' वरुण गांधींचं स्कँडल बाहेर आलं आणि तेव्हाच UP चं "भावी मुख्यमंत्रीपद" गमावलं...

वरुण गांधींचं स्कँडल बाहेर आलं आणि तेव्हाच UP चं “भावी मुख्यमंत्रीपद” गमावलं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राजकीय पटावर गांधी घराणं नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं आहे. मागील पिढीनं कौतुकाची फुलं झेलली तिथे या घराण्यातील तिसरी आणि चौथी पिढी मात्र वारंवार बदनामीच्या भोवर्‍यात अडकताना आढळतेय. मग त्या सोनिया-मनेक असोत, प्रियंका वाड्रा असोत, राहूल गांधी असोत की वरूण गांधी.

गेल्या दोन पिढ्या हे घराणं सातत्यानं भलत्या कारणांसाठी चर्चेत राहू लागलं आहे. अशीच एक घटना अलिकडच्या काही वर्षांत वरूण गांधी यांच्याबाबतीत घडली होती ज्या घटनेमुळे त्यांची राजकीय कारकीर्दच धोक्यात आली.

 

gandhi family featured inmarathi

 

साल १९७८, उपपंतप्रधान जगजीवन राम यांचा मुलगा सुरेश याची एका विद्यार्थिनीसोबत असणारी आक्षेपार्ह्य छायाचित्रं प्रकाशित झाली. कालांतरानं समोर आलं की हे प्रकरण लोकांसमोर आणण्यात मनेका गांधी यांचा हात होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

या प्रकारे एखाद्या राजकीय व्यक्तीचं सेक्स स्कॅण्डल चव्हाट्यावर आणण्याचं काम देशात पहिल्यांदाच घडलं होतं आणि ते करण्याचं श्रेय गांधी घराण्याची बहू मनेका गांधी यांना जातं.

 

maneka gandhi bjp inmarathi

 

या घटनेमुळे जगजीवन यांची राजकीय कारकीर्द उध्दस्त झाली. असं सांगितलं जातं की ही आक्षेपार्ह्य छायाचित्रं जवळपास सर्व वृततपत्रं आणि मासिकांना वाटली गेली होती मात्र सर्वांनी यावर मौन बाळगलं मात्र फक्त सूर्या मासिकानं ही छायाचित्रं प्रसिध्द करून खळबळ माजविली. या मासिकाची विक्रमी विक्री झाली होती. याच्या खास १.२ लाख प्रती छापण्यात आल्या होत्या. या मासिकाच्या संपादक होत्या मनेका गांधी.

कट टू, साल २०१६ देशातली कॉंग्रेस ज्या घराण्यात रूजली, किंबहुना कॉंग्रेस म्हणजेच हे घराणं असं समिकरण बनलं त्या कुटुंबातील मुलगा कॉंग्रेसच्या कट्टर विरोधक भाजपमधे गेला. तरूण रक्त, सळसळता उत्साह आणि गांधी विरुध्द गांधी असा खेळ रंगवायला मिळालेला मोहरा.

वरूण गांधींचं पक्षातलं प्रस्थ अचानकच वाढलं आणि भाजपमधील काहींच्या हे डोळ्यात खटकू लागलं. केवळ आडनावाचा फायदा मिळत अनेक ज्येष्ठांना डावलत वरूण गांधी पुढे गेलेले बघून त्यांना थोपविण्याचे प्रयत्न सुरू झाले. अशातच एक दिवस वरूण गांधी यांची एका परकीय मॉडेलसह असणारी सेक्स क्लिप व्हायरल झाली.

 

varun gandhi marathipizza

 

हा केवळ वरुण गांधी यांना धक्का होता असं नाही तर एकूणच गांधी कुटुंब आणि त्याभोवती असणारं वलय यालाही धक्का होता. गांधी घराण्यातील कोणितरी असं काही करू शकतं यावर सामान्य गांधी कुटुंब प्रेमीचा विश्वास बसणं अशक्य होतं मात्र समोर जे दिसत होतं ते वास्तव होतं.

वरूण गांधींनी आपला बचाव करताना सांगितलं की, हा एक हनीट्रॅप होता जो मला फसविण्यासाठी मुद्दाम रचला गेला होता. एखाद्या वेबसेरीजमधे शोभावा असा हा प्लॉट होता आणि यातला मुख्य ट्विस्टही कहानी में ट्विस्ट म्हणण्याइतका रंजक आहे.

 

varun g inmarathi

वरुण गांधींना या हनि ट्रॅपमधे ज्यानं अडकविलं त्याचं नाव, अभिषेक वर्मा. हा अभिषेक वर्मा शस्त्रास्त्रांचा दलाल होता मात्र तो सुप्रसिध्द हिंदी कवी श्रीकांत वर्मा यांचा मुलगा होता. हे कवी श्रीकांत त्यांच्या गांधी घरण्याशी असणार्‍या सलगीसाठी परिचित होते.

राजकीय भाट म्हणून खास वर्तुळात परिचित श्रीकांत वर्मा यांना गांधी घराण्याच्या मेहेर नजरमुळे राज्यसभा सभासद बनण्याचा मानही मिळाला होता. अभिषेक आणि वरूण हे बाल लहानपणापासूनच एकमेकाला ओळखत होते. शस्त्रास्त्रं खरेदी गोपनियता भंग केल्याचं प्रकरण अभिषेकला तिहार जेलपर्यंत घेऊन गेलं आणि या प्रकरणाचे शिंतोडे या सेक्सस्कॅण्डलसह वरूण गांधींवर उडाल्यानं उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होऊ घातलेल्या वरूण गांधींना विजनवासात जावं लागलं.

 

aabhi 1 inmarathi

 

एकेकाळी ज्या सेक्सक्सॅण्डची मदत घेऊन मनेकांनी उपपंतप्रधानांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आणलं त्यांच्याच त्याच फ़ॉर्म्युलाचा वापर त्यांच्या स्वत:च्या मुलाच्या हातून मुख्यमंत्रीपद खेचून घेण्यासाठी केला गेला याहून दुसरा दुर्दैवयोग नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?