर्‍यातून भटकायचे असेल तर रतनवाडी हा उत्तम पर्याय आहे. ४०० वर्षे जुन्या रतनगडाच्या पायथ्याशी वसलेले ३०-४० घरांचे रतनवाडी कपल्स साथी एक हॉट डेस्टिनेशन आहे.

रतनवाडी परीसरात अनेक धबधबे असून गळ्यातील हारासारखा दिसणारा ‘नेकलेस फॉल’ हा विशेष लोकप्रिय आहे. जवळच असलेला रतनगड आणि अमृतेश्वर महादेव मंदिर गर्दीपासून लांब असल्याने तिथे मिळणारी शांतता तुम्हाला सुखावून जाईल.

6. भंडारदरा ( अहमदनगर ) :

 

bhandaradara inmarathi

 

अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे भंडारदर्‍याच्या मूळ सौंदर्यात अजूनच भर टाकतात. भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.

 

७. म्हैसमाळ ( औरंगाबाद ) :

 

bhandaradara inmarathi1

 

औरंगाबादचे महाबळेश्वर म्हणजे म्हैसमाळ. आल्हाददायी हवा, मोकळे वातावरण आणि निसर्ग यांसोबतच औरंगाबाद या ५२ दरवाज्यांच्या शहराचा खास पाहुणचार असताना म्हैसमाळ सर्वांचे लाडके न ठरेल तर नवल. सोबतच एलोरा लेणी, देवगिरी किल्ला आणि घृष्णेश्वर मंदिर ही प्रेक्षणीय स्थळे ही आहेतच.

याबरोबरच सर्वांची आवडती लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, कर्जत, माथेरान ही आपली सर्वांची ऑल टाइम फेव्हरेट ठिकाणं तर आहेतच. तेव्हा या नवीन ठिकाणांना भेट देऊन तुमचं छोटं हनिमून नक्की एंजॉय करा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?