' TRP साठी हपापलेल्या न्यूज चॅनल्सचा छुपा चेहरा उघड करणारा 'धमाका'!

TRP साठी हपापलेल्या न्यूज चॅनल्सचा छुपा चेहरा उघड करणारा ‘धमाका’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

“ऍन्कर कौन होता है? ऍक्टर, ऍक्टर को क्या चाहिये? ऑडियंस, ऑडियंस को क्या चाहिए? ड्रामा!” हे ब्रीदवाक्य म्हणत समाज माध्यमांचा बुरखा फाडणारा धमाका नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला असून एक कडवं सत्य यातून लोकांपुढे मांडायचा प्रयत्न केला आहे.

राम माधवानी ज्यांनी निरजासारखा सिनेमा किंवा आर्यासारख्या सिरिजमधून जे विषय हाताळले त्यांच्या जवळपास जाणारा धमाका हा सिनेमा अगदी अप्रतिम आहे असं म्हणता येणार नाही, पण सिनेमातून जी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची आहे ती पोहोचते खरी, हाच काय तो या सिनेमाचा प्लस पॉइंट!

 

dhamaka inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एका कोरियन सिनेमाचा रिमेक म्हणून सादर केलेला हा धमाका काही बाबतीत वरचढ आहे, पण तरीही या सिनेमातलं कथानक पटकन आपलंसं वाटत नाही.

सुशांत सिंग राजपूतपासून, आर्यन खान आणि समीर वानखेडेपर्यंतच्या प्रकरणात आपण ज्या प्रकारची पत्रकारीता पाहिली, त्याच प्रकारच्या पत्रकारीतेमागची हिडीस वृत्ती या सिनेमातून दाखवली गेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून “कार्तिक आर्यनसुद्धा सुशांतच्या वाटेवर जातोय का?” अशी अफवा पसरली होती, पण कार्तिकच्या या धमाकेदार पेरफॉर्मन्सने सिद्ध करून दाखवलं आहे की इंडस्ट्रीतली कंपूशाही त्याचं काहीही वाकडं करू शकत नाही.

आजवरच्या कार्तिकच्या करियरमधला सर्वोत्कृष्ट सिनेमा कोणता असेल तर तो धमाका, कारण या सिनेमात कार्तिकने त्याच्या कम्फर्ट झोनबाहेर जाऊन एक वेगळी भूमिका साकारली आहे.

 

dhamaka featured inmarathi

 

धमाकाची कथा एका बड्या टीव्ही न्यूज चॅनलच्या  ऍन्करभोवती फिरते, ज्याला डीमोट करून रेडियो जॉकीचं काम दिलं जातं, तेव्हा त्याला रेडियोवर एक धमकीचा फोन येतो, समोरची व्यक्ति त्याच्याकडे एक मागणी करते आणि ती पूर्ण न केल्यास मुंबईचा सी-लिंक उध्वस्त करण्याची धमकी देते!

संपूर्ण सिनेमा याच घटनेभोवती फिरतो, न्यूज चॅनल्समधली स्पर्धा, ईर्षा, भ्रष्टाचार, स्वाभिमान आणि नीतीमत्ता बाजूला ठेवून केवळ पैसा आणि पोझिशनसाठी काम करणाऱ्या मीडिया इंडस्ट्रीतल्या लोकांची पोलखोल करत एक वेगळंच सत्य आपल्यासमोर येतं.

‘बातमी’ आणि ‘सत्य’ यातला फरक नेमका काय तेच सांगायचा प्रयत्न या कथेच्या माध्यमातून केला गेला आहे. सिनेमा बघताना कदाचित त्यातले काही सीन्स तुम्हाला खोटे वाटू शकतात किंवा हे असं कधी घडतं का? असा प्रश्नसुद्धा मनात येऊ शकतो.

पण जेव्हा टीआरपी किंवा रेटिंग्ससाठी चाललेली ही रेस आणि त्यामागची विकृत मानसिकता जेव्हा आपल्यासमोर येते तेव्हा मात्र हा सिनेमा काय सांगू पाहतोय याची प्रखरतेने जाणीव होते.

TRP inmarathi

 

सिनेमातल्या काही गोष्टी गंडल्या आहेत हेदेखील तितकंच खरं, काही डायलॉग, काही सीन्स शिवाय एकाच वेळी वेगवेगळ्या न्यूज चॅनल्समध्ये खेळला जाणारा संगीत खुर्चीसारखा कार्यक्रम हास्यास्पद वाटतो खरा, पण हा सिनेमा त्याच्या कथेपासून भरकटत नाही.

सिनेमा बघताना काही काही ठिकाणी नीरज पांडेच्या A Wednesday ची आठवण येते खरी कारण या सिनेमाची कथासुद्धा News Hungry Peoples यांच्याचभोवती फिरते, फक्त या सिनेमात त्यांची अधिक पोलखोल केली गेली आहे, एवढाच काय तो फरक.

 

a wednesday inmarathi

 

बाकी सिनेमाची तांत्रिक बाजू स्ट्रॉंग आहे यात काहीच वाद नाही, सी लिंक उडवतानाचे काही सीन्समध्ये आपल्याला वापरलेल्या स्पेशल इफेक्टची झलक दिसते, पण तरी कुठेही सिनेमा व्हिज्यूअल्सच्या बाबतीत कमी पडत नाही.

अशा धाटणीच्या आणि केवळ १ तास ४४ मिनिटांच्या फास्ट पेस्ड सिनेमात सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक, आणि ती गोष्ट अगदी उत्तमरीत्या या सिनेमात काम करते, जिथे एकप्रकारची भीती किंवा टेंशन निर्माण झालं पाहिजे तिथे तसंच सुन्न करणारं म्युझिक असल्याने त्या सीन्सची दाहकता जाणवते.

अभिनयाच्या बाबतीत सांगायचं झालं तर अमृता सुभाष, मृणाल ठाकूर यांची कामं उत्तमच झाली आहेत, मुळात हा सिनेमा फक्त आणि फक्त कार्तिक आर्यननेच त्याच्या खांद्यावर उचलून नेला आहे, आणि खरंच तो हे पात्र जगलाय.

 

dhamaka cast inmarathi

 

प्रथमच कोणताही मोठा मोनोलॉग न म्हणता कार्तिकने फक्त चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्समधून दाखवून दिलं आहे की तो अशा प्रकारच्या भूमिकासुद्धा अगदी तितक्याच सहजतेने करू शकतो!

बाकी सध्या सगळ्याच बाबतीत संवेदनाहीन झालेल्या न्यूज चॅनल्सचं आणि एकंदरच समाज माध्यमांचं हार्ड हिटिंग वास्तव दाखवण्यात राम माधवानी यशस्वी झाले आहेत यात काहीच शंका नाही.

हा सिनेमा तुम्ही नेटफ्लिक्स या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बघू शकता आणि तुम्ही जर हा सिनेमा पाहिला असेल तर तुमचं मत आम्हाला कळवायला विसरू नका, धन्यवाद!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?