' Box Office वर जोरदार टक्कर: KGF 2 आणि लालसिंग चड्ढा रिलीज होणार एकाच दिवशी

Box Office वर जोरदार टक्कर: KGF 2 आणि लालसिंग चड्ढा रिलीज होणार एकाच दिवशी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

यंदाची दिवाळी खरं तर सगळ्यांना आनंदाची गेली, सगळीकडेच उत्साहाचे वातावरण दिसून आले, दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा भरून गेल्या होत्या. आजकाल लोकांची पसंती ऑनलाईनकडे जास्त असल्याने स्थानिक दुकानदार चिंतेत होते, मागच्या वर्षी आलेल्या कोरोनामुळे अनेकांचे धाबे दणाणले होते मात्र यंदा तसे झाले नाही. अनेकांनी स्थानिक दुकानातून खरेदी केली.

यावर्षी सर्वात कोणी खुश झाले असतील तर ते म्हणजे बॉलीवूडकर, गेल्या वर्षभरापासून थिएटर बंद होती, त्यामुळे सगळ्यांपुढे गंभीर प्रश्न उभा होता. अनेक सिनेमे प्रदर्शनाची वाट बघत होते, आणि राज्य सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यातील थिएटर्स पुन्हा उघडण्याची परवानगी दिली.

 

theater InMarathi

 

 

 

रोहित शेट्टीने तर आपल्या सिनेमाचे प्रदर्शन तब्बल २ वर्ष थांबवले आणि यंदा दिवाळीच्या मुर्हूतावर आपला मल्टिस्टार्टर सिनेमा सूर्यवंशी प्रदर्शित केला आणि अवघ्या काही दिवसात त्याने १०० कोटींचा टप्पा पार केला. हळूहळू आता इतर निर्माते मंडळी देखील आपले सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज करत आहेत, मात्र दोन बहुचर्चित सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत, चला तर मग बघुयात कोणते सिनेमे आहेत ते….

 

sooryavanshi trailer inmarathi

 

मि. परफेक्शनिस्ट आमिर खानचा लाल सिंग चड्ढा आणि साऊथचा KGF २ हा बिग बजेट सिनेमा एकाच दिवशी म्हणजे १४ एप्रिल २०२२ ला रिलीज होणार आहेत. दोन दिवसांपूर्वी म्हणजे २० नोव्हेंबरला दोन्ही सिनेमाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली.

 

kgf chapter 2 inmarathi

 

आता प्रेक्षकांपुढे चांगलाच पेच पडला आहे, कारण दोन्ही सिनेमांचे जॉनर वेगळे असले तरीसुद्धा त्यातील स्टार कास्ट तगडी आहे. लाल सिंग चड्ढा हा आमिरचा बऱ्याच कालावधीनंतर येणार सिनेमा आहे, याआधी त्याचा ठग्स ऑफ हिंदुस्थान साफ आपटला होता. त्यामुळे आपलं स्टारडम राखण्यासाठी त्याने चक्क हॉलिवूडच्या रिमेकचा आधार घेतला.

 

aamir khan featured inmarathi
somoytvnews.tv

 

बॉलीवूडकरांना रिमेक्स नवे नाहीत, अब्बास मस्तान सारखे दिग्दर्शक यात माहीर आहेत. त्यांचे कित्येक सिनेमे हे हॉलिवूडच्या हिट सिनेमांवर आधारित आहेत. लाल सिंग चड्ढा हा सिनेमा फॉरेस्ट गम्प या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.

टॉम हँक्सने आपल्या अभिनय कौशल्याने हा सिनेमाला चार चांद लावले आहेत, प्रेक्षकांना या सिनेमाकडून अशीच अपेक्षा असावी, कारण सिनेमातील आमिरच्या लुकपासून उत्सुकता ताणली गेली आहे. विशेष म्हणजे या सिनेमाची पटकथा अतुल कुलकर्णी या मराठमोळ्या अभिनेत्याने लिहली आहे.

 

tom hanks inmarathi

दुसरा बिग बजेट सिनेमा म्हणजे KGF २ , २०१८ साली या सिनेमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. यातील अभिनेता यश, त्याचा लूक स्टाईल, शिट्ट्या येतील असे संवाद, मुंबईमधील अंडरवर्ल्ड, कोळसा माफियांची अरेरावी असा पुरेपूर मसाला असलेला या साऊथच्या सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली होती, आता पुढच्या भागात संजू बाबा, रविना टंडनसारखी बॉलीवूडची मंडळी असणार आहेत. त्यामुळे साहजिकच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहेच.

 

kgf 2 inmarathi

एकाच दिवशी दोन तगडे सिनेमे प्रदर्शित होत आहेत ही काही नवी बाब नाही मात्र आधीच कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता एकाच दिवशी दोन सिनेमे रिलीज होत असल्याने प्रेक्षक कोणत्या सिनेमाची निवड करतील हे तेव्हा कळलेच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?