' आमिर तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार का? कोण असेल ती मुलगी?

आमिर तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार का? कोण असेल ती मुलगी?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरु आहे. अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा हे नुकतेच लग्नबेडीत अडकले. त्यापाठोपाठ आता कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या घरीही लग्नाची गडबड सुरु झाली आहे. मात्र या तरुणांच्या गर्दीत सध्या परफेक्शनिस्टचं नाव आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

wedding inmarathi

 

गेल्या काही महिन्यांपुर्वीच किरण राव आणि आमिर हे दाम्पत्य घटस्फोट घेत असल्याची बातमी येऊन धडकली आणि एकच खळबळ माजली. चित्रपटाचं शुटिंग असो किंवा एखादा सामाजिक उपक्रम, कायमच एकत्र असलेल्या या जोडीत नेमके वितुष्ठ कशामुळे आले याबद्दल चर्चा सुरु झाली.

 

aamir khan kiran rao 2 inmarathi

 

बॉलिवूडकर आणि घटस्फोट यांचे नाते जुने आहे. केवळ एका लग्नानंतर शांत न बसता घटस्फोट आणि त्यानंतर नव्या जोडीदाराचा शोध हा सेलिब्रिटींचा प्रवास सुरुच असतो. मात्र ५६ वर्षांचा आमिर आता तिसऱ्यांदा लग्न करतोय हे ऐकल्यावर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

सहकलाकाराशी लग्न?

आमिर आणि किरण यांचा घटस्फोट झाल्यानंतर त्याच्या अनेक कारणांविषयी चर्चा सुरु झाली. मात्र त्यामध्ये ‘आमिरचं अफेअर’ यावर सर्वाधिक खलबतं झाली.

काहींनी उघडपणे अभिनेत्री फातिमा सना शेख हीच या घटस्फोटाला कारण असल्याचे सांगितले तर काहींनी नाव न घेता चर्चा सुरु ठेवली. मात्र आता आमिर खानच्या लग्नाची बातमी ऐकताच ही कुणकुण खरी असल्याचे म्हटले जात आहे.

 

fatima inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मात्र अद्याप याबाबत आमिर किंवा फातिमा यांच्याकडून कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आला नसल्याने ही बातमी खरी आहे की अफवा यावर अनेकांचे दुमत आहे.

आमिर खान सहकलाकारशी लग्न करणार असल्याच्या चर्चेचे वावटळ उठले असले तरी ही सहकलाकार नेमकी कोण आहे? हे लग्न कधी होणार? याबाबत अद्याप ठोस माहिती देण्यात आलेली नाही.

आमिरच्या घटस्फोटानंतर फातीमा चर्चेत

आमिर खानने घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर लगेचच फातीमा आणि आमिर यांच्या अफेरच्या चर्चा सुरु झाल्या. यावर ट्रोलर्सने फातिमाला चांगलेच ट्रोल केले होते.

या सगळ्या चर्चांवर चिडून ”माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. घटस्फोट हा आमीरचा वैयक्तिक निर्णय असून मला विनाकारण ट्रोल केले जात आहे” अशी प्रतिक्रिया फातिमाने मांडली होती. त्यानंतर काही काळ या चर्चेच पुर्णविराम मिळाला असला तरी आता आमीर सहकलाकाराशी लग्न करणार असल्याचे समजातच ही कलाकार अर्थातच फातीमा असेल असा अंदाज बांधला जात आहे.

तिसऱ्यांदा बोहल्यावर?

१९८७ साली रीना दत्त हिच्याशी आमिरने विवाह केला. रीना आणि आमीर हे इरा तसेच जुवैद यांचे पालक आहेत. त्यानंतर वादामुळे २००२ साली त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर निर्माती किरण राव हिच्याशी डिसेंबर २००५ मध्ये आमिरने लग्न केले. दरम्यान सरोगसीव्दारे त्यांनी आझाद खान या मुलाला जन्म दिला. चित्रपटाच्या शुटिंग सेटसह इतरही अनेक कार्यक्रमात ही जोडी एकत्र वावरताना दिसत होती. मात्र अचानक या दोघांनी आपण घटस्फोट घेत असल्याचे कबुल केल्याने प्रेक्षकांना धक्का बसला.

 

amir kiran inmarathi

 

आमिरच्या या तिसऱ्या लग्नाबद्दल अद्याप खान कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आमिर तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार का ही केवळ अफवा ठरणार याचं उत्तर येत्या काही दिवसात मिळेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?