' आपल्या मुलाला जेलची हवा खाऊ घालणाऱ्यांना शाहरुख कोर्टात खेचणार का?

आपल्या मुलाला जेलची हवा खाऊ घालणाऱ्यांना शाहरुख कोर्टात खेचणार का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या आर्यन खान ड्रग्स प्रकरण हे शांत झालं असलं तरी त्यावरून होणारी चर्चा काही कमी झालेली नाही, सोशल मीडिया असो किंवा वृत्तवाहिन्या यामधून आपल्याला सतत याविषयीच्या अपडेट मिळत आहेत.

या सगळ्या प्रकरणादरम्यान समीर वानखेडे आणि नवाब मलिक हा संघर्ष आपल्याला बघायला मिळाला, समीर वानखेडे यांच्यावर बरेच आरोप नवाब मलिक यांनी लावले, अगदी आत्ताआत्तापर्यंतसुद्धा समीर वानखेडे यांच्या धर्माबद्दल त्यांच्या मुस्लिम नावाबद्दल मलिक यांनी बरीच गरळ ओकली.

 

NCP vs NCB inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

यावरुन बरीच चर्चा झाली, समीर वानखेडे यांना या केसमधून काढून टाकण्यात आलं तर, समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आणि त्यांचे कुटुंबीय यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक खुलासे केले.

एकंदरच या सगळ्या प्रकरणाने एक राजकीय वळण जरी घेतलं असलं तरी या केसमुळे बॉलिवूडमधले काळे धंदे उघडे पडले आहेत. बॉलिवूडच्या एवढ्या मोठ्या सुपरस्टारच्या मुलाला अटक होऊन इतके दिवस त्याला कोठडीत ठेवणं ही काय साधीसुधी गोष्ट नव्हती.

शाहरुखने त्याच्या मुलाला बाहेर काढण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं, महागड्या वकिलांची टीम उभी केली, तरीही त्याला जामीन मिळायला तब्बल महिना लागला.

 

shahrukh legal team inmarathi

 

आज आर्यन खान बाहेर आहे, शिवाय कोर्टाने हेसुद्धा जाहीर केले की त्याच्याविरुद्ध सापडलेले पुरावे हे सबळ नाहीत, त्यामुळे आता सोशल मीडियावर अशी चर्चा होतिये की आर्यन खानला जाणून बुजून या प्रकरणात गोवलं गेलं आहे.

नुकतंच मुंबई हाय कोर्टाने या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं की “आर्यनविरुद्ध गोळा केलेल्या पुराव्यानुसार त्याने ड्रग्स सेवन केलं आहे हे सिद्ध होऊ शकत नाही, शिवाय त्याच्या चॅटमधूनसुद्धा तितके सबळ पुरावे हाती लागलेले नाहीत. केवळ त्या क्रुजवर उपस्थित असल्याने त्याला अटक केली जाऊ शकत नाही”

हायकोर्टाच्या या स्पष्टीकरणामुळे आता NCB च्या एकंदर कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं राहतंय, खरंच या प्रकरणात काही तथ्य होतं का बॉलिवूडला धडा शिकवण्यासाठी हे षडयंत्र रचलं होतं ते येणार काळच ठरवेल.

ncb inmarathi

शाहरुख अॅक्शन मोडमध्ये :

सध्या काही मीडिया चॅनल्सच्या सूत्रांच्या माहितीनुसार शाहरुख आता समीर वानखेडे यांच्याविरोधात मानहानीची केस करणार असल्याची माहिती मिळत आहे.

आपल्या मुलाची छबी मलिन करणाऱ्या काही ऑफिसर्सना शाहरुख कोर्टात खेचू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे, शिवाय शाहरुखच्या लीगल टीमकडूनसुद्धा तसे संकेत येत आहेत.

शिवाय शाहरुखच्या एका खास मित्राकडूनसुद्धा असं समोर आलं आहे की, आर्यनला तब्बल ३ आठवडे ज्याच्यामुळे जेलची हवा खावी लागली त्याच्याविरुद्धसुद्धा शाहरुख नक्कीच काहीतरी अॅक्शन घेणार आहे.

 

aryan khan shahrukh khan inmarathi

 

सध्या तरी शाहरुख किंवा त्याच्या लीगल टीमकडून यासंदर्भात पुष्टी झालेली नाही, पण समीर वानखेडे यांच्याविरुद्ध केली जाणारी स्टेटमेंट आणि त्यांना या केसवरून काढून टाकणं हे सगळं बघता शाहरुख नक्कीच असं काही करू शकतो याची शक्यता नाकारता येणार नाही.

खरंच या प्रकरणातलं सत्य बाहेर आलं आणि आर्यनच्या या केसबद्दल काहीतरी वेगळीच माहिती समोर आली तर येणारा काळ हा आपल्या देशातल्या तपास यंत्रणांसाठी फारच कठीण असेल!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?