' रामदेव बाबांनी नेपाळमध्ये सुरु केले बेकायदेशीर चॅनल्स; सरकारने केली कडक कारवाई...

रामदेव बाबांनी नेपाळमध्ये सुरु केले बेकायदेशीर चॅनल्स; सरकारने केली कडक कारवाई…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजकाल लोकांचा कल जास्त करून योगसाने, स्वदेशी वस्तू वापरण्याकडे दिसून येत आहे. मोदींनी सत्तेत आल्यावर मेक इन इंडियाचा नारा त्यांनी भारतीयांना दिला. अनेक नवनवे तरुण नोकरीच्या मागे न पळता आपापले उद्योगधंदे सुरु केले होते, इतकंच नव्हे तर गलेलठ्ठ पगाराची नोकरी असलेले सुद्धा अनेकजण व्यवसायात उतरले होते.

 

make in india inmarathi

 

परदेशी कंपन्यांना थेट आव्हान देणाऱ्या अनेक स्टार्टअप कंपन्या गेल्या काही वर्षात सुरु झाल्या. संपूर्ण भारतीयांनी सुरु केलेल्या कंपन्यानी अवघ्या काही वर्षात करोडोंचा धंदा केला, आज नायका सारख्या ब्रँडचा आयपीओ वाजतगाजत शेअरमार्केट मध्ये दाखल झाला.

देशी कंपन्यांमध्ये एक कंपनीचा नाव आज अनेकांच्या तोंडी आहे ते म्हणजे पतंजली, रामदेव बाबा यांनी आपल्या योग आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून एक नवा ब्रँडला जन्म दिला तो म्हणजे पतंजली. संपूर्ण स्वदेशी आणि कोणतेही केमिकल न वापरता आमची उत्पादने बनवली जातात अशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आखून पतंजलीने संपूर्ण मार्केट काबीज केले होते.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

परदेशी कंपन्यांच्या वस्तू सोडून ग्राहक साहजिकच पताजलीकडे वळत होते कारण एकतर किंमत कमी आणि केमिकलचा वापर नाही या दोन कारणांमुळे पंतजली मोठ्या प्रमाणावर वापरले गेले आजही अनेक सुपर मार्केट्समध्ये लोक हमखास एक तरी वस्तू पंतजलीची घेतातच.

 

patanjali owner inmarathi

 

व्यवसाय म्हंटल की साहजिकच तो वाढवण्याचा इरादा हा प्रत्येक व्यावसायिकचा असतोच, पंतजलीने देखील आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्या शेजारच्या नेपाळचा विचार केला मात्र तोच आता त्यांच्या अंगाशी आला आहे, नेमकं काय आहे प्रकरण चला तर मग जाणून घेऊयात…

आपल्याकडे सकाळ सकाळ जसे आस्था चॅनेल किंवा तत्सम योग शिकवणारी चॅनेल्स अस्तित्वात आहेत, त्याच पद्धतीने राम देव बाबांनी नेपाळमधील दोन चॅनेल्स विकत घेतली आहेत. आता तुम्ही विचार कराल त्यात काय एवढे मात्र कोणतंही कायदेशीर प्रक्रिया न करता त्यांनी ही चॅनेल्स विकत घेतली असं बोलले जात आहे.

 

nepal-marathipizza01
infoplease.com

खुद्द नेपाळच्या पंतप्रधानांनी शुक्रवारी एक कार्यक्रमाच्या दरम्यान ‘नेपाळ आस्था टीव्ही आणि पतंजली नेपाळ टीव्ही’ अशी दोन चॅनेल्स लाँच केली. या कार्यक्रमाला इतर राजकीय मंडळी उपस्थित होतीच त्याच बरोबरीने रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण हे देखील होते.

राम देव बाबांच्या या चॅनेल विकत घेण्यावर नेपाळच्या माहिती प्रसारण मंडळाच्या अध्यक्षांनी आक्षेप घेतला आहे. बहादूर हमाल यांच्या म्हणण्यानुसार माध्यमांमध्ये परदेशी गुंतवूणक करणे हे नेपाळी कायद्यानुसार निषिद्ध आहे. आमच्यकडे कोणत्याही प्रकारचे याबाबतीतले निवदेन आलेले नाही.

 

nepal 1 inmarathi

 

चॅनेलच्या खरेदीबाबत तपासासाठी आम्ही एक टीम तयार केली असून ते या व्यवहाराचा अभ्यास करून आम्हाला रिपोर्ट करतील. जर त्यांनी चॅनेल ब्रॉडकास्ट केले तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू अशा शब्दात बहादूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राम देव बाबा यांच्या पतंजलीवर बंदी आणण्याची ही पहिली वेळ नसून याआधी नेपाळ सरकारने पतंजलीच्या कोरोनल किटवर बंदी आणली होती. त्यामुळे एकूणच नेपाळ सरकार पतंजली बाबत खुश नसल्याचे दिसून येत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?