' कसाबच्या हल्ल्याच्या वेळी मुंबईला वाचवणाऱ्या मार्कोस कमांडोज विषयी

कसाबच्या हल्ल्याच्या वेळी मुंबईला वाचवणाऱ्या मार्कोस कमांडोज विषयी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

आपल्या भारतामध्ये वेगवगेळ्या प्रकारच्या फोर्सेस आहेत. इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि वायुसेना या भारताच्या तीन महत्त्वाच्या फोर्सेस आहेत.

पण या सैन्याच्या काही स्पेशल फोर्सेस देखील आहेत, ज्या गरजेच्या वेळी कोणतेही महत्त्वपूर्ण कार्य पार पडतात.

या स्पेशल फोर्सेसपैकीच एक आहे, नौसेनेचे मार्कोस कमांडो फोर्स.

 

Marcos special force of indian navy.Inmarathi

 

२६ नोव्हेंबर २००८  मध्ये जेव्हा मुंबईत १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला होता, तेव्हा नौसेनेच्या याच मार्कोस कमांडोनी त्यांना कंठस्नान घातले होते आणि या ऑपरेशनला पूर्ण केले होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

त्यावेळी मार्कोस कमांडोनी कितीतरी भारतीय लोकांना सुखरूप बाहेर काढले होते. आज आपण याच मार्कोस कमांडोंविषयी काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत..

१.  मार्कोस कमांडो फोर्स ही इंडियन नेव्हीची एक स्पेशल फोर्स युनिट आहे, जी १९८७ मध्ये तयार करण्यात आली होती.

 

Marcos special force of indian navy.Inmarathi1

 

मार्कोसला सुरवातीला मरीन कमांडो फोर्स म्हणजेच एमसीएफच्या नावाने देखील ओळखले जात होते. मार्कोसला जगातील सर्वात शक्तिशाली १० फोर्सेसमध्ये येते.

२. मार्कोसला हवा, पाणी आणि जमीन या तिन्ही प्रकारच्या ऑपरेशनसाठी ट्रेन केले जाते.

मार्कोस हे ऑल इन वन कमांडो असतात, जे पॅरा जंपिंगपासून सी डायव्हींगपर्यंत सगळ्यामध्ये पारंगत असतात.

 

marcos-inmarathi

मार्कोस कमांडोंची  ट्रेनिंग अमेरिकेचे नेव्हीसीस आणि ब्रिटिश स्पेशल फोर्स एसएएस सारखीच जगातील सर्वात कडक ट्रेनिंग असते.

३. मार्कोस स्पेशल फोर्ससाठी जे उमेदवार निवडले जातात, ते इंडियन नेव्हीमधील सर्वात फिट ऑफिसर्स आणि नाविक यांच्यापैकी एक असतात.

 

Marcos special force of indian navy.Inmarathi2

 

मार्कोससाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांचे वय २० वर्ष असते आणि निवडण्यात आलेल्या या उमेदवारांना सर्वात कडक निवड प्रणाली आणि ट्रेनिंगद्वारे सिलेक्ट करण्यात  येते.

यांची ट्रेनिंग इंडियन आर्मीच्या पॅरा कमांडोंबरोबर कमांडो ट्रेंनिंग स्कूलमध्ये होते.

४. मार्कोस कमांडो देखील पॅरा कमांडोंसारखीच हाय अल्टीट्युड हाय ओपनिंग आणि हाय अल्टीट्युड लो ओपनिंग दोन्ही तंत्रामध्ये पारंगत असतात.

Special-Forces-Machines-Beach-inmarathi

 

मार्कोस सैनिक पाणबुडया असण्याबरोबरच पॅराशूटिस्ट देखील असतात. मार्कोस हे आकाशातून समुद्रामध्ये आपल्या कॉम्बॅक लोडसहीत उडी मारण्याची क्षमता ठेवतात.

५. मार्कोस कमांडोंना हाय अल्टीटय़ूट कमांडो कोर्सची ट्रेनिंग अरुणाचल प्रदेशच्या तवांगमधील पर्वत घाट  ट्रेनिंग स्कूल, राजस्थानमधील डेजर्ट वॉरफेअर स्कूल, सोनमर्गमधील हाय अल्टीटय़ूट वॉरफेअर स्कूल आणि मिझोराममधील घुसखोरी प्रबंधक आणि जंगल वॉरफेअर स्कूल या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते.

