' कचरा कुंडित फेकलेल्या या मुलीला मिळाला एक 'सुपरस्टार' पिता!

कचरा कुंडित फेकलेल्या या मुलीला मिळाला एक ‘सुपरस्टार’ पिता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवुड आणि इथले स्टारकिकिड्स म्हंटलं की नेहमीच नेपोटिझम आणि सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली मुलं असाच विचार केला जातो.

शाहरुखचा मुलगा आर्यन खान ड्रग्स केसमध्ये पकडला गेल्यानंतर तर यावर बरीच चर्चा झाली, ही स्टारकिड्स ही कशी वाया गेलेलीच असतात याची कैक उदाहरणं तुम्ही सध्या बघितली असतील.

 

aryan khan inmarathi1

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

खासकरून सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर प्रेक्षकांच्या मनात स्टारकिड्सबद्दल एक वेगळंच नकारात्मक मत तयार झालं आहे हे आपण गेल्या काही महिन्यांपासून अनुभवतोय!

याऊलट एक स्टारकिड मात्र जन्मताना सोन्याचा चमचा तर राहूच दे पण इतकं वाईट नशिब घेउन जन्माला आली की तिच्या जन्मदात्रीनं तिला कचराकुंडित फेकून दिलं होतं.

जन्माची वेळ खराब असली तरी नियतीने या बाळाच्या ललाटी उज्ज्वल भविष्य लिहिलं होतं. कचर्‍यात फेकलेलं हे बाळ एका सुपरस्टार आणि त्याच्या पत्नीनं दत्तक घेतलं.

म्हणतात नं, एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन, या मुलीच्या बाबतीतही असंच काहिसं घडलं. कोण आहे हा सुपरस्टार आणि त्याची ही मुलगी?

अलिकडे एका स्टारकिडची चर्चा जोरात आहे. ८० चं दशक गाजविलेल्या मिथून चर्कवर्ती याच्या मुलीचं लवकरच चित्रपटात आगमन होणार आहे. त्याच्या मुलाने बॉलिवुडमधे येण्याचा प्रयत्न केला मात्र आई योगिता बाली आणि वडील मिथून यांच्या जवळपासही न फिरकणारं अपयश या मुलाच्या पदरी आलं.

 

mithun and son inmarathi

 

मिमोहची केवळ चर्चा झाली तीदेखिल मिथूनचा मुलगा म्हणून. मिथूननेही इतर स्टार्सप्रमाणे आपल्या मुलाला लॉन्च करण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत. आपल्या अभिनय गुणांच्या जोरावर त्यानं या क्षेत्रात यावं असं त्यानं अगदी खुलेआम सांगितलं.

आता पुन्हा एकदा मिथून चर्चेत आला आहे कारण त्याची मुलगी दिशानी लवकरच चित्रपटातून दिसण्याची शक्यता आहे. सध्या दिशानी न्यूयॉर्क फिल्म अकादमीमध्ये शिक्षण घेत आहे.

पहिल्यापासूनच तिला चित्रपटांतच काम करायचं असल्यानं तिने त्या दृष्टीनं शिक्षण घेतलं आहे. काही शॉर्ट फिल्ममध्येही तिने काम केलेलं आहे.

dishani chakraborty inmarathi

 

दिसायला अत्यंत सुंदर दिशानी नव्या चेहर्‍यांना एक मुख्य स्पर्धक असेल यात शंकाच नाही कारण ती केवळ दिसायलाच सुंदर आहे असं नाही तर अभिनय हा गंभीरपणे शिकलेली मुलगी आहे. वडील मिथून यांचे गूण पुरेपूर दिशानीत उतरले असले तरीही ते रक्तातून आलेले नाहीत तर संस्कारातून आलेले आहेत.

दिशानी ही मिथूनची स्वत:ची मुलगी नसून दत्तक मुलगी आहे. जन्मली तेंव्हा अगदी वाईट नशिब घेऊन जन्माला आलेली ही मुलगी जन्मानंतर काहीच तसांत नशीब पालटवून मिथून आणि योगीताची दत्तक मुलगी बनली.

दिशानीला तिच्या जन्मदात्यांनी जन्म झाल्या झाल्या कचरा कुंडीत फेकून दिलं होतं. मिथूनला ही गोष्ट समजली आणि त्याचं मन हेलावून गेलं. थंडी, धूळ, कचर्‍यात फेकून दिलेलं नवजात अर्भक बघून त्याला रहावलं नाही आणि त्यानं पत्नी योगीतासह सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून या बाळाला दत्तक घेतलं.

 

dishani and mithoon inmarathi

 

जन्मानंतर काहीकाळ उघड्यावर घालवलेल्या या निराधार बाळाला ऊबदार घर आणि कुटूंब मिळालं.

मिथून आणि योगिताला महाअक्षय (मिमोह), उश्मे आणि नमाशी अशी तिन अपत्यं आहेत. या मुलांनीही दिशानीचं प्रेमानं स्वागत केलं. आपल्या बहिणीवर या भावंडाचं खूप प्रेम आहे.

घरातलं शेंडेफळ असणार्‍या दिशानीचे सगळेचजण खूप लाड करतात. आपल्या बहिणीच्या बॉलिवुड आगमनासाठी ही भावंडंही उत्सुक आहेत.

मिमोहला दुर्दैवानं अपयश बघावं लागलं असलं तरीही दिशानीला यश मिळेल अशी तिच्या कुटुंबियांना खात्री आहे. चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वीच दिशानीला इन्स्टाग्रामवर जे फॅन फॉलोविंग आहे ते बघता हे यश तिला नक्कीच मिळेल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?