' प्रियांकाने 'सासरचं' आडनाव काढलं आणि सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला उधाण आलं

प्रियांकाने ‘सासरचं’ आडनाव काढलं आणि सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला उधाण आलं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सेलिब्रिटीज आणि त्यांची पर्सनल लाईफ हा नेहमीच लोकांच्या कुतुहलाचा विषय असतो, आपला आवडत सेलिब्रिटी, अभिनेता किंवा अभिनेत्री नेमकं काय करतात, कुठे फिरतात त्यांचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे याविषयी बऱ्याच लोकांना उत्सुकता असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट आणखीनच सोपी झाली आहे, लोकं सेलिब्रिटीजशी आणखीनच कनेक्ट होऊ लागले आहेत. याचे जेवढे फायदे आहेत तितकेच तोटेदेखील आहेत.

काही महिन्यांपूर्वी साऊथची अभिनेत्री समंथा हिच्या घटस्फोटाच्या वेळी असाच काहीसा प्रकार घडला, समंथाच्या काही सोशल मीडिया पोस्टवरुन तिच्या चाहत्यांनी तिच्या आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाच्या अफवा पसरवल्या.

 

samantha inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

दुर्दैवाने त्यांचा घटस्फोट झाला खरा, पण एकंदरच सोशल मीडियावरच्या सेलिब्रिटीजच्या वावरामुळे लोकं काहीबाही अंदाज बांधतात आणि मग एका वेगळ्याच चर्चेला उधाण येतं.

नुकताच एक असा किस्सा देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिच्या बाबतीत घडला आहे, प्रियांका लग्नानंतर तिचा नवरा निक जोनससोबत परदेशी सेटल झाली, आणि तिने हॉलिवूडमध्येसुद्धा तिचा जाम बसवला.

तिच्या लग्नाबद्दलसुद्धा तेव्हा बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या, पण आत्ता प्रियांका एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे, तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटमधल्या नावातून ‘जोनस’ हे नाव काढून फक्त प्रियांका चोप्रा केलं आहे, या एका गोष्टीमुळे सोशल मीडियावर लोकांनी वेगळेच तर्क काढायला सुरुवात केली आहे.

 

priyanka chopra inmarathi

 

प्रियांकाच्या अकाऊंटमधल्या या बदलामुळे लोकांनी थेट तिला तुम्ही घटस्फोट घेताय का असा सवाल केला आहे. कालपासून सोशल मीडियावर तिच्याविषयी याच चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहेत.

एकंदरच प्रियांकाने वयाने बराच लहान असलेल्या निकशी केलेलं लग्न आणि त्यानंतर तिने त्याचं आडनाव काढून टाकणं यामुळे सगळ्यांच्या मनात हीच शंका येत आहे की, प्रियांका आणि निक लवकरच वेगळे होणार की काय?

खरं बघायला गेलं तर यामध्ये तथ्य तसं काहीच नाहीये प्रियांकाची आई मधू चोप्रा हिनेसुद्धा यावर स्पष्टीकरण दिलं असून या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे, शिवाय प्रियांका आणि निकमध्ये असं कधीच घडणार नाही असंही त्यांनी म्हंटलं आहे.

priyanka nick inmarathi

 

लग्न झाल्यानंतर एका मुलाखतीत प्रियांकाने असं सांगितलं होतं की तिला निकचं नाव लावायला खूप आवडतं कारण आम्ही एक परिवार आहोत, पण आता नेमकं प्रियांकाने याविरुद्ध जाऊन लावलेलं नाव काढल्याने असे अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत.

खरंतर यात काहीच तथ्य नसलं तरी या सेलिब्रिटीजच्या खऱ्या गोष्टी कधीच आपल्यापर्यंत पूर्णपणे पोहोचत नाहीत, त्यामुळे भविष्यात कधी हे जोडपं वेगळं झालंच तर त्याचं आश्चर्य वाटायची काहीच गरज नाही.

त्यांच्या नात्यात काहीच प्रॉब्लेम येऊ नयेत हीच इच्छा आहे, पण सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चा कधी सत्यात उतरतील हे कुणीच सांगू शकत नाही!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?