' ऑनलाईन शॉपिंग करताना पैसे वाचवण्याच्या १० भारी ट्रिक्स! – InMarathi

ऑनलाईन शॉपिंग करताना पैसे वाचवण्याच्या १० भारी ट्रिक्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जर तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायला आवडते, तर आज आम्ही तुम्हाला चांगली डील कशी मिळू शकते ह्यासाठी काही ट्रिक्स सांगत आहोत. त्यासाठी तुम्हाला काही वेगळे करण्याची गरज नाही.

फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या अंमलात आणायच्या आहेत.

त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन खरेदीत चांगला डिस्काऊंट मिळू शकतो.

१. भरपूर अकाउंट्स तयार करा.

 

online-shopping-marathipizza01

 

तुमचे खूप सारे E-mail id बनवा,. ज्यामुळे दुसऱ्याला रेफर करून जर सवलत मिळवण्यापेक्षा, आपणच आपल्याला रेफर करून सवलतीचा लाभ उचलू शकतो. ह्याने अजून एक असा फायदा होईल की, नवीन खात्यावरून केलेल्या पहिल्या खरेदीवर मिळणारी डिस्काऊंट ही तुम्हाला मिळू शकतो.

 

२. कॅश बॅक

 

online-shopping-marathipizza02
तुम्हाला ऑनलाईन खरेदी करताना हे लक्षात घेणे गरजेचे आहे की कंपनी कोणत्या वस्तूंवर कॅश बॅक देत आहे. बहुतेकवेळी आपण यावर लक्ष देत नाही,पण हे खूप फायद्याचे ठरू शकते.

कितीतरी वेळी लोकांना ५० टक्क्या पर्यंत कॅश बॅक मिळतो.

 

३. फ्री होम डीलेवरी

 

online-shopping-marathipizza03

 

कितीतरी वेळा २०० च्या खाली खरेदी केल्यास फ्री होम डीलेवरी मिळत नाही. त्यामुळे एकतर अनावश्यक खरेदी करणे वा डिलिव्हरी चार्ज देणे हे दोनच पर्याय समोर असतात. आणि दोन्हींत पैसे खर्च होतातच.

पण यावर देखील एक उपाय आहे.

त्यासाठी तुम्ही वेबसाईटद्वारा Fulfilled केलेले प्रोडक्ट्स पाहायला हवेत. कारण या वस्तू कितीही किमतीच्या जरी असल्या तरी त्यावर फ्री होम डीलेवरी मिळेलच.

 

४. प्रोडक्ट्स स्मार्टली शोधणे

 

 

online-shopping-marathipizza04

लक्षात ठेवा प्रोडक्ट्स खरेदी करण्याआधी त्या व्यवस्थित सर्च करा. त्यासाठी वेळ घ्या. कारण ऑनलाईन वेबसाईट एकाच प्रोडक्टच्या वेगवेगळ्या किंमती दाखवतात.

सर्च केल्याने सर्व किंमत आपल्या समोर येतात, त्यामुळे आपण वस्तू कमीत कमी किमतीला खरेदी करू शकतो.

 

५. फिल्टर चा वापर

 

online-shopping-marathipizza05

ऑनलाईन खरेदीसाठी दिलेल्या फिल्टरचा वापर करणे हा एक चांगला उपाय आहे. फिल्टरचा वापर केल्याने कितीतरी वेळा खरेदीवर सवलत सुद्धा मिळते.

कमी पासून जास्त किंमती पर्यंत निवडण्याचा सुद्धा एक पर्याय दिलेला असतो, त्यामुळे हा एक फायदा होऊ शकतो.

 

६. Sale पेज वर लक्ष ठेवा

 

online-shopping-marathipizza06

 

Sale पेज वर लक्ष ठेवून सुद्धा तुम्ही मोठी बचत करू शकता. बहुतेकवेळा वेबसाईट प्रमोशन करण्यासाठी देखील डिस्काऊंट देत असते.

 

७. Application डाऊनलोड करणे

 

online-shopping-marathipizza07

 

एक भारतीय मानसिकता आहे – भरपूर applications डाउनलोड नं करण्याची.

पूर्वी स्मार्टफोनच्या इंटर्नल मेमरी कमी असायच्या. इंटरनेटदेखील महाग होतं. त्यामुळे आपण एकूणच डाउनलोड हा प्रकार काटकसरीने करायचो, ज्यात मोबाईल applications पण आले.

परंतु आता ही अडचण सुटली आहे.

आता आपल्या फोनची मेमरी पण भरपूर असते नी इंटरनेट तर फारच स्वस्त झालंय…थँक्स टू जिओ!

ऑनलाईन खरेदीसाठी प्रत्येक वेबसाईट एक अॅप बनवते. ह्या अॅपने खरेदी केल्यास आणि आपल्या मित्रांना ह्या अॅप बरोबर जोडल्याने सुद्धा तुम्हाला डिस्काऊंट मिळू शकतोणि कॅश बॅक देखील!

 

८. प्रोडक्ट्सचे रिव्यू नक्की वाचा

 

online-shopping-marathipizza08

 

वेबसाईट वर वेगवगळ्या प्रकारच्या विक्रेत्यांचे अकाऊंट असतात. प्रत्येक विक्रेत्याच्या अनुभवाबद्दल लोकांनी मत मांडलेलं असतं. कधीही कोणती वस्तू खरेदी कराल तेव्हा रिव्यू नक्की वाचा.

त्यामुळे ऑनलाईन खरेदीसाठी येणाऱ्या समस्याही दूर होतील आणि तुम्हाला डिस्काऊंट देखील मिळू शकतो.

 

९. Cart चा वापर

 

online-shopping-marathipizza09

 

ऑनलाईन खरेदीसाठी Cart चा वापर जरूर करा त्यामुळे तुम्ही आपली आवडती वस्तू Cart मध्ये ठेवून तिची किंमत कमी होण्याची वाट पाहू शकता आणि नंतर ती खरेदी करू शकता. त्यामुळेही तुम्हाला योग्य ती सवलत मिळू शकते.

 

१०. सवलतीचे कूपन

 

online-shopping-marathipizza10
प्रत्येक खरेदीवर कंपनी काही तरी डिस्काऊंट कूपन नक्की देते, ते कूपन तुमच्या E-mail id वर पाठवले जातात. तुम्ही मेल काळजीपूर्वक वाचा.

या कूपन्स तुम्ही तुमच्या पुढच्या खरेदीवर खूप डिस्काऊंट मिळवू शकता. तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर ऑनलाईन खरेदीपेक्षा चांगले तुमच्यासाठी काही नसेल.

चला तर मग लगेच तुमच्या आवडत्या शॉपिंग वेबसाईटला भेट द्या, या ट्रिक्स वापरा आणि भरपूर बचत करा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?