' सॅल्यूट! पती शहीद झाल्यानंतर त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सैन्यात भरती होणारी वीरपत्नी

सॅल्यूट! पती शहीद झाल्यानंतर त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सैन्यात भरती होणारी वीरपत्नी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतासाठी जेव्हा एखादा सैनिक लढत असतो, तेव्हा तो एकटाच लढत नसतो, तर त्याचं संपूर्ण कुटुंबही या लढ्यात अप्रत्यक्षरित्या सहभागी असतं. कोणता कॉल शेवटचा असेल याची शाश्वती नसणारं असं हे आयुष्य त्याचं कुटुंब त्याच्यासोबत जगत असतं. देशासाठी लढताना प्राणाहुती द्यावी लागली तर हे कुटुंब दु:खी होतं मात्र खचत नाही, कारण देशासाठी हे रक्त खर्ची झालेलं असतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्या अशाच कणखरपणाची साक्ष देणारी वीरपत्नी लेफ़्टनंट नितिका कौल. पती निधनानंतर त्याचं राहिलेलं कार्य पूर्ण करण्याच्या उद्देशानं नितिकानी भारतीय सैन्यात प्रवेश केला आणि अलिकडेच झालेल्या सोहळ्यात पतीचं शौर्यचक्र स्विकारण्यासाठी त्या प्रत्येक देशवासियाचा अभिमान असणार्‍या भारतीय सैनिकी गणवेषात उपस्थित राहिल्या.

वर्ष २०१९. भारताच्या इतिहासात पुलवामा हल्ल्याचा काळा धडा लिहून गेलेलं वर्षं. पुलवामा हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मद विरोधात सुरू असणार्‍या मोहिमेत मेजर विभूति शंकर ढौंडियाल यांनी तब्बल पाच अतिरेक्यांना यमसदनी पाठविलं.

आपल्या जिवाची पर्वा न करता या खुनशी अतिरेक्यांचा त्यांनी शौर्यानं सामना केला. पाचही जणांना त्यांनी यमसदनी पाठवलं.  त्यांनी जैश-ए-मोहम्मदचा गळा आवळला, मात्र या मोहिमेदरम्यान त्यांना प्राणाहुती द्यावी लागली.

 

vibhuti dhoundiyal inmarathi1

 

या आठवड्यात दिल्लीत झालेल्या समारोहात त्यांच्या पत्नी लेफ़्टनंट नितिका कौल आपल्या सासूबाई म्हणजेच विभूती शंकर यांच्या मातोश्रींसह उपस्थित होत्या आणि मोठ्या अभिमानानं त्यांनी हे शौर्य पदक स्विकारलं.

आजवर अनेक वीर पत्नीनी शौर्य पदकं स्विकारली आहेत मात्र नितिका यांच्या उपस्थितीतला एक वेगळेपणा असा. की पतीच्या मृत्यूनंतर त्या सैन्यात भरती झाल्या आणि शौर्य पदक स्विकारताना भारतीय सैन्याचा गणवेश त्यांच्या अंगावर होता.

प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानास्पद भाव आणणारं असं ते चित्र होतं. स्वर्गात शहिद विभूती शंकर अभिमानानं आपल्या या धीरोदत्त पत्नीला अभिवादन करत असतील यात शंकाच नाही. निकिता यांचा हा प्रवास प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असावा अशा सच्च्या सैनिकाचा आहे.

 

vibhuti dhoundiyal inmarathi2

 

विभूती शंकर ढौंडियाल यांच्या जाण्यानंतर त्यांनी दु:खानं खचून न जाता पतीचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला आणि अलाहाबाद येथे विमेन एंट्री स्कीमची परिक्षा दिली. निकिता यांचा लेफ़्टनंट निकिता कौल बनण्याचा प्रवास जाणून घ्यायचा तर आणखीन थोडं भूतकाळात जायला हवं.

८ एप्रिल २०१८ म्हणजे पुलवामाच्या थोडेच महिने आधिचा काळ. मेजर विभूति यांचं लग्न या दिवशी निकिताशी झालं आणि निकिता ‘सौ. ढौंडियाल’ बनल्या. लग्नानंतर पतीसह त्या डंगवाल मार्ग येथील घरी आल्या. नव्या नवलाईचे दिवस असतानाच मेजर साहेबांना देश कर्तव्य बजावण्यासाठी जावं लागलं.

 

vibhuti dhoundiyal inmarathi

 

लग्नाला अवघे दहा महिने झालेले असताना मेजर साहेबांना देशासाठी बलिदान द्यावं लागलं. नवीन आयुष्य सुरू करण्याचा मार्ग बाजूला सारून निकितांनी पतीचं स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला आणि अकादमीत प्रवेश घेतला.

चेन्नई येथे ऑफ़िसर्स ट्रेनिंग अकादमी (ओटिए) मधून निकिता यांना कॉल लेटर आलं. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर निकिता ओटिएच्या पासिंग आऊट परेड मधे लेफ़्टनंट म्हणून अधिकृतरित्या सैन्यात सहभागी झाल्या.

निकिता यांची ही कहाणी प्रत्येक देशवासियासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी आहे. अशा कर्तृत्वाला कोणत्याही आदेशाची गरज उरत नाही, मनापासून सलाम केला जातो.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?