' दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनो NDA मध्ये जायचा विचार करताय? अशी करा तयारी – InMarathi

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनो NDA मध्ये जायचा विचार करताय? अशी करा तयारी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

आज भारत एक तरुणांचा देश म्हणून जगभरामध्ये ओळखला जातो. भारतामध्ये तरुणांना सैन्यामध्ये काम करण्याची आवड असल्याचे दिसून आलेले आहे. सीमेवर जाऊन देशाचे रक्षण करण्याची आवड प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये असते.

सैन्यामध्ये अधिकारी होण्यासाठी खूप खडतर मेहनत आणि परिश्रम घ्यायला लागतात. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी “नॅशनल डिफेन्स अकाडमी” यांच्यातर्फे घेण्यात येणारी परीक्षा महत्त्वाची ठरते.

 

happy students InMarathi

 

ज्या विद्यार्थ्याला सैन्यामध्ये अधिकारी म्हणून रुजू होण्याची इच्छा असेल त्याने ही परीक्षा जरूर द्यावी.

या परीक्षेसाठी तुमचं वय वर्ष सतरा पूर्ण असणे गरजेचे आहे आणि तुम्ही वयाच्या १९ व्या वर्षांपर्यंतच ही परीक्षा देऊ शकता.

ही परीक्षा देण्यासाठी तुम्हाला बारावीची शैक्षणिक पात्रता पूर्ण करावी लागते. जर तुम्हाला वायुसेनेत किंवा नौसेनेमध्ये सेवा द्यायची असेल तर तुम्हाला बारावी मध्ये फिजिक्स आणि गणित या विषयांचा अभ्यास करायला पाहिजे. फक्त बारावी पास या शैक्षणिक पात्रतेवर तुम्ही भारतीय थलसेनेत रुजू होऊ शकता.

 

nda inmarathi
hindustantimes.com

तुम्ही ही परीक्षा बारावीला असतानाही देऊ शकता त्यामुळे तुमचे एक वर्ष वाया जाण्यापासून वाचू शकते. ही परीक्षा वर्षामध्ये दोन वेळेस घेतली जाते. एप्रिलमध्ये आणि ऑगस्टमध्ये.

जर तुम्हाला या परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील तर तुम्ही या परीक्षेची तयारी तुमची दहावी झाली की लगेच करायला हवी.

ही परीक्षा लेखी स्वरूपात घेतली जाते. या परीक्षांमध्ये तुम्ही काळजीपूर्वक तुमचे उत्तरलिहिणे गरजेचे आहे कारण या परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग ची पद्धत वापरण्यात येते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या परीक्षेचा अभ्यास कसा करायचा?

हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांपुढे पडलेला असतो. या लेखामध्ये तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

“नॅशनल डिफेन्स अकाडमी” या संस्थेद्वारे भारतीय सैन्यामध्ये अधिकाऱ्यांची निवड केली जाते. या संस्थेमध्ये एअरफोर्स तसेच नौसेनेमध्ये निवडल्या जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची ट्रेनिंग केली जाते. एन डी ए जगातील काही सर्वोत्कृष्ट इन्स्टिट्यूट पैकी एक समजली जाते. ही संस्था महाराष्ट्रात पुणे येथे आहे.

जेव्हा एखादा विद्यार्थी एनडीएमधील त्याचे शिक्षण पूर्ण करतो त्यावेळी त्याला भारतीय सैन्यातील विविध ठिकाणी अधिकारी म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळते.

एनडीए मध्ये प्रवेश मिळण्याची परीक्षा ही खूप खडतर असते. त्यासाठीची लेखी परीक्षा यूपीएससी मार्फत घेतली जाते. यावरून तुम्हाला या परीक्षेची काठिण्यपातळी लक्षात येईलच. त्यामुळे, ज्या विद्यार्थ्याला एन डी ए मध्ये प्रवेश मिळवायचा आहे त्याने मेहनत करायची तयारी ठेवावी.

 

nda exam inmarathi
india.com

 

यातील लेखी परीक्षा ही दोन भागांमध्ये विभागली गेलेली आहे. गणित आणि सामान्यज्ञान अशा या दोन भागांची नावे आहेत.

