' एक गाणं ज्यामध्ये साऱ्या बॉलीवूडने झाडून हजेरी लावली, फक्त आमिर सोडून! असं का?

एक गाणं ज्यामध्ये साऱ्या बॉलीवूडने झाडून हजेरी लावली, फक्त आमिर सोडून! असं का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

२००७ साल हे बॉलिवूडसाठी खूप महत्वाचं होतं. ३ मोठे चेहेरे मोठ्या बॅनरखालच्या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार होते. त्यांची नावं म्हणजे रणबीर कपूर, सोनम कपूर आणि दीपिका पदूकोण.

यातली सोनम कपूर जरी सध्या मोठ्या पडद्यापासून लांब असली तरी रणबीर आणि दीपिका हे सध्याचे लोकप्रिय कलाकार आहेत. एक मोठा युवा वर्ग आज यांना फॉलो करतो, पण २००७ मध्ये मात्र दीपिका आणि रणबीर हे एकमेकांचे स्पर्धक म्हणून समोर आले होते.

संजय लीला भन्साळीचा सावरिया आणि फराह खानचा ओम शांती ओम एकमेकांसमोर उभे ठाकले, तसं बघायला गेलं तर फराह खानचं पारडं जड होतं कारण या सिनेमात फराहसोबत नाव जोडलं होतं शाहरुख खानचं, सोबत दीपिकाचा पहिला सिनेमा होता, त्यामुळे ‘ओम शांती ओम’समोर सावरिया फिका पडणार हे अपेक्षितच होतं.

 

om shanti om sawariya inmarathi

 

घडलंही तसंच, ओम शांति ओमने छप्परतोड कमाई केली, तर रणबीरचा सावरिया अक्षरशः डब्यात गेला. ओम शांती ओम बऱ्याच कारणांमुळे सुपरहीट ठरला.

बॉलिवूडचा पुनर्जन्मवाला फॉर्म्युला, जुन्या फिल्मचे संदर्भ, फिल्मी दुनियेतली धमाल, ड्रामा, हॉरर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाला थीरकायला लावणारी गाणी, यामुळे ओम शांती ओम वेगळा ठरला.

शिवाय दीपिकाच्या अदांनी कित्येक प्रेक्षकांना वेड लावलं, तिचं त्या सिनेमातलं ते मोहक हास्य, आणि अभिवादन करण्याची स्टाईल लोकं अजूनही विसरलेली नाहीत.

 

deepika padukone 2 inmarathi

 

या सगळ्या गोष्टींमुळे सिनेमा हीट झालाच, पण त्याहीपलीकडे आणखीन एक कारण होतं ज्यामुळे या सिनेमाची जास्त चर्चा झाली, ते म्हणजे ‘दिवानगी दिवानगी’ हे गाणं आणि त्यात साऱ्या बॉलिवूडकरांनी लावलेली हजेरी.

आज याच गाण्याविषयी एक खास गोष्ट आपण जाणून घेणार आहोत, ज्या गाण्यासाठी फराह खानने साऱ्या सिनेकलाकारांना आमंत्रण दिलं, त्याच गाण्यात एक छोटीशी झलक देण्यासाठी perfectionist आमीर खानने नकार का दिला?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

याच गण्यामागच्या या खास रंजक गोष्टीविषयी आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत!

कयामत से कयामत तक पासून आत्ताचा दंगलपर्यंत आमिरने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे हे तर आपल्याला ठाऊक आहेच. सलग सुपरहिट चित्रपट डिलिव्हर करणारा आमीर मोजकेच चित्रपट करतो.

 

aamir khan inmarathi 2

 

भारतीय प्रेक्षक आणि त्यांची आवड निवड आमीरला चांगलीच ठाऊक आहे आणि त्याप्रमाणेच आमिर सिनेमे आपल्यासमोर आणत असतो!

आजही तीन खान बॉलिवूडमध्ये स्वतःचं महत्व राखून आहेत, तिघांच्याही तऱ्हा वेगवेगळ्या आहेत. एक अतिशय शांत एक अतिशय मार्मिक आणि विनोदी आणि एक मनात येईल ते सारे काही बोलणारा.

या तिघांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले. टिपिकल रोमँटिक हीरो अशा इमेजमध्ये अडकलेला शाहरुख काहीतरी नवीन चित्रपट करण्यासाठी उत्सुक होता आणि त्याला शोधतच फराह खान आणि आणि ओम शांती ओम हा सिनेमा तयार झाला.

 

farah and shahrukh inmarathi

ओम शांती ओम करताना फराह काहीतरी वेगळे, हटके असे काहीतरी चित्रपटात असावे यासाठी विचार करत होती. जुने अनेक चित्रपट पाहून फराहला एक नवीन आयडिया सुचली की जमेल तितके स्टार एका गाण्यात डान्स करतील असे गाणे या चित्रपटामध्ये असायला हवे!

इंडस्ट्रीमध्ये कित्येकांशी फराहचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्यांच्या सार्‍या तर्‍हा तिला माहीत होत्या पण आपल्या चित्रपटात काहीतरी बडा पॅकेट बडा धमाका दिला पाहिजे याबाबत ती आग्रही होती.

तेव्हा तिने ठरवले की तीन खान एका गाण्यात नृत्य करतील असे गाणे आपल्या या चित्रपटात असले पाहिजे. काहीही झालं तरी तीनही खान यांना एकत्र आणायचं असा चंग फराहने बांधला.

 

3 kkhans inmarathi

 

सलमान आणि शाहरूख एकमेकांचे मित्र होतेच, आमिरची इमेज बॉलिवूडमध्ये सर्वात वेगळा राहणारा, अवॉर्ड शोज मध्ये उपस्थित न राहणारा, अनेकदा आपण भले आणि आपले काम भले असेच पालन करणारा अशी होती!

फराह खानने जेव्हा या सर्व स्टार्सना एकत्र घेत एक मोठे गाणे चित्रीकरण करण्याबद्दल आमिरकडे विचारणा केली तेव्हा आमिरने पाहिल्या पासूनच त टाळाटाळ करायला सुरुवात केली.

मोजक्याच आणि आपल्या पसंतीच्या लोकांमध्ये काम करणारा आमीर सलग दहा दिवस या गाण्याच्या शुटींगसाठी येईना तेव्हा फराह समजून गेली की हे काही काही ठीक नाही ज्या गाण्यात सलमान शाहरुख आहेत तिथे आमीर खान पण हवाच!

जेव्हा फराहने आमीरकडे याबद्दल विचारणा केली तेव्हा तो म्हणाला की “मी स्वतः तारे जमीन परच्या एडिटिंगमध्ये व्यस्त आहे.. त्यामुळे हे गाणे यावेळी करणे शक्य नाही!”

 

farah and aamir inmarathi

 

यानंतर मात्र फराहने आमिरचा नाद सोडला आणि गाणं शूट करायचं ठरवलं, आणि एक अप्रतिम गाणे ज्यात तिन्ही खान एकत्र थीरकताना दिसले असते ते फराहचं स्वप्न शेवटी अपूर्णच राहिलं!

अनेक फिल्मी अदाकारा ज्या एकमेकांच्या कॅट फाईटसाठी प्रसिद्ध आहेत त्या या गाण्यात एकत्र नृत्य करताना दिसल्या पण तीन खान मात्र एकत्र येवू शकले नाहीत.

स्वतः अमिताभ यात आपल्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत असल्याने उपस्थित नव्हते आणि सदाबहार देवानंद फक्त प्रमुख भूमिका असणारेच काम करणारे असल्याने cameo करण्यासाठी तयार नव्हते पण धर्मेद्र, रेखा ते प्रियांका, करीनापर्यंत अनेक नट्यांनी यात हजेरी लावली.

 

om shanti om 2 inmarathi

 

अनेकांना माहीतही नसेल की जपानी भाषेतसुद्धा ओम शांती ओम डब झाला आणि तिथेही जपानी प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाने आणि त्यातल्या गाण्यांनी वेगळं स्थान निर्माण केलं ते वेगळंच!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?