६. मार्कोस हे जगातील काही सर्वोत्कृष्ट शस्त्रे चालवण्यामध्ये तरबेज असतात.

त्यांच्या या शस्त्रांच्या युनिटमध्ये इस्रायली टव्हर टीएआर – २१ रायफल असून त्याला ४० मिमी ग्रेनेड लॉंचर जोडता येते.

 

tar-21-inmarathi

 

टीएआर – २१ रायफल वेदर सील्ड असते, त्यामुळे तिच्यावर पाण्याचा काही फरक पडत नाही. त्यामुळे मार्कोस समुद्रातून बाहेर पडून अचानकपणे शत्रूवर गोळया झाडू शकतात.

७. मार्कोसची दिवसाची सुरुवात रोज २० किलोमीटर धावण्याने होते. मार्कोसला रात्री ६० किलो वजन घेऊन २० किलोमीटर ट्रेकिंग देखील करावी लागते.

हा नित्यक्रम  त्यांना अल्टरनेट दिवसांनी फॉलो करावा लागतो.

 

marcos-taining-inmarathi

 

मार्कोसला आठवड्याला ६० किलो वजन घेऊन १२० किलोमीटर चालवले देखील जाते. त्यांच्या ट्रेनिंगमध्ये कोणतेही फ्रेंडली फायर नसते.

८. मार्कोसची कमांडोंची खरी ओळख त्यांच्या संवेदनशील ऑपरेशनमुळे नेहमी गुप्त ठेवण्यात येते.

नेव्हीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनुसार, मार्कोसच्या कुटूंबियांना देखील ते मार्कोस कमांडो असल्याचे माहिती नसते.

 

Marcos special force of indian navy.Inmarathi4

 

मार्कोसना मुंबई, कोची आणि विझाग या तिन्ही नेव्ही बेसिसवर पाठवले जाते.

९. मार्कोस कमांडो पाण्यामध्ये कॉम्बॅट  लोडसहीत डुबकी मारण्यात पारंगत असतात. मार्कोस हे त्यांचे दोन्ही हात आणि पाय बांधलेले असताना देखील पाण्यामध्ये पोहण्याची क्षमता त्यांच्याकडे असते.

 

Marcos special force of indian navy.Inmarathi5

 

मार्कोसची पहिली बॅच फेब्रुवारी १९८७ मध्ये तयार करण्यात आली होती आणि आतापर्यंत यामध्ये जवळपास २००० व्यक्ती आहेत. पण याबद्दलचा खरा आकडा गुप्त ठेवण्यात आलेला आहे.

१०. अमेरिकन नेव्हीसीस आणि इंडियन नेव्ही मार्कोसमध्ये खूप महत्त्वाचे नाते आहे.

यांच्यामध्ये ट्रेनिंगसाठी एक करार झाला आहे. मार्कोस स्पेशल फोर्सची ट्रेनिंग यू. एस नेव्हीसीस सारखीच होते.

 

seals-and-marcos-inmarathi

 

यूएस नेव्हीसीस जगातील सर्वात धोकादायक स्पेशल फोर्स मानली जाते. ही तीच स्पेशल फोर्स आहे, जिने पाकिस्तानमध्ये घुसून ओसामा बिन लादेनला  त्याच्याच घरामध्ये मारले होते.

११. कारगिल युद्धादरम्यान मार्कोसने शत्रूला त्याच्या सीमेमध्ये जाऊन त्यावर कारवाई केली होती. २००८ मध्ये मार्कोसने ताज आणि हॉटेलमध्ये घूसून दहशतवाद्यांना ठार मारले होते.

 

Marcos special force of indian navy.Inmarathi6

 

१२. मार्कोस हे जमीन, हवा आणि पाणी या तिन्ही ठिकाणी कोणत्याही सैन्याबरोबर काम करून ऑपरेशन पूर्ण करू शकतात.

मार्कोस हे खूप कमी वेळामध्ये कोणतेही ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडण्यामध्ये सक्षम असतात.

असे हे भारतातील नेव्हीमधील स्पेशल मार्कोस कमांडो हे आपल्या फोर्सेसमधील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी खूप मोठमोठी ऑपरेशन अगदी सहजपणे यशस्वी करून दाखवली आहेत. तसेच, मार्कोस हे कधीही आपला चेहरा दाखवत नाहीत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?