' भाजप मंत्र्याचा आरोप : गोविंदाने निवडणूक जिंकण्यासाठी दाऊदची मदत घेतली होती… – InMarathi

भाजप मंत्र्याचा आरोप : गोविंदाने निवडणूक जिंकण्यासाठी दाऊदची मदत घेतली होती…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडीने नुकतीच दोन वर्ष पूर्ण केली आहेत. विरोधी पक्ष सातत्याने हे सरकार टिकेल की नाही यावर शंका व्यक्त करत होते मात्र तरीदेखील सरकारने दोन वर्ष पूर्ण केली आहेत. पुढची तीन वर्ष कशी जातील हे आता कळलेच

देशातील ५ राज्यांच्या निवडणूक तोंडावर आल्या आहेत. त्यासाठी सगळेच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकांवर प्रामुख्याने सगळ्यांचे लक्ष आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या भाजपचे सरकार आहे त्यांना शह देण्यासाठी विरोधी पक्ष वेगवेगळ्या शकला लढवत आहेत. तिकडे पंजाबच्या राजकरणात रोज काहीतरी नवे पहायला मिळत आहे.

 

Tripura_Assembly_Election_inmarathi
livehindustan.com

 

पंजाबमध्ये आता सोनू सूदच्या बहिणीने राजकरणात पाऊल ठेवले आहे, बॉलीवूडची मंडळी सुद्धा निवडणुका आल्यावर आपले नशीब आजमावण्यासाठी रिंगणात उतरतात. काहींचं नशीब त्यांना साथ देत तर काहीजण अपयशी ठरतात.

 

 

विनोदाचा बादशाह म्हणवला जाणारा अभिनेता गोविंदाची क्रेझ जेव्हा कमी होऊ लागली होती तेव्हा त्याने सुद्धा राजकरणात एंट्री मारली होती. मात्र विरोधी पक्षातील उमेदवाराने त्याच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनी खळबळ उडाली होती, नेमके काय केले होते आरोप चला तर मग जाणून घेऊयात….

 

govinda inmarathi

 

ते साल होत २००४ जेव्हा लोकसभेच्या निवडणूका लागल्या होत्या. उत्तर मुंबई विभागातून काँग्रेसने गोविंदाला तिकीट दिले होते. ९० च्या दशकापासून एकीकडे खान मंडळी आपले बस्थान बसवत होती तर दुसरीकडे गोविंदाने आपल्या नंबर १ या सुपरहिट फॉर्मुल्याच्या आधारावर सिनेमांची लाईन लावली होती.

 

Flag_of_the_Indian_National_Congress-marathipizza
en.wikipedia.org

 

२००० साल उजाडले आणि एककेकी गोविंदाचे सिनेमे कमी झाले, बहुदा त्याच्या एकाच प्रकारच्या सिनेमांना लोक कंटाळले असतील, त्यात वाढत्या प्रसिद्धीची हवा त्याच्या डोक्यात गेली असावी. बॉलीवूडमधील आपली लोकप्रियता एकूणच कमी होत चालली आहे असे लक्षात येताच त्याने निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला.

गोविंदाची प्रसिद्धी लक्षात घेता या अस्सल मुंबईकराला काँग्रेसने तिकीट दिले. भाजपने गोविंदाला आवाहन देण्यासाठी आपल्या पक्षातील जेष्ठ नेत्याला तिकीट दिले ते म्हणजे राम नाईक, राम नाईक यांनी १९९९ च्या दरम्यान जेव्हा अटलजींचे सरकार होते तेल आणि नसैर्गिक वायू खात्याचे मंत्रिपद सांभाळले होते.

 

naik inmarathi

गोविंदाचे जरी सिनेमे तेव्हा कमी येत होते तरी त्याची लोकप्रियता कमी झाली नव्हती, गोविंदाने भाजपच्या राम नाईक यांचा पराभव केला आणि थेट दिल्ली गाठली. मात्र प्रकरण इथे संपणार नव्हते.

राम नाईक यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून (चरैवत चरैवत) गोविंदावर आरोप केले होते. त्यांचं असं म्हणणं होते की गोविंदाने निवडणूक जिंकण्यासाठी दाऊद इब्राहिम सारख्या डॉनची मदत घेतली होती. तसेच बिल्डर हितेन ठाकूर यांची सुद्धा मदत घेतली होती.

 

mandakini dawood inmarathi

 

गोविंदा पर्यंत जेव्हा हे प्रकरण पोहचले तेव्हा त्यांनी या गोष्टीला साफ नकार दिला. त्याने ऑडिओ स्वरूपातून आपल्यावरील सगळे आरोप फेटाळले होते, त्यात त्याच असं म्हणणं होते की जेव्हा पोलिसांकडे कोणते पुरावे नाहीत तर राम नाईक कोणत्या अर्थाने बोलत आहेत, त्यांचा पराभव झाल्याने ते कदाचित असे बोलत असतील. एक व्यक्तीच्या जिंकण्याचा श्रेय एखाद्या अंडरवर्ल्ड ला कसे काय देऊ शकतात? राजकरणात असे आरोप करणं चुकीचे आहे. अशा शब्दात गोविंदाने आपले स्पष्टीकरण दिले होते.

बॉलीवूड आणि अंडरवर्ल्डचे कनेक्शन आपल्यासाठी काही नवे नाही, त्यांच्या कनेक्शनचे गोष्टी आपण ऐकत आलोच आहोत. या प्रकरणाचे पुढे काहीच झाले नाही मात्र पुन्हा अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूडच्या समीकरणावर चर्चा मात्र तेव्हा चांगल्याच रंगल्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?