' प्लॅस्टिकपासून शूजनिर्मिती: या पठ्ठ्याच्या आगळ्यावेगळ्या स्टार्टअपला आनंद महेंद्रा यांची साथ

प्लॅस्टिकपासून शूजनिर्मिती: या पठ्ठ्याच्या आगळ्यावेगळ्या स्टार्टअपला आनंद महेंद्रा यांची साथ

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एखादी कल्पना सुचावी, केवळ प्रयोग म्हणून ती आकारास यावी, पाहता पाहता आपल्या कल्पनेला मेहनत, जिद्द यांची जोड मिळावी आणि अवघ्या काही महिन्यात आपला हा प्रकल्प एका नामांकित स्टार्टअपमध्ये रुपांतरीत व्हावा, एवढेच नव्हे तर आपली कल्पकता आनंद महिंद्रसारख्या प्रतिष्ठित उद्योजकाला आवडल्याने त्यांच्याकडून आर्थिक मदतीचा हात मिळावा…एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी अशी ही गोष्ट २३ वर्षांच्या एका भारतीय  मुलाच्या बाबतीत खरीखुरी घडत आहे.

त्याचा हा प्रवास प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहेच, मात्र प्रत्येक तरुणाला स्वकष्टाने उद्योगक्षेत्रात पदार्पण करण्याचं स्वप्न दाखवणाराही आहे.

कोण आहे आशय भावे

एमिटी युनिव्हर्सिटीत शिकताना आशयला एका स्पर्धेसाठी प्रकल्प सादर करायचा होता. त्यासाठी शक्कल लढवताना त्याने टाकाऊ वस्तुंपासून शुज तयार करावेत असा विचार केला.

पहिल्या काही प्रयत्नांत अपयश आले तरी जिद्दीने त्याने प्रयत्न सुरुच ठेवले. याची पोचपावती म्हणून या स्पर्धेत त्याला पारितोषिकही मिळाले, आणि या यशामुळेच त्याने याच क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.

 

ashay bhave inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

स्पर्धेतील यशामुळे त्याला आर्थिक पाठबळ मिळण्यासही मदत झाली. त्यामुळे सुरवातीला काही सहकाऱ्यांसह त्याने २०२१ च्या जुलै महिन्यात थैली हा स्टार्टअप सुरु केला.

अवघ्या काही महिन्यात त्याच्या स्टार्टअपने भरारी घेतली असून प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून तयार होणाऱ्या शुजला मागणी वाढती आहे.

प्लॅस्टिकच्या पिशव्या ते स्टायलिश शुज

आपल्या कल्पकेताचा निसर्गाला फायदा व्हावा आणि निसर्गाला हानीकारक वस्तुंचा वापर करत उत्पादन तयार व्हावं या निश्चयाने आशयने हा उपक्रम सुरु केला. ‘थैली’ हे हटके नाव असणाऱ्या त्याच्या स्टार्टअप दररोज हजारो शुज तयार केले जातात.

एका शुजची जोडी तयार करण्यासाठी १० टाकाऊ प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि प्लॅस्टिक पिशव्या यांचा वापर होतो. अर्थात दर महिन्याला कंपन्यांकडून टाकाऊ पिशव्या तसेच बाटल्या आशयतर्फे विकत घेण्यात येतात.

या प्लॅस्टिकच्या माध्यमातून तो शुज तयार करतो.

 

ashay bhave shoes inmarathi

 

त्याचे हे शुज स्निकर्स या पॅटर्नमध्ये तयार होतात, जे जुन्या फुटबॉल प्लेअर्सच्या शुजपासून प्रेरणा घेत तयार केले जातात. हटके रंग, कम्फर्टेबल, स्टायलिश असे शुज पाहिल्यानंतर हे प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून तयार केले आहेत याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही.

आशयच्या कंपनीचा प्रत्येक वर्षाला वापरण्यात येणाऱ्या १०० अब्ज प्लॅस्टिक बॅगपासून रिसायकल करण्याचा मानस आहे. या प्लॅस्टिक बॅग्समुळे समुद्री जीवांचा विनाश होऊन निसर्गाला प्रचंड हानी पोहोचते.

आनंद महिंद्रांकडून कौतुक 

आशयच्या कंपनीबाबत नॉर्वेचे माजी मंत्री Erik Solheim यांनी सर्वात आधी ट्विट केले होते. आशयच्या ‘थैली’ कंपनीत बूटाची निर्मिती कशी होते, याबाबतचा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला होता. त्यांनी त्यासोबत आशयच्या आयडियाचे कौतुकही केले होते.

Erik Solheim यांचे ट्विट पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी आपल्याला याबाबत माहित नसल्यामुळे सर्वात आधी खेद व्यक्त केला. तसेच ते म्हणाले की, अशा कल्पक स्टार्टअपला आपण प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आशयच्या कंपनीचे बूट खरेदी करण्याचा निर्णय आनंद महिंद्रा यांनी घेतला. त्याशिवाय, स्टार्टअपला आर्थिक मदतही करण्यास तयार झाले आहे.

आनंद महिंद्रा हे स्वतः आशयने तयार केलेले बुट खरेदी करून वापरणार आहेत, शिवाय निसर्गाची काळजी घेणारा हा स्टार्टअप अधिक मोठा व्हावा यासाठी त्यांनी आशयला मदतीचा हातही दिला आहे.

 

ashay anand inmarathi

 

आशयप्रमाणेच आपल्यापैकी प्रत्येकाकडे कल्पकता असते. फक्त गरज असते, ती म्हणजे धाडस दाखवून आपलं स्वप्न पुर्ण करण्याची! आपण अनेकदा अपय़शाचा भितीने प्रयत्नच करत नाही, मात्र आशयसारखे योग्य वेळी, योग्य निर्णय घेतले तर आपला छंद, कल्पकता यांना योग्य दिशा मिळू शकेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?