' "प्रॉपर्टी डीलमध्ये फसवणूक झाल्याने आजवरचं ७०% उत्पन्न गमावलं" नबाब सैफचा खुलासा!

“प्रॉपर्टी डीलमध्ये फसवणूक झाल्याने आजवरचं ७०% उत्पन्न गमावलं” नबाब सैफचा खुलासा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूडच्या ३ खानची पुर्वीइतकी क्रेझ राहिलेली नाही पण या तिघांपेक्षा नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असणारा सैफ अली खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. मोठ्या पडद्यावरचा हा एकमेव मोठा स्टार ज्याने अचूक वेळ साधून डिजीटल प्लॅटफॉर्मवर एंट्री घेतली आणि स्वतःच्या करीयरच्या सेकंड इनिंगला सुरुवात केली.

अधेमधे चांगले वाईट सिनेमे आणि वेबसिरीजच्या माध्यमातून तो लोकांच्या समोर येत राहीला आणि प्रेक्षकांनी त्याच्या या नवीन प्रयोगांना मनापासून दादही दिली. काहीच दिवसांत तो आणि राणी मुखर्जी एकत्र बंटी और बबली २ या सिनेमातून लोकांचं मनोरंजन करायला सज्ज आहेत.

 

bunty babli inmarathi

 

या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सैफने दिलेल्या एका मुलाखतीत एक वेगळाच खुलासा केला आहे ज्यामुळे तो सध्या चर्चेत आहे, एका प्रॉपर्टी खरेदीदरम्यान त्याने त्याची फसवणूक झाल्याचे जाहीर केले आहे.

मुंबईमध्ये एक प्रॉपर्टी घेण्यासाठी त्याने एक डिल फायनल केलं आणि या सगळ्या डिलमध्ये त्याने आजवर कामावलेलं ७०% उत्पन्न तो गमावून बसला आहे असा खुलासा त्याने या मुलाखतीदरम्यान केला आहे.

“मला माझ्या एका ऑफिससाठी जागा हवी होती, आणि मी त्यासाठी सगळी तरतुदसुद्धा करून ठेवली, पण मध्यंतरी लॉकडाउनमुळे सगळीच गणितं फिस्कटली आणि मला ३ वर्षात मिळणारी प्रॉपर्टी अजूनही हातात आलेली नाही, आणि यामध्ये मी आजवर कामावलेल्या संपत्तीपैकी ७० % गुंतवली आहे ज्याचा मला चांगलाच फटका बसला आहे!”

 

saif ali khan inmarathi

असं सैफने या मुलाखतीदरम्यान जाहीर केलं आहे. बंटी और बबलीच्या प्रमोशनदरम्यान सैफने त्याच्या आणि राणी मुखर्जीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आणखीनही काही किस्से शेअर केले.

हम-तुम चित्रपटाच्या वेळेस त्यांनी केलेली धमाल आणि त्यांचा तो विचित्र कीसिंग सीन, तसेच ता रा रम पम सिनेमाच्या शूटिंग दरम्यान घडलेल्या काही धमाल गोष्टीसुद्धा त्यांनी या मुलाखतीत सांगितल्या.

बऱ्याच वर्षांनी बॉलिवूडची ही हीट जोडी लोकांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे, शिवाय सिद्धांत आणि शर्वरीसारखे नवीन चेहेरेसुद्धा या सिनेमात आपल्याला बघायला मिळणार आहे.

 

bunty babli 2 inmarathi

 

खरं बघायला गेलं तर सैफचं राजघराणं आणि त्यांची एकूण संपत्ती बघता सैफला झालेलं हे नुकसान त्या मानाने तसं किरकोळच आहे, पण शेवटी पैसा कोणाला नको असतो, आणि त्यामुळे झालेलं नुकसान मोठमोठ्या सेलिब्रिटीजची झोप उडवू शकतं हे यावरून दिसून येतं.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?