' लोक आपल्या जोडीदाराला better half का म्हणतात याचे उत्तर देते ही ग्रीक दंतकथा! – InMarathi

लोक आपल्या जोडीदाराला better half का म्हणतात याचे उत्तर देते ही ग्रीक दंतकथा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोणाच्या बायकोला किवा नवऱ्याला संबोधित करण्यासाठी आपण Better-Half या शब्दाचा वापर करतो.या शब्दाला आपण पती-पत्नी/जोडीदाराला असलेला दुसरा शब्द मानतो, पण तुम्हाला आम्हीत आहे का, हा शब्द कधी पासून वापरात आला आहे? तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण या शब्दाचा संदर्भ थेट एका ग्रीक दंथकथेमध्ये सापडतो. चला तर पाहूया काय आहे ग्रीक दंतकथा आणि Better-Half शब्दाचा संबंध!

better-half-marathipizza01
या ग्रीक दंतकथेनुसार, पहिली माणसे खूप शक्तिशाली आणि हुशार होती. त्यांचे एक डोके आणि दोन चेहरे होते, जे वेगवेगळ्या बाजूंना होते. चार हात, पाय आणि दोन गुप्तांग होते. काही लोकांमध्ये पुरुष-पुरुष, महिला-महिला,आणि पुरुष-महिला असे जोडलेले होते.

ते खूप शक्तीशाली होते, पण एवढी शक्ती असल्याकारणाने ते खूप अतिआत्मविश्वासी झाले होते आणि त्यांनी देवावर हल्ला करण्याचा विचार केला. पण आपणच निर्माण केलेली सुंदर रचना नष्ट करणे झेउस (प्राचीन ग्रीकांचा देव)ला बरोबर वाटले नाही, परंतु त्याला हे समजले होते की, माणसांच्या शक्ती कमी केल्या पाहिजेत नाहीतर ते त्याचा चुकीचा वापर करतील.

better-half-marathipizza02

झेउस ने माणसांचे दोन तुकड्यात विभाजन केले, त्यामुळे पुरुष-पुरुष वेगळे झाले, महिला-महिला वेगळ्या झाल्या आणि पुरुष-महिला सुद्धा वेगळे झाले. काही ग्रंथांमध्ये असाही उल्लेख आढळतो की, झेउस ने अपोलोच्या मदतीने मनुष्याला दोन भागांमध्ये विभाजित केले. परंतु ते भावनिकरीत्या एकमेकांशी जोडलेले असल्याने ते विभक्त झाल्यानंतरही एकमेकांना शोधायला लागले. जे मनुष्य पुरुष-महिला होते, ते महिला पुरुषाला आणि पुरुष महिलेला शोधायला लागले. जे पुरुष-पुरुष होते ते एकमेकांना आणि ज्या महिला-महिला होत्या त्या एकमेकीना शोधायला लागल्या.

better-half-marathipizza05
ते सर्व आपल्या जुन्या भागांना शोधण्याच्या कामाला लागले. ते भाग न मिळण्याने कित्येक लोक मरण पावले आणि खूप जण तर आपला भाग न मिळाल्यामुळे गूढ नैराश्यात गेले. आपल्या जुन्या भागांचा शोध ते केवळ लैंगिक सुखासाठी घेत नव्हते तर त्यामागे त्यांच्या भावना जोडलेल्या होत्या.

आपल्या जुन्या भागांना शोधण्याच्या कार्यामुळे लोकांना आपला वंश वाढवण्यासाठी एक वेगळी युक्ती मिळाली. लोक आपल्या अंगाचा तो दुसरा भाग शोधू लागले आणि इथूनच सुरु झाली, आपल्या जोडीदाराला आपल्या जीवानाचा अविभाज्य भाग म्हणजे Half बोलण्याची प्रथा.

better-half-marathipizza04

म्हणूनच आपल्या जोडीदाराला Better half म्हणजेच जिवाभावाचा जोडीदार म्हटले जाते. 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?