' कलामांवर विनोद ते मायावतींना पुरुष म्हणून हिणवणं; वीर दासच्या घृणास्पद कृत्यांचा पाढा!

कलामांवर विनोद ते मायावतींना पुरुष म्हणून हिणवणं; वीर दासच्या घृणास्पद कृत्यांचा पाढा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताची २ वेगळी चित्रं आपल्या मोनोलॉगमधून मांडणाऱ्या वीर दासविषयी सोशल मीडियावर कालपासून बरंच उलट सुलट बोललं जातंय, काहींनी वीर दासच्या या कृत्याचे गोडवे गायले तर काहींनी कठोर शब्दांत निंदासुद्धा केली.

खरंतर वीर दासच्या या मोनोलॉगमधले काही मुद्दे बरोबर जरी असले तरी परदेशी जाऊन आपल्याच देशाचे असे वाभाडे काढल्याने बरेच लोक संतप्त झाले आहेत, भारतात बऱ्याच ठिकाणी वीर दासच्या शो वर आणि त्याच्या कंटेंटवर बंदी घातली असून सगळ्याच स्तरातून त्याच्या या कृत्याचे खंडन केले आहे.

 

vir das 2 indias inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या सगळ्यामुळे वीर दासच्या आधीच्या काही कॉंट्रोवर्सीसुद्धा पुन्हा समोर येऊ लागल्या आहेत. त्याचे जुने स्टँड अप कॉमेडी शोजचे व्हिडिओ आणि त्यात त्याने केलेली चुकीची टिप्पणी यावरून लोकांनी त्याला चांगलंच ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

आपल्या मोनोलॉगमधून स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी भाष्य करणाऱ्या वीर दासला त्यानेच केलेल्या मायवतींवरच्या टिप्पणीमुळेसुद्धा चांगलंच ट्रोल केलं जातंय.

यासगळ्या प्रकारानंतर वीर दासने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पत्रक जाहीर केलं ज्यात त्याने सांगितलं की त्याच्या जुन्या व्हिडिओजमधले काही भाग कटछाट करून व्हायरल केले जात आहेत.

खरंतर या सगळ्या प्रकारानंतर वीर दासकडून माफीची अपेक्षा होती, पण ती न मागता त्याने स्वतःची बाजू सांभाळून घेण्यासाठी केलेल्या पोस्टमुळे लोकं आणखीनच संतापले आहेत.

आज या लेखातून आपण वीर दासच्या अशाच काही वादग्रस्त विधानांबद्दल जाणून घेणार आहोत, आणि ही विधानं पाहून वीर दासवर आज एवढी टीका का होत आहे याचाही अंदाज येईल.

१. मायावतींना पुरुष म्हणून हिणवणे :

ट्विटरवरच्या एका युजरने वीर दासच्या एका स्टँडअप अॅक्टमधला एक भाग शेयर केला ज्यात बहुजन समाजवादी पार्टीच्या महिला नेता मायावती यांच्याविषयी अत्यंत घाणेरड्या भाषेत वीर दासने टिप्पणी केली आहे.

या व्हिडिओमध्ये वीर दास असं म्हणाला आहे “मायावती पुरुषांसारखी दिसते म्हणून मी तिचा दुःस्वास करत नाही, मायावती जेव्हा उत्तर प्रदेशच्या शैलीत बोलते तेव्हा त्या पेंगविनसारखी दिसते म्हणून मी तिचा दुःस्वास करत नाही.”

 

पुढेही त्याने मायावती यांच्याविषयी टिप्पणी केली, आणि यावरूनच पुन्हा लोकांनी त्याच्या २ भारताच्या थेअरीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

वीर दासच्या या व्हिडिओमुळे लोकं प्रचंड संतप्त झाली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहीजे अशी मागणीसुद्धा होताना आपल्याला दिसून येईल. शिवाय काही लोकांनी वीर दासच्याच शैलीत खोचकपणे शालजोडीतले मारले आहेत.

एका युजरने त्याच्याच भाषेत त्याला उत्तर दिलं आहे ते म्हणजे – “मी अशा भारतातून येतो जिथे वीरदाससारखी माणसं मायावतीसारख्या महिलेवर घाणेरड्या भाषेत विनोद करतात, आणि काही उच्चभ्रू लोकं त्याला फेमीनीजमचा आयकॉन म्हणून पुढे करतात!”