यातील गणित या विषयाला तीनशे गुण आहेत आणि सामान्य ज्ञानला सहाशे गुण आहेत. यातील प्रत्येक परीक्षेसाठी दोन ते अडीच तासांचा अवधी देण्यात आलेला आहे. यातील प्रत्येक प्रश्न हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये छापलेला असतो.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचीही परीक्षा द्यायला लागते. या परीक्षेमध्ये सामूहिक चर्चा, सांघीक काम असे अनेक टप्पे असतात आणि जर यातून तुम्ही क्रमांक मिळवला तर तुम्हाला वैद्यकीय चाचणी द्यावी लागते.

हे होतं या परीक्षेचे स्वरूप. ही परीक्षा द्यायची इच्छा असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला भरपूर मेहनत आणि परिश्रम घ्यावे लागतील यात शंकाच नाही.

यातील लेखी परीक्षेची तयारी करताना वर सांगितल्याप्रमाणे गणित आणि सामान्यज्ञान असे दोन टप्पे करून घ्यावेत. यातील गणिताची परीक्षा देताना तुम्हाला डिफरन्शियल कॅल्क्युलस, भूमिती, अल्जेब्रा, इ. अशा अनेक गणितातील पद्धतींचा अभ्यास असणे गरजेचे असते.

या भागाची तयारी करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा तुमच्या गणितातील साध्या गोष्टींची तयारी भरपूर करायला हवी. यातील प्रत्येक प्रश्न तुमच्या ज्ञानाची परीक्षा घेणारा असेल. यासाठी तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन घेऊन त्यांची तयारी करणे गरजेचे आहे.

या परिक्षेसाठी तुम्हाला वेळेचे योग्य नियोजन करणेही गरजेचे आहे. १२० मिनिटांमध्ये तुम्हाला २०० प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात त्यामुळे वेळ ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरेल.

 

NDA-2019 inmarathi
india.com

लेखी परीक्षेचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे सामान्य ज्ञान परीक्षा. या परीक्षेमध्येही दोन टप्पे केलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या इंग्लिशच्या ज्ञानाबद्दल प्रश्न विचारलेले असतात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सामान्य गोष्टींवरती प्रश्न विचारले गेलेले असतात.

यामध्ये इंग्लिश या विषयाच्या परीक्षेला २०० गुण दिलेले आहेत. या परीक्षेची तयारी करताना इंग्लिश शब्दांचा साठा तसेच इंग्लिश भाषेचे व्याकरण इत्यादी गोष्टी तपासल्या जातात.

तुमचे इंग्लिशवर किती प्रभुत्व आहे याही गोष्टीचे आकलन या परीक्षेमधून केले जाते. या परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्ही इंग्लिश वर्तमानपत्र वाचण्याची सुरुवात करायला हवी’ या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा.

त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न. हा टप्पा या परीक्षेमध्ये चारशे गुणांसाठी येतो. या परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांचे सामान्य विषयांवरती असणारे आकलन लक्षात येते. या परीक्षेमध्ये सहा वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांवरती प्रश्न विचारले जातात.

यामध्ये सामान्य ज्ञान, भारताचा इतिहास, भौतिकशास्त्र, भूगोल, रसायनशास्त्र हे महत्त्वाचे घटक आहेत. या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी रोजच्या घडामोडींवर ती तुमचे लक्ष असणे गरजेचे आहे.

या दोन्ही परीक्षानंतर परीक्षेचा अजून एक टप्पा असतो तो म्हणजे तुमच्या बौद्धिक क्षमतेची परीक्षा घेणारा टप्पा. या परीक्षेसाठी तुम्हाला तुमच्यातील कौशल्य व्यक्त करता आली पाहिजेत. या परीक्षेमध्ये तुमच्यात अधिकारी गुण आहेत की नाही हे तपासले जाते.

या संपूर्ण एनडीए च्या परीक्षेचा काळ पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर संयम असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचं असेल तर आजच तुमचे ध्येय ठरवून घ्या.

यासाठी तुम्ही तुमची तयारी चालू करा. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. तुम्हाला या परीक्षेसाठी आमच्यातर्फे शुभेच्छा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?