 

mayawati-inmarathi

२. ट्रान्सजेंडर कम्यूनिटीची खिल्ली उडवणं :

कोरोना काळात आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ‘टेन ऑन टेन’ या कार्यक्रमात वीर दासने ट्रान्सजेंडर कम्यूनिटीवर काही विनोद केले, खरंतर त्यातून त्याला सरकारवर टीका करायची होती, पण त्यातून झालं भलतंच! त्याच्या या जोक्समुळे या कम्यूनिटीला वाईट वाटलं.

याविषयी वीर दासच्या एका चाहत्याने त्याला इंस्टाग्रामवर मेसेज करून माहिती दिली, पण तोवर प्रकरण हाताबाहेर गेलं होतं, वीर दासबद्दल सतत उलट सुलट बोललं जाऊ लागलं.

 

vir das community inmarathi

 

तेव्हा आपल्या सोशल मीडिया हँडलवरून वीर दासने जाहीरपणे या वक्तव्याबद्दल माफी मागितली तेव्हा कुठे हे प्रकरण शांत झालं!

३. APJ अब्दुल कलाम यांच्यावर विनोद :

एका मुलाखतीदरम्यान वीर दासने एक एक किस्सा सांगितला ज्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. दिल्लीच्या एका स्टेडियममध्ये वीर दासचा शो सुरू होता, आणि त्यादरम्यान त्याने एक पोलिटिकल जोक सादर केला जो अब्दुल कलाम यांच्याशी निगडीत होता.

 

vir das on kalam inmarathi

 

तो जोक ऐकताच काही लोकांनी तिथे बसल्या बसल्या पोलिसांना बोलावलं आणि क्षणार्धात तिथे ४५ पोलिसांची एक तुकडी आली, यासगळ्यामुळे वीर दासला तो शो तिथेच थांबवावा लागला, आणि कसंबसं हे सगळं तेवढ्यावरच निभावलं!

४. हसमुख सिरिजवरुन झालेला वाद :

काही महिन्यांपूर्वी netflix वर रिलीज झालेल्या हसमुख या वेबसिरीजमुळेसुद्धा चांगलाच वाद निर्माण झाला होता. वीर दासच्या या सिरिजमध्ये त्याने एका कॉमेडीयनची भूमिका निभावली होती, जो शोवर जाण्याआधी एका माणसाचा खून करतो.

या सिरिजमध्ये वकिलांचं चुकीचं चित्रण केलं गेलं असल्याचे आरोप एका वकिलाने यावर केले असून या सिरिजवर बॅन आणावा अशी मागणीसुद्धा त्यांनी केली होती.

 

hasmukh 2 inmarathi

 

पुढे या प्रकरणातून काहीच निष्पन्न झालं नाही, उलट या सिरिजविषयी चर्चा झाली आणि सिरिज बऱ्यापैकी चाललीसुद्धा!

५. मंदिरात कंडोमविषयी जनजागृती :

वीर दास आणि सनी लिऑनीच्या मस्तीजादे नावाच्या सिनमातल्या एका सीनमुळे असाच वाद निर्माण झाला होता. ही फिल्म म्हणजे एक adult comdey होती, पण यातले बरेचसे सीन्स हे आपत्तीजनक होते.

त्यापैकीच एका सीनमध्ये सनी आणि वीर चुकीच्या पद्धतीने एका मंदिरात कंडोमविषयी जनजागृती करताना दाखवले गेले होते आणि या प्रकरणावरून त्यांच्या विरोधात दिल्लीत FIR सुद्धा दाखल करण्यात आली होती.

 

vir das sunny inmarathi

 

या सगळ्या प्रकरणावरुन वीर दास हा कायमच अशा वादग्रस्त कृत्यांमुळे चर्चेत असतो हे आपल्याला समजते, शिवाय त्याचं हे आत्ताचं भारताबद्दलचं वक्तव्यसुद्धा एकप्रकारचा पब्लिसिटी स्टंट आहे की के अशीच शंका येते!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?